◾कविता :- लिहितच राहीन मी... | Marathi poem | R. R. Wagh
लिहितच राहिन मी
हिन्दोळेच मनातले
तया जीवनात जे मी
चवीनेच भोगलेले
राबताना कर्मगती
हीच उर्जा येते कशी
नवलाई करी मती
मीच मात करे कशी
स्वानुभवे सांगतो मी
नुरलोच 'मी' अर्पिला
भगवंता चरणी मी
वसे मोद 'मी' भोगिला
बोध घेता बोध वृत्ती
धरी वाट योग्य रिती
ज्याचे समाधान चित्ती
लाभ खरा याच रिती
घ्यावयाचे ज्याला तोच
यथामती ओढावतो
चालू लागे मार्गी तोच
तोच मग सुखावतो
घेता बोध लागे शोध
ईश्वराशी जवळीक
लडिवाळ तोच बघ
चराचरी सोयरीक
निर्मिती:-
रा.र.वाघ,धुळे.
(मो.नं.७५०७४७०२६१)
Comments
Post a Comment
Did you like this blog