◼️ कविता :- नाताळ ... | ✍️ मराठीचे शिलेदार कविता समुह

🤶 सर्वप्रथम मराठीचे शिलेदार समूहातर्फे तुम्हाला मेरी क्रिसमस 🤶


➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖

‼ 'मराठीचे शिलेदार कविता ' समूहात काल देण्यात आलेल्या विषयावर निवडक सदस्यांनी केलेले 'कविता लेखन'.‼

➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖

मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम

➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖

♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾


       🙏विषय :- नाताळ🙏

       🎋दिनांक:-२५ डिसेंबर २०२० 🎋


🌲🎄🤶🎄🎅🎄🎁🎄🌲


आनंदी आनंद झाला

उत्सव  येशूजन्माचा 

चहूकडे रोशनाई दिसे

सण आला नाताळाचा


गायींचा गोठा सजला

मेरीचा चेहरा खुलला

येशू बाळाच्या जन्माने

सारा आसमंत उजळला


शांतीचा महानायक 

दया ,करूणेचा सागर 

क्षमा शिलतेचा दाता

प्रेमाचा तो पाझर


पापमुक्त करण्या जगाला

जन्म घेतला भूतलावर

शत्रूवर ही प्रीती करून

जगी झाला अजरामर


शिकवण दिधली मानवा

वैऱ्यावरही प्रेम कर

क्षमा करून प्रत्येकाला

सर्वांसाठी प्रार्थना कर


सौ.संगिता बनसोड मुनेश्वर  यवतमाळ

©️सदस्या मराठीचे शिलेदार समूह


🌲🎄🤶🎄🎅🎄🎁🎄🌲


हिरवे हिरवे झाड 

त्याला करू मोठं

वाट पाहू त्या दिसाची

आनंदाचं लोठ


हिरवे हिरवे झाड

त्याची मोठी सावली

सांताक्लॉज होऊनि

प्रेम देई परी मावली


आला महिना डिसेंबर

सामान घेऊ नवे नवे

नाताळाच्या दिवशी ला

आनंदी गगनात ना मावे


रंगबेरंगी कपडे अमुचे

रंगबिरंगी चाल चाल

छोटे मोठे गिफ्ट देऊनी

सांताक्लॉज करी कमाल


सुट्टी मिळे शाळेला

करू धमाल नि मज्जा

नाताळ च्या निमित्ताने

अभ्यासाला देऊ रजा


मनीषा ब्राम्हणकर ,अर्जुनी/मोरगाव,गोंदिया

मराठीचे शिलेदार समूह सदस्या


🌲🎄🤶🎄🎅🎄🎁🎄🌲


दया भावना मनी धरू

आनंदाचे क्षण अवतरू

नाताळच्या दिनी आपण

प्रभू येशूंची आठवण करू !!


नाताळ बाबा येतील आणि

खाऊ देतील ही समज धरू

गोड गोड शब्द बोलीत भरू

प्रभू येशूंची आठवण करू !!


पंचवीस डिसेंबर दिवस हा

नाताळ आनंदें साजरा करू

भेटवस्तू देऊ भेटवस्तू घेऊ

प्रभू येशूंची आठवण करू !!


जन्म दिवस हा प्रभू येशूंचा

येशू ख्रिस्तांना वंदन करू

बंधूभावनेचा स्विकार करू

प्रभू येशूंची आठवण करू !!


सौ. सत्यभामा आदिनाथ वाघमारे.(झेंडे)म्हसवड नं २ कुकुडवाड ता माण जि. सातारा

*सदस्या मराठीचे शिलेदार समूह.


🌲🎄🤶🎄🎅🎄🎁🎄🌲


जन्मदिन असे येशु चा

आनंदाचा दिन असे

नाताळ म्हणून करिती साजरा

प्रेमभाव जनमनी वसे


अंधारात चाचपडत्या जनतेला

मार्ग दाखविला येशूने

ज्ञानाचा नव प्रकाश दिधला

सुळावर चढला आनंदाने


शत्रूंवर विजय मिळवला

वागून फक्त प्रेमाने

समता, ममता,प्रेमाचा

पाठ शिकवला येशूने


मनापासुन  जे हाक देती

इच्छा त्यांच्या पूर्ण होती

मुले ,माणसे आनंदाने

नाताळ सणाची वाट पाहती


*सौ.शशी मदनकर,ब्रम्हपुरी*

*सदस्या-मराठीचे शिलेदार समूह*


🌲🎄🤶🎄🎅🎄🎁🎄🌲


आला नाताळ सण

शुभेच्छा सर्वांना देवू

प्रभू येशू जन्मदिन 

आशिष प्रभूचे मिळवू...//


बंधुभाव एकात्मता

मूल्य अबाधित ठेवू

आनंदाच्या उत्सवात

सामील आपण होवू...//


राम रहीम प्रभू येशू

सर्व देवांचे अवतार 

जन्म घेतला भूवरी

करण्यास कार्य थोर...//


बंधुता प्रेम नि ममता

दिली थोर शिकवण

चंद्र सूर्य जोवर भूवरी

होईल तुमची आठवण...//


चढलात सुळावर प्रभू

करून माफ सर्वांना

अज्ञानी जनासाठी तुम्ही

केलीत मनोभावे प्रार्थना..//


तुमची शिकवण आम्ही

मनोमन आज स्विकारू

नाताळ सणाच्या दिवशी

प्रभू येशूंना वंदन करू...//


*✍️सौ-राजश्रीताई मिसाळ ढाकणे बीड*  

 *कवयित्री/लेखिका/सदस्या* 

 *मराठीचे शिलेदार समूह*


🌲🎄🤶🎄🎅🎄🎁🎄🌲


आला आला हो आला आला हो

नाताळ सण आज आनद घेवून आला

लहान मुलांना खूप खूप खूप आज

आनंद अन हर्ष मनापासून झाला...


सांताक्लाॅज लाल लाल कपडे  घालून

डोक्यावर गोंड्याची लाल टोपी घालतो

मुलांना तो चाॅकलेट ,गोळ्या  देवून

सर्वांनाच मगआनंदी आनंदी देतो....


पांढरी पांढरी लांब दाढी त्याची

पायात छान छान  पांढरे मोजे

मौज वाढवतो  सार्‍यांचीच तो

पाठीवर घेवूनी खाऊचे ओझे....


मुलांच्या विश्वात रममाण होई

अचानक  तो कुठुनसा हो  येई

नाचून गावून मुलांना खूप हसवी

मुलांना खूप खूप आनंद देवून  जाई.....


अचानक येतो अचानकच मग

सांताक्लाॅज नाहीसा कुठे हो  होतो

पण नाताळ हा सण आजच्या दिनी

मुलांबरोबर साजरा करून जातो....


     *वसुधा  नाईक,पुणे*

*सदस्या मराठीचे शिलेदार समूह*


🌲🎄🤶🎄🎅🎄🎁🎄🌲


➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖

           🙏संकलन/मुख्य सहप्रशासक🙏

             *✏सौ.कल्पना शाह*

               *डोंबिवली,जि.ठाणे*

                  

 *©मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*

➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖

*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*

➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖





Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !