◾कविता :- नागडाच आहे काय तुजपाशी...
नागडाच आहे काय तुजपाशी
नागडाच आहे काय तुजपाशी
गर्वानेच म्हणे बळे धनराशी
डागण्याच देती बोल या मनाशी
चमत्कार श्रेष्ठ मानी तो मनाशी
आहे कठीणच माया मायाजाळ
हेच भुललासे चुकलेले बाळ
काळ केंव्हा कोठे करेल घायाळ
यथास्थित मनी वसेना दयाळ
तुष्ट होता जीव मस्त मस्तावला
जनी बोलतांना बोले बळावला
पाश मायेचाच पाशे पाशविला
शीघ्र चढे मद मदे माजविला
श्वासातच माझ्या देव वसलेला
साथ संगतीत असे रमलेला
तया प्रेमवस्त्रे मी रे झाकलेला
रेखी रेघोट्याच भक्ती भाळलेला
माझा भार वाही भारदस्त देव
झाला वेडा तोही घाली भक्ती खेव
देतो ध्यान असे क्षण ना विसरु
वसे मागे पुढे त्याचे मी लेकरु
नांदतोच सुखे जरी मी नागडा
दयेनेच त्याच्या नसे मी उघडा
तोच होता संगे आहे नी राहील
यथामती भक्ती फळत राहील
निर्मिती:-
कवी - रा.र.वाघ,धुळे.
(मो.नं.७५०७४७०२६१)
Comments
Post a Comment
Did you like this blog