बोधकथा :- प्रारब्ध आणि संगत
तुम्ही दोन पोपटाची गोष्ट वाचलीच असेल. एक चोरा जवळ राहतो आणि एक साधू जवळ
दोघांच्यात झालेला बदल तुम्हाला माहित आहेच
!
... खाली असाच एक लेख आहे ...
एका भुंग्याची शेणातल्या किड्याशी गट्टी जुळली. पुढे त्यांच्यातली मैत्री खूप गाढ होत गेली. एके दिवशी किडा भुंग्याला म्हणाला, " अरे तू माझा सर्वात आवडता आणि जवळचा मित्र आहेस तर उदया तू माझ्या घरी जेवायला ये."
भुंगा दुस-या दिवशी तडक त्याच्याकडे गेला पण नंतर विचारात पडला की मला चुकीची संगत लाभली म्हणून आज शेण खायची सुद्धा वेळ आली. आता भुंग्याने किड्याला त्याच्या स्थळी येण्याचं आमंत्रण दिलं की तू उदया माझ्याकडे ये!..
दुस-याच दिवशी सकाळी किडा भुंग्याकडे गेला. भुंग्याने येताच क्षणी त्याला उचलून गुलाबाच्या फुलात बसवलं.
किड्याने परागरस चाखला.किती भाग्यवान मी!...अस म्हणून तो मित्राचे आभार मानतच होता इतक्यात शेजारच्या मंदिरातील पुजारी आला. ते गुलाब तोडलं आणि मंदिरातल्या देवाच्या चरणांवर अर्पण केलं. किड्याला भगवानाचे दर्शन झालं तो धन्य झाला कारण त्यांच्या पायाजवळ बसण्याचं सौभाग्य लाभलं. संध्याकाळी पुजा-याने सगळी फुलं एकत्र करून गंगेत विसर्जित केली. आता किडा स्वतःच्या नशीबावर हैराण होता. इतक्यात भुंगा उडत उडत किड्याजवळ आला आणि म्हणाला.
"भाऊ, काय चालू आहे मनात?.."
किडा म्हणाला, "बंधू , जन्मोजन्मीच्या पापांची मुक्ती झाली. प्रारब्धातून सुटलो एकदाचा!..हे सर्व चांगल्या संगतीचं फळ आहे.सांगायच तात्पर्य हेच की कोणालाच जीवनाच्या कोणत्या वळणावर आपली कोणाशी गाठभेट होणार आहे याची पूर्वकल्पना नसते. प्रत्येकाशी आपलं रक्ताचं नातं असू शकत नाही म्हणून ईश्वरी कृपेने काही माणसं अद्भुतरित्या आपल्या जवळ येतात जसं की नदीच्या प्रवाहात वाहताना दोन ओंडके अचानक एकत्र येतात. सोबत कुठपर्यंत असेल ते काहीच निश्चित नाही पण काही काळ एकत्र प्रवास होऊन पुढे वेळ आल्यावर विलग होतात. अशी नाती खरंच अद्भुत असतात पण फक्त ती जपण्याची जाणीव आणि आस्था आपल्यात असायला हवी. नात्यांमध्ये आस्था असावी पण आसक्ती नाही कारण कोणीही सोबत जन्माला येत नसतं. आपण एकटेच जन्माला आलो आणि एकटेच जाणार हे कायम लक्षात असू द्यावं मग आसक्ती निर्माण होत नाही.
मूळात आपला जन्म कशासाठी झाला आहे हे गूढ उकलता आलं तर पुढचा सर्वच प्रवास सुखकर होतो आणि 'ते उकलण्याचा एकमेव मार्ग ध्यान साधना.' प्रारब्धात ठरल्याप्रमाणे कोणाकडून काही घेण असेल किंवा आपण कोणाचं देण लागत असू तर वेळ आल्यावर त्या प्रत्येक जीवाच्या भेटीच प्रयोजन कळतं म्हणून फक्त आपण कर्म करत राहावं इतकंच!...फळ म्हणजे प्रारब्ध ते तो बघून घेतो.
🙏 ||श्री स्वामी समर्थ||🙏
लेखक : अज्ञात
🌳🌲🌳🌲🌳🌲🌳🌲🌳🌲🌳🌲🌳🌲🌳🌲🌳
हे पण वाचा
प्रेरणादायी स्टेटस :
इतर विशेष स्टेटस :
इतर विशेष स्टेटस :
जीवनावर लेख :
इतर पोस्ट :
महान व्यक्तिंची पुस्तके :
प्रेरणादायक कथा :
- सुख म्हणजे काय ?
- जीवनाचा खरा अर्थ काय ?
- आपण का जगतो ?
- मन म्हणजे काय ?
- नेहमी आनंदी राहण्यासाठी काय करावे ?
- माणसाने जीवन कसे जगावे ?
- स्वतःमधील चुका दुरुस्त कशा करायच्या ?
- मनावर ताबा कसा ठेवायचा ?
- आयुष्य म्हणजे काय ?
इतर पोस्ट :
महान व्यक्तिंची पुस्तके :
प्रेरणादायक कथा :
- डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम चे विचार
- लोभी राजा
- 34 पिक्चर के प्रेरणादायक डायलाॅग
- १३ पिक्चर के प्रेरणादायक डायलॉग
- नरेंद्र मोदींच्या प्रेरणादायी कविता
- बिल गेट्स के अनमोल विचार
- चार्ली चॅप्लिन के अनमोल विचार
- संत सुकरात के अनमोल विचार
- अब्राहम लिंकन के अनमोल विचार
- रस्तावर पेन विकणारा झाला कॉमेडीचा बादशाह -जॉनी लिव्हर
- युद्धातला हात्ती
- अब्दुल कलाम यांच्या वडिलांची शिकवण
- रतन टाटा यांचा संदेश
- वास्तव
- शाळेतील सरांनी बोर्ड वर लिहले
- कधी कोणाला कमी समजू नये
- केनियाचा खासदार उदारी देण्यासाठी महाराष्ट्रात
- मुलांना वाया जाऊ द्यायचे नाही ना
- 101+जिवनावर सुविचार
- जीवनावर सर्वश्रेष्ठ विचार
- खूप सुंदर ओळी
- स्वप्न
- परोपकार
एक टिप : अधिक प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी 🔍सर्च बारमध्ये टाइप करा (बोधकथा )...
Comments
Post a Comment
Did you like this blog