मनावर ताबा कसा ठेवायचा ?

माणसाचे मन हे क्षणात बदलणारे आणि चंचल असते. एकाच वेळी माणसाच्या मनात अनेक विचार येऊन स्थिरावतात. अशा वेळी मनावर ताबा मिळविण्याकरिता ध्यान साधना हाच एक सर्वोत्तम उपाय आहे. 
माणसाचे मन हे क्षणात बदलणारे आणि चंचल असते. एकाच वेळी माणसाच्या मनात अनेक विचार येऊन स्थिरावतात. अशा वेळी मनावर ताबा मिळविण्याकरिता ध्यान साधना हाच एक सर्वोत्तम उपाय आहे. 

अजून एक पद्धत ज्याने मन शांत केले जाऊ शकते, ती म्हणजे, अलिप्तपणा. भौतिक जगात जरी वावरत असलो तरी त्याच्याशी अलिप्तपणा बाळगणे. मनाला नियंत्रित करण्यासाठी जाणीवपूर्वक स्वप्नस्थिती (कॉन्शियस ड्रिमिंग) आणि जाणीवपूर्वक झोपेची (कॉन्शिअस स्लीप) आवश्यकता आहे. 

एखाद्या माणसाने राग-द्वेष यांचा त्याग केला असेल, किंवा भौतिक मोह मायेतून मुक्त झाला असेल तो मनुष्य चित्तविक्षेपांचे शमन करण्यात यशस्वी होतो. 

मानवाचे जीवन समृद्ध आणि सुंदर होण्यासाठी तसेच मानवी कल्याणासाठी बुद्धविचार खूप महत्त्वाचे आहेत. या विचारातूनच आयुष्यात आनंद आणि सुख प्राप्त होते. मनावर संयम मिळविण्याकरिता गौतम बुद्धांनी समाधीचा पुरस्कार केला. अशी समाधी शिकवली, जिचा मूलाधार निसर्गनियम आहे. श्वास आणि संवेदनेवर आधारित साधना शिकवली, जी साधना कोणताही माणूस सहज करू शकतो, त्याला कसलाही अडथळा येत नाही. श्वास आणि शरीरावर होणा-या संवेदनांचे निरीक्षण करायला कसली आलीय अडचण. त्यातून मन एकाग्र होते आणि मनावर ताबा येतो. 

Comments

Popular posts from this blog

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◾ललित लेख :- स्ञी

◾कविता :- नवरा माझा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

🐦पोपट नक्कल का करतो?