◼️ ललित लेख :- आयुष्यात शनीची साडेसाती गरजेची...
साडेसाती भोगलेली माणसं ही नंतर नक्कीच यशस्वी होतात. संगीत क्षेत्र नाट्यक्षेत्र, खेळाडू क्षेत्र, यामध्ये यश साडेसाती मध्ये मिळालेली आहे. (पंडित भीमसेन जोशी, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकरने वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केले, यां सर्वांना उत्कृष्ट पुरस्कार मिळाले साडेसाती मध्येच.
भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी साडेसाती मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले.
चटका बसलेला माणूस ताकही फुंकून पितो, म्हणजे येणाऱ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट सावधानपणे केली पाहिजे याची जाणीव साडेसातीच करून देते. खरं कोण खोटं कोण याचा उलगडा करते. साडेसाती मध्ये होणारे आघात हे माणसाचे मन बळकट करतात. म्हणूनच माणूस चांगल्या काळात येणाऱ्या बारीक-सारीक संकटांना तोंड देऊ शकतो.
या जगात बरेच सक्सेसफुल माणसे म्हणतात, मला या जगाने खूप काही शिकवले, ते फक्त साडेसाती मुळेच असते. मन सशक्त करते आणी संकटांना न घाबरण्याची बळही साडेसाती देते. साडेसाती माणसाला कष्टावर विश्वास ठेवायला शिकवते ना की नशीबावर. साडेसाती माणसाला प्रपंचातील इतर माणसांची लबाडी ओळखायला शिकवते. तात्कालिक खोट्या भ्रमा मधून बाहेर काढते.
प्रत्येक संधी, जी वाट पाहायला शिकवते आणि त्यातूनच माणसांमध्ये सहन शक्ती निर्माण होते. चांगल्या चंद्रावर बदललेला शनि हा साडेसाती मध्ये उत्तमच फळे देतो. साडेसातीत एकदा तरी राशीला अकरावा गुरू येऊन जातो. तो शनीच्या अंमलाखाली असतो आणि हा आयुष्यभर टिकतील अशी चांगली फळे देतो. (ह्या मध्ये उच्च शिक्षण होणे, स्वतः चे घर होणे, स्थावर मालमत्ता मिळणे, अचानकपणे धन लाभ होणे, उत्तम नोकरी मिळणे, प्रमोशन होणे, अडकलेले काम मार्गी लागने इत्यादी कामे पूर्ण होतात)
साडेसाती चालू असली तरीही जन्म कुंडलीत शनीवर गुरुची दृष्टी असेल तर ती साडेसाती चांगली फळे देते. साडेसाती मध्ये जेमतेम 18 महीने त्रास होतो. त्यातीलही बरेच महिने त्रास होणे, पुन्हा त्रास न होणे, त्रास होणे, पुन्हा त्रास न होणे, असे चढ-उतार चालू राहतात. ह्यामधून माणसाला आयुष्यातील चढ-उतार सोसून प्रपंच कसा चालवायचा याचे शिक्षण मिळत असते.
भविष्यात येणाऱ्या उत्तम संधींमध्ये आपले मन सशक्त बनवण्यासाठी शनी आपल्याला साडेसाती मध्ये वेगवेगळ्या लीला दाखवतो. उदाहरणार्थ एक भिकारी अचानक श्रीमंत होतो. त्याला पैशाची किंमत कळते, कारण त्याला शनीने भिकारी पणात पैशाची किंमत समजावलेली असते. त्यामुळे साडे सात वर्षाची साडेसाती ही भविष्यात प्रपंच कसा चालवायचा हे शिकून जाते. आणि माणूस पुढे येणाऱ्या चांगल्या काळात सावधानतेने प्रपंच करतो.
आयुष्यात थोडं तरी संकट असलंच पाहिजे. कारण सारखंच गोड खाल्लं तर डायबेटिस होतो. म्हणून साडेसातीची गरजेची आहे. आयुष्यात तीन साडेसाती भोगलेला माणूस परमार्थाला लागतो. सद्गुरू भेट आत्मज्ञान हे साडेसातीच होते.
साडेसातीचा सकारात्मक विचार आणि अनुभव.
📝
प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर.
9028585788
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
अप्रतिम विचार
ReplyDelete