◼️ Bill gates :- एक प्रेरणादायक व्यक्तिमत्व
🎂 'मायक्रोसॉफ्ट’चे सहनिर्माते बिल गेट्स यांचा आज ६५ वा वाढदिवस. त्यांना लाख लाख शुभेच्छा!
बिल गेट्स हे अमेरिकन बिझिनेसमन, संशोधक, संगणक प्रोग्रामर आणि इन्व्हेस्टर आहेत. त्यांच्याकडे एकही पदवी नसून ते सध्या जगातले तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी २०व्या वर्षीच एका लहान गॅरेज मध्ये पॉल ॲलन सोबत ‘मायक्रोसॉफ्ट’ नावाची सॉफ्टवेअर कंपनी सुरु केली होती, जी आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपनी म्हणून ओळखली जाते. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे १९८७ पासून ‘फोर्ब्ज’ या मासिकाने सादर केलेल्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या प्रत्येक यादीत त्यांचे नाव असून, १९९५ पासून २०१७ पर्यंत फक्त चार वर्षे सोडून ते यादीत पहिल्या क्रमांकावर होते. ऑक्टोबर २०१७ मध्ये ॲमेझॉनच्या जेफ बेझोस यांनी त्यांना मागे टाकले. आज बेझोस यांची संपत्ती १९३.१ अब्ज डॉलर्स असून गेट्स यांची संपत्ती ११४.८ अब्ज डॉलर्स आहे.
गेट्स यांच्याबद्दल जितके बोलावे तितके थिटेच पडेल, अशी प्रचंड कमगिरी त्यांनी करून दाखवली आहे. अर्थात आर्थिक श्रीमंती हेच गेट्स यांचे मोठेपण नाही. इतकी मोठी कंपनी अमेरिकेच्या पश्चिम बाजूच्या सिएटल शहरातून चालवत असतानाच गेट्स यांनी जनकल्याणाचाही ध्यास धरला. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहणाऱ्या मुलांना उचित शिक्षण मिळावे व त्यांची विचारशक्ती शास्त्रशुद्ध बनावी, यासाठी गेट्स पती-पत्नी सतत जगभर फिरून गेट्स फाउंडेशनच्या माध्यमातून गरजूंना मदत देत असतात. गेट्स भारतातही अधून मधून येतात. त्यांच्या मदतीतून उभ्या राहिलेल्या अनेक संस्था दिल्ली, हैदराबाद, बंगलोर, चेन्नईच्या आसपास कार्यरत आहेत.
बिल गेट्स यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात काही अशा गोष्टी ( नियम) सांगितल्या ज्या कोणत्याही शाळेत शिकविल्या जात नाहीत.
नियम १ - आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या.
नियम २ - जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.
नियम ३ - कॉलेजमधून बाहेर पडल्या-पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी व्हाईस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात.
नियम ४ - आज कदाचित तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भीतीदायक वाटत असतील, कारण अजून बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय.
नियम ५ - तुम्ही केलेली चूक ही सर्वस्वी तुमची चूक आहे आणि तुमचा पराजय ह सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देऊ नका, झालेल्या चुकीपासून धडा घ्या आणि पुढे चालत रहा.
नियम ६ - तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळवाणे आणि अरसिक नव्हते जेवढे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचेच संगोपन करण्याठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा झाला आहे.
नियम ७ - उत्तेजनार्थ पारितोषिक हा प्रकार फक्त शाळेतच पहायला मिळतो. काही शाळांमध्ये तर अगदी पास होईपर्यंत परीक्षा देता येते. बाहेरच्या जगातील पद्धत मात्र वेगळीच असते. खऱ्या जगात हरणाऱ्याला कोणीही दुसरी संधी देण्यास तयार नसतो.
नियम ८ - आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महिन्याची सुट्टी नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नवीन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.
नियम ९ - टीव्हीवरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्हीवरची सीरियल नसते. खरया आयुष्यात आराम नसतो, असते ते फक्त काम आणि काम.
नियम १० - सतत अभ्यास करणाऱ्या आणि अपार मेहनत करणारया तुमच्या मित्रांना चिडवू नका. एक दिवस असा येईल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल
नियम ११ - आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत. एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते.
🎊🎊🎊
खुप सुंदर . आवडलं .
ReplyDelete