◼️ बोधकथा :- ✨गैरसमज

सॉक्रेटिस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता. एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू लागला, "अहो...  तुमच्या मित्राबद्दल मी आताच काय ऐकले ? तुम्हास माहीत आहे की नाही ? "

" भल्या माणसा , थोडा वेळ थांब , " 
साॅक्रेटिसने त्याला थांबवले. 
" कोणतीही गोष्ट ऐकण्यापूर्वी मी ती माझ्या तीन गाळण्यातून गाळून घेतो व नंतर ऐकतो. "

" तीन गाळण्या...?
काय, आहेत तरी काय त्या?"

" हे पहा, माझे पहिले गाळणे आहे , माहितीची सत्यता ! तुम्ही जे मला सांगणार आहात ते स्वत: पाहिले आहे काय ? "

" नाही , मी ऐकले आहे ."
तो माणूस बोलला .

" ठीक आहे ." सॉक्रेटिस म्हणाला . 

" आता दुसरे गाळणे. मला असे सांगा की ते माझ्या मित्राबद्दल चांगले आहे की वाईट आहे ?"

" ओ ... खरे तर ते चांगले नाही !"
तो माणूस बोलला .

" म्हणजे तुम्ही अशी गोष्ट सांगणार आहात जी माझ्या मित्राबद्दल वाईट आहे , मात्र तिच्या सत्यतेबद्दल तुम्हाला कांही माहीत नाही ! बरोबर ? " साॅक्रेटिसने विचारले . 
" ठीक आहे . आता आपण तिसरे गाळणे लावूया. कदाचित त्यातुन तुम्ही खरे उतराल ."

" तिसरे गाळणे आहे उपयुक्ततेचे ! तुम्ही जे मला सांगणार आहात ते माझ्यासाठी फायद्याचे आहे का ? "

" खरे तर नाही !" 
तो माणूस बोलला .

" हे पहा ," सॉक्रेटिस म्हणाला , 
" जी गोष्ट माझ्या फायद्याची नाही... माझ्या मित्राबद्दल चांगले सांगत नाही... आणि जी खरी किंवा खोटी हे माहीत नाही, अशी गोष्ट ऐकून मी काय करणार? म्हणून तुम्ही ही मला अजिबात सांगु नका. बाय ! "

आणि... 
साॅक्रेटिसने आपले काम पुढे चालू केले .

☀️ तात्पर्य :

कोणाबद्दल ऐकण्यापूर्वी या तीन गाळण्या अवश्य वापरा. तुमचा बहुमोल वेळ वाचेल आणि मित्रांबद्दलचा गैरसमज होणार नाही. आयुष्य सुखी होईल !!



          

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...