शर्यत जगण्याची - बोधकथा






रविवारची सुट्टी  होती म्हणून एका  मित्राच्या घरी गेलो होतो._
_आम्ही गप्पा मारत बसलो होतो इतक्यातच त्याचा मुलगा आला._

_" काय रे कुठं गेला होतास ? " मी विचारलं._

_" क्लासला." एवढा एकच  शब्द बोलून तो आपल्या खोलीत निघून गेला._
_त्याच्या वडिलांनी नंतर त्याला हाक मारली_
_" अरे ये ना , काका आलेत बघ." "ते काय म्हणतात ते तर बघ ." वगैरे म्हणून बऱ्याच हाका मारल्या तरी तो बाहेर आला नाही._

_" काय बिघडलंय ? " मी विचारलं._

_" आज सहामाहीचे मार्क कळले ना ! दोन विषयांत नंबर हुकलाय ! " त्याची आई हसत हसत म्हणाली._

_" मग काय झालं ? " मी म्हटलं , " एखाद्या विषयात चार दोन मार्क कमी पडले तर बिघडलं कुठं ? "_

_" ते आपल्याला झालं! त्याचं तसं नाही._
_एखाद्या विषयात एखादा गुण कमी मिळाला किंवा एखाद्या विषयातला नंबर चुकला तरी त्याला तो पराजय वाटतो."_

_" चुकीचं आहे हे !" मी म्हटलं," तो कुठले खेळ वगैरे खेळत नाही काय ?"_

_" मुळीच नाही." त्याची आई बोलली ,"_
 _तो अभ्यास सोडून दुसरं काहीही करत नाही आणि आम्हीही त्याला कधी बाहेर सोडत नाही._
_उगाचच वेळ वाया जातो._
_खेळून काय होणार आहे ?_  _गल्लीतली पोरंही  टवाळ आहेत._
_त्यांच्यात मिसळून आमचंही पोर  बिघडायचं !...._
_त्यापेक्षा घरच्या घरी अभ्यास केला  तर काय वाईट ?"_

_" चुकीचं बोलत आहात वहिनी ! " मी म्हटलं ,_
_" माझं मत जरा उलटं आहे. मुलांनी  अभ्यास थोड़ा कमी केला तरी चालेल पण खेळ भरपूर खेळले पाहीजेत असं माझं मत आहे."_

_" खेळ खेळून सगळीच मुलं तेंडुलकर किंवा सानिया मिर्झासारखी चँपियन होत नसतात म्हटलं ! " माझा मित्र म्हणाला._

_मी हसलो._

_"का हसलास ?" माझ्या मित्रानं विचारलं._

_" प्रत्येकानं चँपियन होण्यासाठीच खेळ खेळायचा असतो  हे तुम्हांला कुणी सांगितलं ? " मी विचारलं._

_" मग कशासाठी ? हरण्यासाठी ? " माझा मित्र उपहासाने बोलला._

_" बरोबर बोललास ! " मी म्हटलं ,"_
 _खेळ म्हटला की हरणे आणि जिंकणे या दोन्ही गोष्टी आल्याच._
_एक खेळाडू जिंकला तर दुसरा हा हरणारच._
_आपण मोठ्या माणसांनी मुलांना जिंकायला शिकवण्याबरोबरच त्यांना हरायलाही शिकवलं पाहिजे._
_आपण विजय जसा जल्लोषात साजरा करतो तसाच पराभवही खिलाडूवृत्तीनं स्वीकारला पाहिजे._
 _आपल्या मुलांना जिंकण्याची सवय नसली तरी चालेल पण हरण्याची सवय पाहिजे. ......._
_प्रत्येक वेळी मीच जिंकणार असं  म्हटलं तर कसं चालेल ?_
_फक्त जिंकण्याची सवय लागलेली मुलं पुढच्या आयुष्यात  एवढ्या तेवढ्या अपयशानं खचून जातात._
 _आत्महत्या करायला उठतात , कधी कधी करतातही !_
_आज तुमचा मुलगा सहामाहीमध्ये मागे पडला म्हणून नाराज आहे._

_उद्या जीवनाच्या मोठ्या परीक्षेत तो मागे पडला  तर ? ....._
_त्याचा प्रेमभंग झाला तर ?...._
_त्याला कुणी फसवलं तर ?_
_जगू शकेल तो ? " मी विचारलं._

_"तुझं तर काहीतरीच !"_

_" हो ना ! माझ्या मुलाला मार्क कमी पडले तर तो रडत किंवा कुढत बसत नाही._
_प्रतिस्पर्ध्याचं तो अभिनंदन करतो , हसत हसत ......_

_माझं आणखी एक निरीक्षण आहे, गल्लीत जी पोरं आज तुम्हांला टवाळ वाटतात ना तीच जगण्याच्या शर्यतीत उद्या जिंकणार आहेत....._

_कारण त्यांना पराजय पचवणं खूप सोपं जातं !_ .....

*जो खिलाडूवृत्तीनं पराभव स्वीकारतो तोच या जगात यशस्वी होतो."*

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !