आयुष्य म्हणजे काय ?

🧐रोज सकाळी जीवावर उदार होऊन, अत्यंत कष्टाने अंथरुणातून शरीर उचलून दिवसाची सुरुवात करणं म्हणजे आयुष्य नव्हेतर उत्साहाने ‘आजचा दिवस माझाच आहे’ म्हणत, स्मित हास्याने जागं होणं म्हणजे आयुष्य…जुन्या कष्टदायक आठवणींना चिटकून राहून आताचा प्रत्येक क्षण वाया घालवणं म्हणजे आयुष्य नव्हेतर आलेल्या प्रत्येक क्षण त्या क्षणात राहून जगणं, त्याचा आनंद लुटणं म्हणजे आयुष्यआपल्या जीवनात घडलेल्या वाईटासाठी, परिस्थिती आणि लोकांना दोष देत राहणं म्हणजे आयुष्य नव्हेतर जे काही घडलं त्याची जबाबदारी स्वतःघेणं, त्यातून चांगलं काय ते शिकून, चांगलं घडवणं म्हणजे आयुष्यजे न मिळालं त्यासाठी सततची तक्रार करणं म्हणजे आयुष्य नव्हेतर जे काही मिळालंय त्यासाठी सातत्याने कृतज्ञ राहणं म्हणजे आयुष्यवादळ संपण्याची, पाऊस थांबण्याची वाट बघत आडोश्याला लपणं म्हणजे आयुष्य नव्हेतर बाहेर पडून, बेधुंद होऊन, पावसात मनसोक्त भिजणं म्हणजे आयुष्यWhats App, Facebook वर न पाहिलेल्या १०० मित्रांशी तासंतास गप्पा मारणं, मेसेज फॉरवर्ड करणं म्हणजे आयुष्य नव्हेतर जुन्या एखाद्या मित्राला कॉल करून, भेटून कॉलेजबाहेरच्या चहाच्या टपरीवरकटिंग पीत मनसोक्त गप्पा मारणं म्हणजे आयुष्यआपल्यात राहून, केवळ आपल्यासाठी जगणं म्हणजे आयुष्य नव्हेतर इतरांच्या जीवनात योगदान करून, त्यांना आपलंसं करणं म्हणजे आयुष्यलोक दोष देतील, टीका करतील, त्याने खचूनजाणं म्हणजे आयुष्य नव्हेतर आपल्या स्वप्नांवर ठाम राहून, स्वतःवर विश्वास ठेवून, ध्येयपुर्तीचीवाटचाल करणं म्हणजे आयुष्यगर्दीत जाऊन, गर्दीचा भाग होणं आणि गर्दीत भर होऊन जगणं म्हणजे आयुष्य नव्हेगर्दीत राहून, मोठी स्वप्न बाळगून, ती पूर्ण करून, त्या गर्दीतूनही उठून दिसणं म्हणजे आयुष्य

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !