आत्मपरीक्षण - मराठीचे शिलेदार समूहावर 10 ऑक्टोबर 2020 ला प्रकाशित झालेल्या कविता



 आत्मपरीक्षण 

 या करायची आली जेव्हा वेळ 

तेव्हा विचारांचा बसेना मनाशी मेळ 


 गुणांची माझ्या बेरीज होऊ लागली 

अवगुणांची बाकी शून्य आली


 वाणीतल्या गोडव्याने जणू माझी साखर वाढली 

साखरेच्या वाढीने आरोग्याची घडी ढासळली 


 माझ्या हुशारीने जरी वाढवली माझी तरतरी 

कळले मला हुशारी पेक्षा सरस असते दुनियादारी


 आत्मपरिक्षण करताना कळली सत्वपरीक्षेची किंमत

 स्वतःलाच श्रेष्ठ म्हणण्याची गळून पडली हिम्मत


 उमगले मला मग गुपित माझ्या मनीचे

 कर्म करीत असताना चूक बरोबर हे आपण नाही ठरवायचे


 सौ अनिता व्यवहारे

 ता श्रीरामपूर जि अहमदनगर

 सदस्य मराठीचे शिलेदार समूह


शब्दांना शब्दांत 

गुंफून देवूया साज

मनानेच ठरवले स्वः

आत्मपरिक्षण करु आज


चांगले आणि वाईट

विचारांची करुया छाननी

दोन विभाग पाडून

करु पध्दतशीर मांडणी


दुर्गुणांची वाढली 

लांबलचक यादी

सदगुणांनपेक्षा त्यांनी

">मारली जोरदार बाजी


क्रोधीत देहाला

 हवी आहे मनःशांती

सत्संग, सद्विचाराने

षडरिपूंनवर होईल क्रांती


ह्दयाच्या अंतर्मनात

राग,व्देष यांचा पहारा

शांती,समजुतदारपणा

यांचा लागत नाही थारा


सौ.मनिषा दिपक सामनेरकर

               पालघर

सदस्य मराठीचे शिलेदार समूह


स्वतःच्या वृत्ती प्रवृत्तीकडे

तटस्थपणे पहायला हवे

आयुष्यात कधी ना कधी

आत्मपरीक्षण करायला हवे... //


एकांतवासी जाऊन स्वतःत

थोडे डोकावून बघायला हवे 

किती जोडले किती तोडले 

हिशेब सारे लागायला हवे... //


सारासार विवेक बुद्धीचे 

कौल तुला मानायला हवे 

किती केली फुकाची प्रौढी 

थोडे तरी जाणायला हवे.... //


किती मावेल इवल्या मुठीत 

मोहास थोडे टाळायला हवे 

येथे खाली हात येणे जाणे 

हेच खरे वर्म कळायला हवे... //


स्वतःसाठी सगळेच जगतात 

थोडे इतरांसाठी मरायला हवे 

सरणात देह जळून गेला तरी 

स्मरणात कायम उरायला हवे... //


येथे कफन नावाच्या वस्त्राला 

नसतो खिसा समजायला हवे 

जीवन जिविताचे साध्य साधन 

वेळीच तुला उमजायला हवे... //


विष्णू संकपाळ बजाजनगर औरंगाबाद

©सदस्य मराठीचे शिलेदार समूह


आत्मपरीक्षण करावया

सज्ज हो मानवा

पारख स्वत:चेच 

अवगुण दानवा.


स्वत:चीच फुशारकी

प्रत्येक ठिकाणी करतो

तत्त्वज्ञानाच्या गोष्टी

दुसऱ्याला शिकवितो.


सद्विचारांचे आचरण

करावया टाळतोस

विनाकारण दुसऱ्याकडून

अपेक्षा बाळगतोस.


येते जव स्वत:वर

आत्मपरीक्षणाची वेळ

मनाला बोचतेय

दुर्गुणांची झळ.


डोळे उघड आता

हो मानव जागा

परिवर्तन कर स्वत:त

मनावर ठेव ताबा.


परबंधन लादण्याअगोदर

स्वमनाचा घे ठाव

करू नकोस नुसती

पदोपदी स्वार्थाची हाव.


✍️ श्रीमती सुजाता पाटील.

सिलवासा दादरा नगर हवेली.

सदस्या मराठीचे शिलेदार समूह.

..आत्मपरीक्षण...

आयुष्यात भरपूर काम

झालेले असते पण केलेल्या

कामाचे आत्मपरीक्षण करावे

लागे केलेले काम सार्थ झाले

तरी त्याचे आत्मपरीक्षण होईल

असे नाही आत्मपरीक्षणासाठी

स्वतःच आरसा बनावा लागले

त्यात दिसणारे प्रतिबिंब म्हणजे

केलेल्या कामाचे ज्ञानफळे होय

या ज्ञान फळातूनी बिज रोपण

होऊन अमृत रुपी फळे निर्माण

होतात अन् जीवन सार्थ झाल्याचे

समाधान प्राप्त होई हे ज्ञान पूर्ण

त्वासाठी घेतो ते ज्ञान इतरांसाठी

राखून ठेवायचे असते स्वतः चे

गुण अवगुण स्वतः लाच सांगितले

आत्मपरीक्षण कर तू स्वतः च अन्

परिमार्जन करुनी जीवन सुखकर

बनव .....


सौ कुसुम पाटील कसबा बावडा

कोल्हापूर

©Qसदस्य मराठी चे शिलेदार समूह


दुस-यांकडे बोट दावण्यापेक्षा

करावे स्वतःने स्वतःचे आत्मपरीक्षण 

सगळ्यांनी तेच तेच  सांगण्यापेक्षा 

समजावे खरे स्वने स्वतःचे  निरीक्षण...!!१!!


दुस-यांना काय कळते आपणच शहाणे

माणसा सारखा असून माणूस 

वागतो दिड शहाण्या सारखा बारा महिने

उबवीत आपली बुध्दी मांडत इतरांपुढे गा-हाणे...!!२!!


आयुष्य जीवन सा-यांना सारखे असते

उगी नावे ठेऊन टोमणे मारून

हळूच चिमटा काढून

मर्म स्थळावर घाव करुन असते डिवचने चालू

मीच सर्वात मोठा हेच लक्षण बुध्दिचे दिवाळखोरी जाऊन...!!३!!


जेव्हा दाखविते दुस-याकडे एक बोट तेंव्हाच 

चार बोटे आपल्याकडे वळलेली असतात आत्मपरीक्षणासाठी

पोटात ठेवून मोठ्या गाठी ओठावर शब्दाची ओहोटी 

अशांपुढे घालती लोटांगण माणसे खोटीनाठी...!!४!!


©️✍️..

*मा.kvकल्याण राऊतसर* 

मराठवाडाप्रदेश लातूर 

©️मराठीचे शिलेदार 

9421372689


 स्वत:ला जाणण्याचे साधन

 एकमेव ते आत्मपरीक्षण

 दिलेला शब्द पाळण्यातच

 दिसते आपले मोठेपण ॥


 राग,लोभ,द्वेष,मद,ईर्ष्या

 मत्सरादी षडरिपू टाळू

 आनंदाची देवाण घेवाण

  करूनी स्नेहसंबंध पाळू ॥

 

 सकारात्मक वृत्ती असावी

 नेहमी वर्तन विचारात 

 आत्मपरीक्षण विचाराचे

 करूनी घ्यावे आचरणात ॥


 निस्वार्थ भावनेने करावे

 नियमीत परम कर्तव्य

 दातृत्वाचे गुण दाखवुनी

 अहंकाराचा नको व्यत्यय ॥


 आत्मपरीक्षण सहेतुक

 व्हावे परिपूर्ण फलदायी

 शक्तीस्थाने,त्रुटी कळताच

 संभाव्य धोके निचरा होई ॥


 दत्ता काजळे (ज्ञानाग्रज)

 उस्मानाबाद

©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह


नको नको रे शोधू माणसा तू

दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ

कधी दिसणार तुला सांग बरं

तुझ्या दुर्गुणांचे ते मोठे मुसळ...//


बिनपगारी फुल अधिकारी

शेजाऱ्यांचा तू रखवालदार

स्वतःच्या भाकरी भाजायच्या

सोडून दुसऱ्याचा कारभार...//


स्वार्थासाठी बनून दानव तू

केलीस भरमसाठ जंगलतोड 

मोडलेस निष्पाप पक्षी घरटे

असुरी कृत्याला नाही जोड...//


सख्या भावाचा खून करतोस

जन्मदाते धाडतो वृद्धाश्रमात

खुर्चीसाठी दंगल जाळपोळ

जातीयतेने करतो रक्तपात...//


कोणासाठी आणि का करतो

वर्तन असे तू रे दानवापरी

आत्मपरीक्षण केलेस जर तू

पसरेल कीर्ती वाल्मीकीपरी...//


सौ-राजश्रीताई मिसाळ ढाकणे 

 कवयित्री/लेखिका/सदस्य

 मराठीचे शिलेदार समूह

   

कह्याचं काय मनाला पाय

आत्मपरीक्षणा शिवाय कळायाचं नाय...१


खोट्याचं नाटं मन नाही मोठं

दुस-यांना नावं ठेऊन वाढतंय देठं...२


बोलावं तसं चालावं म्हणं माणसानं

उपदेश करुन फुकटचा निर्मळ नाही अंतःकरण...३


झाकली मुठ सव्वालाखाची उगीचं म्हणायचं

दोष लपवून ठेऊन कसं लोका सांगायचं...४


स्वतःच्या चुका लोकांना लावून थुका

आत्मपरीक्षण करण्याविना म्हणे मुका घ्या मुका...५


खरंच माणसानं स्वतःचे केले आत्मपरीक्षण तर

दुनियादारी सुखी होईल अशांनी खरोखर....६


अहंकार म्हणे माणसाला टाकतो मारुन

आत्मपरीक्षण केले तर सारं जग नाव घेईन...७


दुस-या बाबतीतही करावा विचार सकारात्मक जरा

स्व मनाला बोलून सारा हिशोब चुकता करा....८


©️✍️..

मा.kvकल्याण राऊतसर 

मराठवाडाप्रदेश लातूर 

©️मराठीचे शिलेदार

9421372689


 (अष्टाक्षरी काव्यरचना)


ठाव तो अंतर्मनाचा 

लगाम रे दुर्गुणांचा

आत्मपरीक्षण जणू

फोटो काढतो आत्म्याचा...!!


षड विकार मनीचे

सारे देहात दडले

आत्मपरीक्षण जादू

सर्व शोधून काढले....!!


जाती पळून दुर्गुण

दिसे सतेज चेहरा 

आत्मपरीक्षण हाच

फक्त रामबाण खरा...!!


बंध जुळवी नात्यांचे

नसे स्वार्थ दडलेला

आत्मपरीक्षण जणू

धागा अतूट जोडला...!!


त्रुटी शोधून स्वतःच

यश खेचून आणतो

आत्मपरीक्षण गुरू

मार्गदर्शन करतो...!!


*सौ-राजश्रीताई मिसाळ ढाकणे*  

 *कवयित्री/लेखिका/सदस्या* 

 *मराठीचे शिलेदार 8*

शांत,निर्जन स्थळी एकदा

सहज करू आत्मपरीक्षण

निसर्ग सानिध्यात उलगडू

विचारांत गुंतलेले अंतर्मन

बोलतो  तसं  करतोय का

लिहीतो तसं वागतोय का

कवी मनातून रेखाटले जे

आचरणी  उतरवतोय का

खूप  खूप सोपं असे जगी

इतरांस उपदेश देत सुटणे

दोष  झाकुनी स्वत:च्याच

चुकांवर  पांघरूण घालणे

जमवुया  अचुक ताळमेळ

प्रतिसाद अन् प्रतिक्रियेचा

आत्म प्रवासाने  शोध घेवू

स्व सामर्थ्यासह दुर्बलतेचा

धावत्या पावलांनाही सांगू

कुठे  असायला हवा थांबा

वाचन चिंतन मनन करून

अवगुणांवर  मिळवू  ताबा

अवीट ताजेपणानं भरलेलं

आयुष्य होईल काव्यात्मक

उत्कट आनंदानुभुतीस ठरे

आत्मपरीक्षण हे संजीवक


 मीता नानवट‌‌‌कर नागपूर

 सदस्या मराठीचे शिलेदार समूह

    

परिक्षण निरीक्षण करावे माणसाने

शोध घ्यावा त्याचा ख-याखु-या अर्थाने....१


दुस-याच्या गोष्टीत उगी नाक खुपसतो

चांगले चांगले उपदेश सुध्दा त्याला करतो...२.


वाग म्हणतो चांगला समाज नावे ठेवेल

सारे जणू सुसंस्कार याच्यावर कोरले म्हणेल...३.


जिथे याचेच जमत नाही घरा आई वडिलांशी

बहिण भावसी भांडण सदा असे नेमाशी..४.


म्हण अशीच आहे स्वच्या डोळ्यातील दिसत नाही मुसळ

शोधत फिरतो गावात इतरांच्या डोळ्यातील कुसळ...५


काही जणांना नादच असतो नावे ठेवणे

असो मग कोणी जवळचे लांबचे पाहुणे...६


आत्मपरीक्षण करण्याचे सांगे दुस-यांना

जणु स्वतः नापाक आहे असा कसा आला जमाना...७


स्वचे अवगुण सारे ठेवायाचे झाकून

दुस-यांचे पाहण्याची चढाओढ उगीच वाकून...८


आयुष्यात सदाचे रहावे आपण आपले साफ

उगीच तोंडाची जिरवु नये वाफ...९


©️✍️...

*मा.kvकल्याण राऊतसर* 

मराठवाडाप्रदेश लातूर 

©️मराठीचे शिलेदार 

9421372689


सुंदर रूप कसे लाभावे हे

नसतेच मानवाच्या हाती

वर्तवणूक, सुस्वभाव यांचे

मापदंड अमूल्य आहे जगती

कायम असावे वास्तवाचे भान

नसल्याचा का हव्यास हवा

समाधान ते असावे चित्ती

परोपकारी वृत्तीचा कयास ठेवा

गरजा कधीच न संपणाऱ्या

त्यासाठी होऊ नये भ्रष्ट

सत्याची धरून कास

मनी असावे परमसंतुष्ट

मनच असतो खरा आरसा

करण्यासाठी आत्मपरीक्षण

नाशवंत अवघा मानवदेह

पण आत्मशक्ती विलक्षण

शुद्ध ठेवा सदविचारांनी मन

तरचं होईल आत्मशक्तीचे दर्शन...

तरचं होईल आत्मशक्तीचे दर्शन.


     सौ अनुराधा भुरे,नांदेड

©सदस्या मराठीचे शिलेदार समूह


 (षडाक्षरी काव्यरचना) 


वेळ आता आली

बघ अंतर्मन

आत्मपरीक्षण

आरसा वर्तन.....१


निसर्ग कोपला

तुझ्या वर्तनाने

कोरोना विषाणू

धाडलाय त्याने.....२


डांबले घरात

कैक गेले बळी

निसर्गावर तू

भाजू नको पोळी...३


कृष्ण कृत्य आता

तरी थांबव रे

आत्मपरीक्षण

मानवा कर रे.....४


सौ-राजश्रीताई मिसाळ ढाकणे  

 कवयित्री/लेखिका/सदस्या 

 मराठीचे शिलेदार समूह


 (साताक्षरी काव्यरचना)


आत्मपरीक्षण हे

वेळोवेळी करावे

सान थोर अगदी

सर्वांनीच करावे...//


दुर्गुण नष्टतेने

देहास उजळावे

सद्गुण सतत

वाढतच राहावे...//


दोष लपले सर्व

खेचून काढावेत

बजावून ठेवावे

परत न येवोत....//


यशस्वी होण्यासाठी

आत्मपरीक्षण रे

जीवन लढाईत

जणू सारथीच रे...//


सौ-राजश्रीताई मिसाळ ढाकणे  

 कवयित्री/लेखिका/सदस्या

 मराठीचे शिलेदार समूह


नारी जन्म पूजनीय

फक्त लिहिला ग्रंथात

जन्म जातो नारींचा

धुणी भांडी करण्यात...१


संसाराची दोन चाके

पती पत्नी म्हणतात

नौकरी करून का बरे

घरकाम करून घेतात...२


पुरुषप्रधान संस्कृती

सर्वत्र मनमानी दिसे 

कर्तृत्वाने गगन व्यापी

स्वतःसाठी वेळ नसे....३


आत्मपरीक्षण करावे

समस्त पुरुष बांधवांनी

नारी माणूस आहे हे

असू द्यावे ध्यानीमनी...४


सौ-राजश्रीताई मिसाळ ढाकणे  

 कवयित्री/लेखिका/सदस्या

 मराठीचे शिलेदार समूह


निंदकाचे घर असावे शेजारी 

त्यांनी काढलेल्या चुका

आत्मपरीक्षणाने दूर करी .........

ऐकवटून आत्मबळ 

मी पण चुकतो 

हे स्वीकारावे अंतरमनाने ....... 

मनाच्या तराजूच्या पारड्यात 

गुण अवगुणांना मोजुनीया 

करावा लेखा जोखा ........

अवगुण करत आणावे कमी

अन् सद्सद् विवेक बुद्धीने 

वाढवावे सद्गुण जीवणी.......

खोटे बोलत जातो 

एक चुक लपविण्यासाठी 

जिव्हेला लागते चटक 

तशीच पलटण्याची .......

समोरच्याला काहीही कळत नाही 

ही आपली विचारसरणी......... 

कधी एकांतात बसुनी 

करावे आत्मपरीक्षण अन्

बघावे बोलुन खोट स्वतःशीच..........

जर तुझ्या अंतःकरणाला लागेल चटका 

तेव्हाच स्वतःला सुधारणे होई शक्य 

अन्यथा तुला बदलविने

ब्रम्हदेवालाही अशक्य अशक्य अशक्य....  


सौ रुपाली म्हस्के गडचिरोली

 सदस्या मराठीचे शिलेदार समूह


आपलं ते असते सत्य 

दुस-यांचं असते मिथ्य 

पालथं घातलं आभाळ

वाटत नाही यांना तथ्य 


हेच मारती टोमणे इथे 

तुम्ही यांचच सारं ऐका 

शहाणपणही यांच विकतं 

ज्यांचेजवळ असते पैका 


आत्मपरीक्षण करण्याची 

गरज यांनाच असते खरी 

पाहती हे अवगुण जनांचे 

स्वत: दोषांचे हो व्यापारी 


आत्मपरीक्षणाची गरज 

इथे प्रत्येकाला हो आहे 

मन देईल ग्वाही ज्यांचं 

तो सज्जन बणुनी राही


आत्मपरीक्षणाची लस 

इथे कोण बरं टोचतोय 

नावही जो घेतो याचं 

तो प्रत्येकाला हो बोचतोय.


श्री.अरुण चांदेवार नागपुर

©सदस्य मराठीचे शिलेदार समुह


गरज आहे आत्मपरीक्षण करण्याची

आणि स्वतःचे अंगचे

गुण अवगुण न्याहळण्याची


आपण काय खरे बोललो काय चूक 

आत्मपरीक्षण केल्याशिवाय 

नाही कळत किती मोठी 

केली आहे आपण घोडचूक


आपल्याला कळत नाही 

कधी केला कुणाचा विश्वासघात

आणि मनावर त्या सगळ्याचा

होतो मोठा आघात


कधी कधी वाटतं कशाला

कोणावर इतकं प्रेम करायचं असत

की ज्या माणसांना कळत नसेल

प्रेम म्हणजे नक्की काय असतं


म्हणून च सांगते तुम्हाला 

आत्मपरीक्षण करायला शिका

म्हणजे कोणी लावणार नाही

तुम्हाला कधी थुका


मिलन भूपेन डोरले पुणे

© सदस्य मराठीचे शिलेदार समूह


सावित्रीची वारसदार तू

घेतलीस गगनभरारी तू

नाहीस अबला आता तू

बन आत्मनिर्भर नारी तू....//


मायबापाची शान आहे तू

अंगी बान संस्कार नारी तू

सासू सासरे नणंद दीर बन

साऱ्यांचा जणू श्वास तू......//


नको राहुस अबला तू

आत्मरक्षण तुझे कर तू

बन झाशीची राणी तू

नाराधमांचा कर संहार तू ...//


आत्मपरीक्षण करून तू

स्वतःला सिद्ध कर तू

भारतमातेला गर्व वाटेल

असे अतुलनिय कार्य कर तू...//


सौ-राजश्रीताई मिसाळ ढाकणे

 कवयित्री/लेखिका/सदस्या

 मराठीचे शिलेदार समूह

   

 अभ्यास करावा

 स्वत:च स्वत:चा

 आत्मपरीक्षण

 बोध वर्तनाचा ॥

 कधी हसवेल

 कधी रडवेल

 नियती खूपदा

 सारे शिकवेल ॥

 गुरुविना ज्ञान

 प्राप्ती ही असाध्य

 आत्मपरीक्षणे

 होईल सुसाध्य ॥

 ज्ञानाची शिदोरी

 वाटतच जावे

 कर्तव्यकर्माला

 कधी न चुकावे ॥

 आत्मपरीक्षण

 नित्य ते करावे

 सज्जन संगती

 नेमाने धरावे ॥

 सत्याचा मार्गच

 सदा स्विकारावा

 आत्मपरीक्षण

 धडा गिरवावा॥


दत्ता काजळे उस्मानाबाद

©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह



Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...