◾कविता :- अंतरीची सुंदरता..
अंतरीची सुंदरता....
अंतरीची सुंदरता
तनावर विलसते
रीतसर विखरता
चीरकाल खुलवते
सुंदरता सुंदरच
दक्ष सदा मनोहारी
रमे मन हे खरच
ताळमेळ मोदकारी
बाहेरील खाणाखुणा
हेच मुळ अंतरीचे
रहातसे उणादुणा
हीच खुण खंत साचे
उणिवच येते पुढे
मनी जर खोटे असे
लक्ष्य असो डोळ्यापुढे
तेच सदा सत्य वसे
सत्य जर अंतरात
करी नाश नर्काचाच
लांब नाही ते मनात
नान्दे जीव स्वर्गातच
आनंदच द्यावा घ्यावा
नंदलाल सांगे गीता
दावी बोध तोच घ्यावा
नेई पैलतिरा पिता
आनंदच मुळ असे
पोहूनच पैलतिरा
आहे साधनच खासे
पदोपदी ऐलतिरा
खुणावते नाम मात्र
लगोलग घेई भार
वसे तन मनी पात्र
तेच जीवनाचे सार
निर्मिती:-
कवी - रा.र.वाघ,धुळे.
(मो.नं. ७५०७४७०२६१)
Comments
Post a Comment
Did you like this blog