प्लास्टिक बंदी वर कविता | Poem on banning use of plastic straw
सरकारने कितीही वेळा
जरी प्लास्टिक बंदी केली
तरी देखील काही काळाने
प्लास्टिक पिशवी सुरू झाली... [१]
दुष्ट प्लास्टिकचे होत नाही
सूक्ष्मजीवांकडून विघटन
मातीमध्ये वर्षानुवर्षे पडते
तरी होत नाही मातीत पतन... [२]
कापडी पिशवी वापरूया
करूया प्लास्टिक बंदी
कापडी पिशवीच चांगली
असो तेजी किंवा मंदी... [३]
प्लास्टिक वापरणे सोडून
निसर्गाचे करूया रक्षण
आपली जबाबदारी निभावू
होईल भूमातेचे संवर्धन... [४]
चला घेऊ सारे शपथ
प्लास्टिक बंदी करण्याची
छान, स्वच्छ, सुंदर, हिरवी
आपली वसुंधरा घडवण्याची... [५]
Comments
Post a Comment
Did you like this blog