◾विशेष लेख :- या गोजीरवाण्या घरात....

 'या गोजीरवाण्या घरात.....'

संजय धनगव्हाळ

******************

आलो...आ...लो.. थांबा जरा,एकसारखं दार काय ठोकताय....कोण... आपण ?

'मी राणे'....!

'हो का!मग बाहेर भिंतीवर घंटीची कळ अर्थात बटन लावलय ते नको का दाबायला दार ठोकताय तर'.....

'विद्यूतप्रवाह खंडीत झाल्या मुळे कळ अर्थात बटण दाबुनही घंटी वाजली नाही म्हणून मी दार ठोकले मग काय...'

'बरं बरं आपले येथे येण्याचे काय प्रयोजन, कशासाठी आलात आपण फक्त राणेच आहात की आणखी काही त्यापुढे नाव आहे...म्हणजे कसं आहे ते मंत्री महोदय नारायण राण्यांचे तुम्ही नातलग नसला तर मला नावाने होकारायला बरं वाटेल नाहीतर मग राणे साहेब म्हणून तुमचा सन्मान करायला बरे काय'!

'माझ नाव अजय'

'आता कस बरं या ..आत या...'आहो आपण मराठी माणस आहोत संक्षिप्तमधे नाव सागंण्याची प्रथा आपणच मोडायला नको का?नाही तर काय नाव सारखे असले म्हणजे एखाद्या व्हि आय पी कुटुंबातील आसल्याचा गैरसमज होण्याची शक्यता नाकारता येत नाही.'

'माझ्याकडे पाहुन तुम्हाला वाटंत का

 मी व्हिआयपी कुटुंबातला आसेल म्हणून'.

'आहो राणे हल्ली माणसे असण्यावर नाही तर दिसण्यावर भारी भरतात तेव्हा माणूस नेमका कोणत्या वर्गातला साधारण की व्हिआयपी! काही कळत नाही.... बरं जावू द्या तुम्ही आलात कुठून,मी आपल्याला पहिल्यांदाच बघतोय म्हणून म्हटलं आणि ओळख पटल्याशिवाय कोणत्याही खनोळखी माणसाला घरात प्रवेश द्यायचा नाही अशी तंबीच आमच्या चिरंजीवांची असल्यामुळेच मी एव्हढ्या चौकशा करतोय काय,पण तुमच्याकडे पाहुन मला तसे काही वाटले नाही म्हणून मी तुम्हाला घरात घेतला बोला आता'.....

'काही हरकत नाही,मी नेहमीच येथे येतो पण तुम्हाला पहिल्यांदाच पाहिले तुम्ही साहेबांचे वडील का'!.....

'हो तुम्ही कसे ओळखले?'

'मगाशी तुम्ही चिरंजीव असा उल्लेख केला म्हणून'.....पण साहेब काही बोलले नाही 

'पुरे आता! झालं बोलून काम सांगा'...

'मला साहेबांनीच पाठवलय देखरेखीसाठी काही घरातली कामे करण्यासाठी.....'

'का माझी अडचण व्हायला लागली की काय तुमच्या साहेबांना किंवा बाईसाहेबांना,नाही माझी काहीच हरकत नाही,तुम्ही साहेबांचाचा आदेश पाळलाच पाहीजे नाही का?पण तुम्हाला ईथे पाठवून तुमच्या साहेबांनी माझ्यावर अविश्वास दाखवलाय अस मला वाटतं.....बरं जावू द्या....उगाच मी कूटाणे घेवून बसलोय,तुम्ही काय घेणार.चहा सरबत,नाही म्हणजे तुम्ही देखरेखीला आलाता ना! तेव्हा मला तुमची खातरदारी करायलाच हवी ना! नाहीतर.तुमच्या साहेबांना कळलं म्हणजे माझ्यावर त्यांचा रोष'  

'तुम्ही रागावलात का? म्हणजे मी नको असेल तर सागंतो साहेबांना'

'छे...हो!रागावून कसं चालेल बरं' तुम्ही म्हणजे'.....

'साहेबाना व मॅडमांना नेहमीच यायला उशीर होतो तुम्हाला सोबत हवी म्हणून मी आलोय'

    'एकटे राहण्याची सवय झालो हो मला राणे,कशाला हवी कुणाची सोबत,नाहीतरी माझा व नातवंडांचा स्वयंपाक बाई करूनच जाते.तेव्हा काय खायचं आणि पडायचं,सोबतीला गप्पाष्टकांसाठी नातवंड आहेतच त्यांच्या सोबतीत मस्त दिवस निघून जातो आणि संध्याकाळी स्वयंपाकाचा त्रास नको म्हणून सकाळचं केलेला स्वयंपाक रात्री गरम करून खायचं आणि रात्र घालवायचा आणखी काय',.....

'एक विचारू का तुम्ही दुखावलेले दिसतात बाईसाहेबांकडुन दुर्लक्ष होत असेल पण साहेबांनी तरी तुमची काळजी घ्यायला हवी'

'साहेब कशाला घेतील काळजी? बायकोच्या बापाला पप्पा पप्पा म्हणून डोक्यावर मिरवणाऱ्या मुलाला स्वतःच्या बापाकडे लक्ष द्यायला वेळ नाही.'

'काही झालय का?.'

'अस म्हणतात की पैसा आला की सुख दाराशी येते आणि दुःखाचा भार कमी होतो पण सुख असुनही दुखाच्या छायेत रहावं लागतं असेल तर अस सुख काय कामाचं'

'मला वाटत तुमच्यावर खुप अन्याय झालेला दिसतो'

'चालायचचं राणे यालाचतर आयुष्य म्हणतात पण एक सांगतो,माणूस कितीही मोठो झाला तरी बापाने केलेल कर्तव्य वीसरू नये थोडीशीतरी जाणीव असावी,बायकोच ऐकून,बायकोचा उदोउदो करताना बापाने केलेल्य कष्टा विसर पडला म्हणजे माझ्यासारख्या बापला वृद्धाश्रमाशिवाय पर्याय नसतो'.

'काय सांगता?'

'प्रत्येक बापाचे काही स्वप्न असतात,आपल्या मुलाने खुप शिकावं मोठा अधिकारी व्हावा आणि सुना नातंवडंच्या सहवासात सुखाच आयुष्य घालवावं,पण ईथेच माणसाची फसगत होते'जस मनाशी ठरवतो तस काही फारस खर ठरत नाही,खरतर मला ज्या दिवशी वृद्दाश्रमात पाठवण्यात आले त्याच दिवशी मुलाला जन्माला घातल्याची चुक झाल्यासारखे वाटले,खुप देवदेव केले तेव्हा कुठे सुहासचा जन्म झाला लाडाकोडाने वाढवले सगळी हौस पुरवली स्वतः अडचणीत राहुन त्याची गौरसोय दुर केले.मुलगा कलेक्टर झाला प्रचंड आनंद झाल आणि आमच्या सुहासला श्रीमंत घरण्यातल्या मुलीच आमंत्रण आले यथा योग्य औपचारिकता पार पडली लग्न धडाक्यात पार पडले,सुनबाई सुध्दा जिल्हाधिकारी म्हटल्यावर मग कायं....आनंद आणि सुखाचे दिवे पटापट लागल्यावर समाधानाचा उजेड सर्वत्र उजळत होता,पण तुम्हाल सांगतो राणे आयुष्यात, अहंमपणा,गर्व आणि पैसा आला की सार गणित चुकतं,आमच्या बाबतीत तेच घडले.श्रीमंत घराण्यातली देखणी बायको म्हटल्यावर साटथाटमाट श्रीमंत असावा यासाठी सुनबाईच्या वडीलांनी जावाई मुलीच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला बंगलाच भेट दिला आणि त्यांच्या श्रीमंत पाहुण्यांची वर्दळ सुरू झाली,त्यावेळी आमच्या कलेक्टर सुनबाईंना आमची अडचण वाटू लागल्यामुळे आमच्या कलेक्टर मुलाने आमची रवानगी वृद्दाश्रमात केली.आमची स्वप्न,आमचे कर्तव्य सारकाही धुळीला मिळाले,आमच्या मनावर कितीतरी खोल जखमा झाल्यात,भावना मुक्या झाल्यखत अश्रु आटलेत जगणे नकोसे वाटू लागले जीवंत राहण्याची उमेदच संपली आणि या गोजिरवाण्या घराला कायचे परको झालो,पण म्हणतातना,कर्मगती काही कोणाला चुकत नाही तसेच काही राहीलेले भोग भोगल्याशिवाय आयुष्यही संपणार नव्हते म्हणून आयुष्याचा शेवट घालवायला वृद्दाश्रमाचा आधार घ्यावा लागला.'

'बापरे खुपच वाईट दिवस तुमच्यावर ओढवलेत,पण मग पुन्हा ईथे कसे येणे झाले'.

'खरतर मला यायच नव्हते पण या गोंडस नातवंडांना पाहीले आणि जगण्याची उमेद वाढली आपला मुलगा कठोर झाला म्हणून या मुल़ाच आयुष्य कोमेजून द्याच नाही आता नातवंडाचाच आधार घेवून जगायं त्यांना चांगला संस्कार द्यायचे चांगली शिकवण द्यायची,या मुलांना सुहास सारख होवू द्यायच नाही.म्हणून मी ईथे आलो,सुहासला मुलबाळ होत नव्हती म्हणून त्याच्या आईने वृद्दाश्रमातच पुजापाठ केली. प्रार्थना फळाला आली देव पावला त्यांनतर दोन नातवंड झालीत तरीही आम्हाल कळवण्याची तसदी तुमच्या साहेबांनी घेतली नाही. एकदा आमच्या सौंना सुहासला बघण्याची खुप ईच्छा झाली तेव्हा योगायोग सव्वीस जानेवारीला त्याच्या हातुन फळेवाटण्याचा कार्यक्रम होता.काही पैसे देण्याच्या बहाण्याने मी वृद्दाश्रमात आल्यावर माझी ओळख दाखवून नका किंवा ओळखण्याचा प्रयत्नही करू नका अनोळखी सारखे वाग अशी चिठ्ठी कोण्या शिपायाच्या हातुन पाठवली होती नाहीतरी आमच कोणीच नाही अस सांगुनच आश्रमात आम्ही प्रवेश मिळवला होता.तेव्हाच मात्र निमित्ताने सुहासला डोळेभरून बघता आलं आणि आमची नजर भेट झाली.त्यानंतर सुहासच्या आईने अंथरुणच धरल आणि काहीदिवसात तिने या म्हातऱ्याचा हात सोडून देवाघरी गेली.माझ्या अश्रमातल्या नातेवाईकांनीच अखेची विधी पुर्ण केली.पण ती शेवटपर्यंत मला सागंत राहीली,सुहासची काळजी घ्या त्याच्याकडे लक्ष ठेवा चोरून लपून आश्रमाबाहेर जावून फोनवर त्याची विचारपूस करत जा,तुमच्याशिवाय त्याला कोणीच नाही.एव्हढा त्रास सहण करूनही मुलासाठी ती व्याकुळ व्हायची कारण ती आई होती आणि मातृत्व काय असतं हे फक्त आईच समजु शकते आणि त्याच्यासाठी आई व्हाव लागंत'.

'खरच तुम्ही महान आहात आणि तुमच्या सहनशीलतेला साष्टांग नमस्कार करतो ईतका अपमान सहण करूनही मुलावरच प्रेम जराही कमी झालं नाही,मला वडिल नाहीत पण तुमच्यासारखे वडिल असते तर मी त्यांना पालखीतून मिरवले असते. या जन्मात नाही पण पुढल्या जन्मात तुम्ही माझे वडिल व्हावेत अशी प्रार्थना मी देवाजवळ निश्चित करेलं'

'आईवडीलांच प्रेम समजायला हळवं मनं लागत कठोर मनाला आईवडीलांच्या प्रेमाची तिव्रता नाही कळायची आम्ही काय अडगळीतले म्हातारे' गरज वाटली की उपयोग करायचा,गरज संपली की कुठेतरी फेकुन द्यायचं,आता नातवंड मोठी झालीत त्यांना सांभाळायला कोणीतरी आपल माणूस पाहीजे म्हणून सुहासने शिपायाकडून मिळालेल्या निरोपावर मी आश्रम सोडून परत येथे आलो'.

''पण तुम्ही काहीही म्हणा आजी आजोबांशिवाय घराला घरपण येत नाही.माणूस वृद्ध झाला म्हणून काय झालं त्याच्या प्रेमानेच तर घरात आनंद फुलत असतो,आईवडीलांसारखे देवत कुठेच नाही. पैशापेक्षा माणूस फार महत्वाचा असतो पैशाने नातीगोती मिळत नाही मिळतात ते आपलेपणातून,प्रेमाने'

'राणे तुम्ही लाख मोलाच बोललात,जगण्यासाठी पैसा तर हवाच पण त्यासाठी नातीगोती विसरायची नाहीतं पैशासाठी जगण्यापेक्षा आपल्या माणसांसाठी जगा.जेथे माणूसकिचा झरा आटतो तेथे प्रेमाचा ओहळ पुन्हा कधीच वाहत नाही.जावू द्या मी उगाच माझी व्यथा तुम्हाला सांगत बसलो'.

'नाही हो मन हलकं करायला कुठेतरी जागा हवीच ना आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असा प्रसंग येतच असतो,दुसऱ्याला दुःख देवून स्वतः सुखात राहणारा माणूस कधीच मोठा नसतो पण दुःख सहन करून दुसऱ्यांना सुख देणाऱ्या माणसाची महानता काही औरचं असते.'

'खर आहे राणे,त्यागान बळ मिळत पण आपलीच माणस बदलतांना पाहून खुप दुःख होत.जाताजाता आमची ही मला हेच शिकवून गेली म्हणून मी ठरवलं की या माझ्या नातवंडांना तरी त्यांच्या बापासारख होवू द्यायच नाही.आणि काहीही झाल तरी या मुलांनी त्यांचा आदर करावा,त्यांनी केलेल्या कर्तव्याची जाणिव ठेवावी अशी शिकवण मी त्यांना देतोय.आमचे जे हाल झालेत तसे माझ्या मुलाचे व सुनेचे होवू नये.किरण प्रत्येक कुटुंबात वृद्दांचा सन्मान व्हावीत म्हणजे माणूसकीच,प्रेमाच नातं घट्ट होईलं.या घरात सुख समृद्धी रहावी म्हणूनच मी आश्रमाच्या पाऊलवाटेने या घरट्यात परतलो या पाखरांना सांभाळायला.या गोजीरवाण्या घरात या माझ्या नातंवंडाना प्रेमाने मोठ करायला.चला राणे जावूद्या खुप वेळ झाला तुमचे साहेब येण्याची वेळ झाली'......


*संजय धनगव्हाळ*

९४२८९२६१८

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...