◼️ बोधकथा :- बळी तो कान पिळी


एक घनदाट जंगल होते. त्या जंगलात बरेच प्राणी राहत होते. एके दिवशी अस्वल, लांडगा, कोल्हा, सिंह शिकारीसाठी एकत्र निघाले. सिंह त्या तुकडीचे नेतृत्व करत होता. जंगलात फिरता फिरता त्यांना एक म्हैस दिसली..
..... त्या चौघांनी मिळून अथक प्रयत्नाने म्हशीला पकडले.. आणि ठार मारले.. कोल्ह्याने म्हशीच्या मासाचे चार समान भाग केले. प्रत्येक जण हर्षाने नाचत होता. आज आपल्याला भरपूर शिकार मिळाली. चला!!आपण आता त्याच्यावर येथेच्छ ताव मारु.!!  आपल्याला मिळालेल्या वाटेचे खाण्यासाठी सगळेजण  उतावीळ झालेले होते.. "आशाळभूत" नजरेने ... म्हशीच्या मांसाकडे बघत होते..
..... इतक्या जंगलचा राजा सिंह याने मोठी गर्जना केली." तो म्हणाला" ते भाग बाजूला ठेवा. "मी काय सांगतो आहे ते तुम्ही नीट ऐका.."
..... सगळेजण चमकले... वनराजाचे म्हणणे शांतपणे ऐकून लागले.. दोस्त हो!! यातील एका भागावर माझा हक्क आहे.. कारण शिकारीत मी तुमच्या बरोबर सहभागी झालो. 
सगळे म्हणाले अगदी बरोबर
....दुसऱ्या भागावर ही माझाच अधिकार आहे कारण शिकार करताना मी तुमचं नेतृत्व केलं होतं.
सगळेजण म्हणाले अगदी बरोबर
... तिसरा भाग पण मलाच  पाहिजे आहे. कारण तो मला माझ्या छाव्यांना द्यायचा आहे.
सगळेजण शांत बसले
... आता उरलेला चौथा भाग यासाठी जो माझ्याशी कोणी युद्ध करेल.आणि त्यात जो जिंकेल त्याला मी तो चौथा भाग देणार. कोणाला? पाहिजे आहे.चौथा भाग. त्याने युद्धासाठी पुढे यावे .आणि माझ्याशी युद्ध करावे.. 
अस्वल, लांडगा, कोल्हा यांना आपली ताकद माहिती होती.
आपण वनराजाशी युद्ध केले तर आपली हार "निश्चितच"!!
हे त्रिवार सत्य आहे !!
कशासाठी आपली शक्ती वाया घालवायची. असा विचार करून निमूटपणे सगळेजण जंगलात निघून गेले...!!

तात्पर्य.. बळी तो कान पिळी बलवान मनुष्य इतरांवर हुकमत गाजवतो हेच खरं !!



लेखिका :- चंद्रकला जोशी
 नाशिक




Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...