◼️ बोधकथा :- भाव तेथे देव
ईश्वराची पूजा म्हणजे अज्ञानातून
मुक्ती, अंधश्रद्धा तिलांजली,संस्कारांना उजाळा,विद्येची उपासना ,जिभेवर गोडीअमृताची तर डोळ्यात भक्तीची निरांजने तेवत ठेवण्याचा उत्तम मार्ग होय.गेल्या सहा महिन्यांपासून आपण करोना या व्हायरस विरोधात झुंजत आहोत .आपण सर्वांनी मिळून या महामारी विरोधात शांतपणे घरात राहून सहकार्य करायचे आहे.
नरसिंगपूर निरा भीमा नदीच्या संगमावर वसलेले एक छोटे गाव आहे त्या गावात नरसिंहाचे मोठे दगडी मंदिर आहे.त्या मंदिरात रोज पूजा, आरती, नेवैद्य सारे काही जे गुरुजी करायचे त्यांना बडवे म्हणतात.ते रोज नित्य नियमाने पुजा आरती नेवैद्य करत आहे. पण लॉक डाऊन मुळे सर्व मंदिरे बंद करण्यात आली अर्थात हे करणेच योग्य होते.पण बडवे काकांना मंदिरात जाऊन देवाचे सर्व काही करण्याची सवय गेली चाळीस वर्षांपूर्वी पासून सुरु होती, मंदिरात शांत वातावरण असायचे त्यामुळे तेथेच जप करीत असत
आता शासनाने सर्व धार्मिक ठिकाणे बंद केल्यामुळे बडवे काकांना आता वेळ कसा घालवावा हा प्रश्न पडला. चार दिवस खूप विचार केला , तेव्हा त्यांनी ऑनलाईन मोफत संस्कृत श्लोक शिकविण्यास आरंभ केला.मुले, मोठी माणसे, स्त्रिया त्यांच्याकडून योग्य उच्चार असलेले श्लोक शिकू लागले. नंतर विद्यार्थी संख्या खूप वाढली, त्यामुळे रोज चार बॅचेस व्हायच्या.आता वेळ उत्तम जाऊ लागला. नंतर त्यांनी गीतेचे अध्याय शिकविण्यास आरंभ केला.बडवे काका संस्कृत निष्णात होते.त्यामुळे त्यांची प्रसिध्दी वाढली. पण काका सर्व मोफत आणि सेवा या दृष्टीने करत आहेत. आज त्यांनी हजारो मुलांना गीता शिकवली. ते म्हणतात हे सर्व ईश्वर माझ्याकडून कडून करून घेत आहे .
अतिशय मधुर वाणी, वागण्यात लीनता, साधी राहणी असलेले बडवे काका संस्कृत वर्ग घेत आहेत. लॉक डाऊन मुळे ते म्हणतात मला ईश्वराची सेवा करण्याचा नवीन मार्ग सापडला. आज अशा व्यक्ती दुर्मिळ होत आहेत. आज त्यांचे वय सत्तर आहे , पण उत्साह पंचविशीच्या माणसाला लाजवेल असा आहे. ईश्वर कृपेने माझ्या कडून सर्व घडत आहे.चाळीस वर्षे मंदिरात प्रामाणिक सेवा दिली म्हणूनच मला भागवत गीता शिकवण्याची संधी मिळाली. काका याला संधी मानतात.ते म्हणतात आता मंदिरे खुली झाली तरी ,हे सुरू केलेले कार्य मी शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणार. धन्य ते बडवे काका आणि धन्य त्यांचे विचार . अशा लोकांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना आहे.
त्यांची ईश्र्वरावर खूप श्रद्धा होती , मनात
भक्तिभाव निष्काम होता .म्हणून त्यांच्या कार्यातून त्यांना देवाने मार्ग दाखवला .देव
भक्तांना संकटात मदत करण्यास धावून
येतो. फक्त आपली श्रद्धा व भाव मनापासून हवी .
तात्पर्य : ईश्र्वरावर डोळस श्रद्धा ठेवा .उगाच खोटे स्तोम नको . मनी शुद्ध भाव असला की त्याचे फळ नक्कीच मिळते पण फळासाठी श्राद्ध नको .
💐🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
सौ नीला वसंत सोनवणे नाशिक
Comments
Post a Comment
Did you like this blog