रस्त्यावर पेन विकणारा झाला कॉमेडीचा बादशाह – जॉनी लिव्हर




जॉन प्रकाश राव ज्यांना आज आपण जॉनी लिव्हर नावाने ओळखतो. आपल्या अनोख्या अभिनयामुळे आणि विनोदी कलेने त्यांनी खूप लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे. त्यांच्या याच प्रकारच्या अभिनयामुळे त्यांनी ऐकून ३५०+ चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि १३ फिल्म फेअर अवॉर्ड जिंकले आहेत. खरतर त्यांना छोट्या मुलांपासून ते मोठ्यांपर्यन्त सगळेच ओळखतात, पण खूपच कमी लोक असतील कि, जे त्यांच्या या यशाच्या मागचा संघर्ष जाणत असतील.
चला तर मग जॉनी लिव्हर चा प्रवास आपण सुरुवाती पासून पाहण्याचा प्रयत्न करूयात.
जॉनी लिव्हर यांचा जन्म १४ ऑगस्ट १९५६ मध्ये आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यामध्ये खूप गरीब कुटुंबात झाला. पण ते मुंबईच्या किंग सर्कल, धारावी मधे मोठे झाले. जिथे त्यांचे वडील हिंदुस्तान लिव्हर कंपनी मध्ये एक कामगार म्हणून काम करत होते. शिक्षणाबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी, ७ वि. पर्यंत आंध्र शिक्षा संस्थ्येमध्ये शिक्षण घेतले. त्यावेळी त्यांच्या घरची परिस्तिथी एवढी बिकट होती कि, त्यांना शिक्षण मधेच सोडावे लागले. मग आपले पोट भरण्यासाठी त्यांनी मुंबईच्या रस्त्यावर पेन विकायचे काम सुरु केले. त्याचंबरोबर त्यांनी आपल्या वडीलांबरोबर हिंदुस्तान लिव्हर कंपनी मधे काम करायलाही सुरुवात केली, आणि तिथेच त्यांचे नाव जॉन प्रकाश राव चे जॉनी लिव्हर झाले. खरंतर झाले असे कि, जॉनी लिव्हर तिथे काम करता करता तिथल्या मोठ्या अधिकाऱ्यांची नक्कल करून कामगारांचे मनोरंजन करू लागले. आणि थोडेच दिवसात त्या कामगारांना त्यांची नक्कल खूप आवडू लागली. त्यामुळे तिथले लोक त्यांना जॉनी लिव्हर बोलू लागले. आणि तेव्हापासून जॉन प्रकाश राव हे जॉनी लिव्हर च्या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांच्या अभिनयामुळे त्यांच्या बरोबर काम करणारे कामगार आणि त्यांचे मोठे अधिकारी त्यांच्यावर खूप खुश होते. त्यामुळे जेव्हा कधी कंपनी मधे प्रोग्रॅम व्हायचा तेव्हा जॉनी लिव्हर ला स्टेज परफॉर्मन्स साठी बोलावले जायचे. अश्याप्रकारे त्यांनी आता आपले टॅलेंट ओळखले होते. आणि आपली पॅशन काय आहे हे त्यांना समजू लागले होते.
त्यामुळे त्यांनी कामाबरोबरच छोट्या छोट्या ओर्केस्टा मध्ये काम करायलाही सुरुवात केली. काही काळानंतर जेव्हा त्यांना या ओर्केस्टा मुळे चांगले पैसे मिळू लागले, तेव्हा त्यांनी १९८१ मध्ये कंपनी सोडून दिली आणि आपला पूर्ण वेळ आपल्या टॅलेंट सुधारण्यासाठी दिला. त्यानंतर आपली मेहनत आणि प्रयत्न यामुळे स्टेज शो मध्ये ते एक सफल कलाकार बनू लागले. १९८२ मध्ये त्यांनी आपला पहिला मोठा स्टेज शो अमिताभ बच्चन बरोबर केला. जॉनी लिव्हर ला स्टेज शो मधे आतापर्यन्त खूप चांगली प्रसिद्धी मिळाली होती. परंतु त्यांना अजून फिल्म इंडस्ट्री मध्ये एन्ट्री मिळाली नव्हती. काही दिवसांनंतर एका शो च्या दरम्यान सुनील दत्त ने त्यांचे टॅलेंट ओळखले आणि त्यांना पहिल्यांदा “डर का रिश्ता” चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली. त्यानंतर “जलवा” मध्ये नसरुद्दीन शहा बरोबर त्यांनी काम केले. पण त्यांचे खरे यश १९९३ मध्ये “बाझीगर” फिल्म मुळे सुरु झाले. मग त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून बघितले नाही. त्यानंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्री मध्ये स्वतःची अशी छाप सोडली, कि जवळ जवळ सर्व चित्रपटामध्ये ते सपोर्टींग अभिनेता म्हणून काम करू लागले.
त्यांच्या वैयक्तित जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, जॉनी लिव्हर चे लग्न सुजाता नावाच्या मुली बरोबर झाले. आणि आता त्यांना दोन मुलें आहेत, ज्यामध्ये मुलाचे नाव जयेश आणि मुलीचे नाव जॅमी आहे. जॅमी पण एक विनोदी कलाकार आहे. कपिल शर्मा बरोबर “किस किस को प्यार करू” चित्रपटामध्ये तिने काम केले आहे.
आज जॉनी लिव्हर खूप मोठे कलाकार झाले, खूप पैसा त्यांच्याकडे आहे तरी पण ते अजूनसुद्धा आपल्या जुन्या घरी आपल्या मित्राना भेटायला जातात आणि त्यांच्या बरोबर वेळ घालवतात.
जॉनी लिव्हर ची स्टोरी आपल्याला हेच सांगते कि, पॅशन आणि टॅलेंट मुळे आपल्याला यश नक्कीच भेटते. भलेही जॉनी लिव्हर सारखा थोडा वेळ लागतो पण एकदा का पॅशन मिळाले कि मग यश आपोआप मिळते

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...