मन म्हणजे काय ?

मन म्हणजे हे आपलं मंदिर आहे मन हे आपल्याला जगण्यासाठी उर्जा देते.आज आपण विचार करतो हे मनातुन येत असतात मन आपल्याला स्थिर पण ठेवतो कधी अस्थिर करतो आपण विचार करतो तेव्हा मनातुन येत तेव्हा आपण सकरत्मक नकारात्मक विचार करणारा म्हणजे आपलं मन आज आपण आपल्या मनाशी बोलत असतो काही ठरवतं असतो ते मन करवून घेत मन हे आपले सर्वस्व आहे 
मन आपल्याला सर्व काही दिशा ही दाखवणं आपण दुसऱ्या चं ऐकतो पण ऐकतो ते आपल्या मनाचे 
मराठीत म्हण आहे ऐकावे जणांचे करावे मनाचे. 
मन हे सर्व काही आहे मन हि उर्जा आहे.

______________________________________
📍 मन 📍

मन म्हणजे काय हो ? त्याला कोणी पाहिलं नाही ? कसं असते ते माहीत नाही ? पण त्याला खूप मान सन्मान असतो.
कधी ते लिक्विड असतं , " मन भरलं नाही " असं म्हणतो आपण..
कधी ते सॉलिड असतं , " मनावर खूप ओझं आहे "
*कधी ते घर होतं , " मेरे मन में रहने वाली "*
*कधी ते तहानलेलं असतं , " मेरा मन तेरा प्यासा "*
*कोणी त्याला मोराची उपमा देतं , " मन मोराचा कसा पिसारा फुलला "*
*असं हे मन आयुष्यभर आपल्याला झूलवत ठेवतं , कधी स्वतःच्या मनाने तर कधी दुसऱ्याच्या मनाप्रमाणे आपण वागत असतो*
*हे " मन " कधीच स्थिर का बरं नसतं ?*
*काही जण असतात की , त्यांच्या " मनात " काही रहात नाही तर काही " मनकवडे " असतात*.
*मन दिसत तर नाही..पण त्याने ठरवले तर ते हरवून टाकतं तर कधी शक्ती नसताना जिंकूनही देतं*.
*" मनात आणलं तर काहीही होऊ शकतं "*
*जरी त्याला कोणी पाहिलेले नाही तरी ते जर चांगलं असलं तर आपण आनंदी राहतो , दुसऱ्याचं भलं करतो , म्हणून म्हटलं जातं, " मन चंगा तो .."*
*कधी हे खूप डेंजर असतं.. स्वतःकडे राग तिरस्कार साठवून ठेवतं आणि " मनातील " राग दुसऱ्याचे नुकसान करतं*
*याचा वेग मोजण्याचं यंत्र अजून अस्तित्वात आलेल नाही , तरी लोकं म्हणतात, " मनाचा ब्रेक , उत्तम ब्रेक "*
*" मन " दिसत नसलं तरी तेच आपणाला घेऊन फिरत असतं . कधी घरी , कधी डोंगरदऱ्यांत , कधी आकाशात , पण ते निर्मळ असतं , पारदर्शक असतं*
*म्हणूनच आपण म्हणू शकतो की , " मोरा मन दर्पण कहलाये. " अशा या न  दिसणाऱ्या पण सर्वस्व असणाऱ्या  " मनाला " काबूत ठेवण्याचा अनेकजण प्रयत्न करतात*.
*पण " मनाप्रमाणे " जगता आलं नाही तर त्याला काही अर्थ आहे का ?*
मग ...
" मनसोक्त " जगा आणि त्यासाठी..
"मना" पासून शुभेच्छा.

🌸💐🌸💐🌸💐🌸💐🌸

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !