वास्तव
*पैसे असुन साधं राहीलं तर भिकारडा म्हणतात..पैसा ब-यापैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात..सगळ्यांशी मनमोकळेपणानं बोललं तर बकबक करतो म्हणतात ..कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात ....दानधर्म नाही केला तर कंजुष मारवाडी..भरपुर दानधर्म केला तर दोन नंबर पैसे असणार असं म्हणतात ...बायकोचं ऐकलं तर बैल...नाही ऐकलं तर काहीतरी भानगड असणार असं म्हणतात..तब्बेत चांगली तर फुकटंच खाऊन सुटलाय म्हणतात ...तब्बेत कमी केली तर काहीतरी आजार झाला असणार म्हणून मरायला लागलाय असं म्हणतात .....सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर ह्याला काही धंदा नाही...नाही गेलं तर माणुसकी नाही म्हणतात .....हे सगळे लोक असतात...लोक नेहमी त्यांचं काम करतच असतात..
आपण आपलं काम करायचं....याचाच अर्थ "ऐकावे जनाचे , करावे मनाचे..लोक पायी चालु देत नाहीत...अन गाढवावर बसु देत नाहीत...शेवटी आपण ठरवायचं ...जीवन कसं जगायचं.,,हसत हसत की रडत रडत........"*
Comments
Post a Comment
Did you like this blog