कविता :- सावर रे मना


आज दिनांक 21 ऑक्टोंबर 2020 ला मराठीचे शिलेदार समूहावर प्रकाशित झालेल्या बेस्ट पाच कविता .... 

🔴🔶🔴🔶🔴🔶🔴🔶🔴🔶🔴🔶🔴🔶🔴

सावर रे मना

    सावर रे मना आता तरी
      होवू नकोस दोलायमान
      राहशील स्थिरभावाने तू
      होशील रे मोठा गुणवान ॥

      तुझा चंचल स्वभाव जणू
      वाटे सर्कशीतला जोकर
      गांभिर्याने वाग जराशी तू
      चंचलपणाला दे ठोकर  ॥

      उठसूठ माजले काहूर
      तुझ्या ठायी विचारचक्राचे
      सावर रे मना आता तरी
      बांध घाल तुला संयमाचे ॥

      नको होवूस चलबिचल
      प्रज्ञा तुझी अलौकिकतेची
      अभ्यासाने सर्व साध्य होई
      दाखव चुणूक विद्वत्तेची  ॥

      सावर रे मना आता तरी
      दु:खे ही पचवायला शिक
      समतोल ढळू देवू नको
      स्पर्धेत जीवनाच्या रे टिक ॥

  दत्ता काजळे (ज्ञानाग्रज)
  उस्मानाबाद
©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह

💐💐💐

      सावर रे मना
     आवर भावना
     लेखनाचे बळ
     वाढो ही प्रेरणा ॥
     मुक्त विचारांचा
     कल्पना संचार
     नकोच आवरू
     तयाचा प्रसार ॥
     व्यक्त भावनांना
     कर अभिव्यक्त
     मनाला खंबीर
     कर तू सशक्त ॥
     सावर रे मना
     ठेव आत्मभान
     होऊ नकोच रे
     टीकेने बेभान ॥
     आवर घाल तू
     दोलायमनाला
     सावर रे मना
     बेशिस्तपणाला ॥
     कल्पकतेची रे
     घे उंच भरारी
     सृजनाने भर
     रंग पिचकारी ॥
     सावर रे मना
     सोड अधीरता
     बुध्दीला येवू दे
     तुझ्या रे स्थिरता ॥

 दत्ता काजळे (ज्ञानाग्रज)
 उस्मानाबाद
©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह

🌺💮🌺

 काल पाहिले मी अमरधाम
 धास्तावलेल्या मनाला फुटला घाम
 सावर रे मना मुखी असुदे राम

 मेलेल्याला तिथे मिळते मुक्ती
 भटकणाऱ्या आत्म्याला तिथेच शांती
 सावर रे मना तू नको घेऊ धास्ती

 चारधाम केले मी जिवंतपणी
 पाप-पुण्याचा हिशोब नाही केला जीवनी
 सावर रे मना दानाचा अर्थ येऊ दे ध्यानी 

 मसणजोगी करतो सेवा प्रेताची 
जळणाऱ्या चितेवर खळगी भरतो पोटाची
 सावर रे मना दशा अशी माझ्या देहाची

 नको दाखवू माझ्या जीवाला वाट अमरधामाची
 त्या परिस होऊदे बुद्धी देहदानाची
 सावर रे मना क्रांती घडू दे 
माझ्या जीवनाची 

सौ अनिता व्यवहारे 
ता.श्रीरामपूर जि अहमदनगर 
सदस्या मराठीचे शिलेदार समूह

🔶🔴🔶

जरी दुःखाचा डोंगर
ढासळला या जीवना
हृदयी दाटल्या वेदना
सावर रे माझ्या मना...!!

मृत्यू सर्वांना अटळ
शाश्वत सत्य जीवना
घट्ट कर काळजाला
सावर रे माझ्या मना...!!

दुःख दाबून ऊरात
खोटे तरी तू हस ना
माझ्या पिलांसाठी तरी
सावर रे माझ्या मना....!!

आईवडीलांचा मृत्यू
अश्रुपूर तो नयना
आग दुःखाची विझव
सावर रे माझ्या मना....!!

आहे कर्तव्यच श्रेष्ठ
लपव तुझ्या भावना
दुःख सरेल सरेल
सावर रे माझ्या मना...!!

सौ-राजश्रीताई मिसाळ ढाकणे  
 कवयित्री/लेखिका/सदस्या 
 मराठीचे शिलेदार समूह

🌐🌍🌐

आता सावर रे मना
नको तू रे लाच खाऊ,
"बुरी बला लालच है!"
नको विसरुनी जाऊ!

गोर गरीब येतात,
तुजकडे कामासाठी,
पैसा कष्टाचा देतात,
तुला एका सहीसाठी!

तुझी मुलं,बाळं,पत्नी,
जगतात सुखी जीणं,
लाचेतूनी मिळे पैसा
मौज-मजा, खाणं-पीणं!

तुझ्या गरजा वाढल्या,
सर्व खर्चही वाढला,
असा हरामाचा पैसा,
ताण देऊनी काढला!

परी लक्षात असू दे
नियतीचे कर्म फळ,
मिळे ह्याची देही इथे
तेंव्हा नको तळमळ!

श्री.मंगेश पैंजने सर,
ता.मानवत,जिल्हा-परभणी,
© सदस्य,मराठीचे शिलेदार समूह.

🔴⬛🔴⬛🔴⬛🔴⬛🔴⬛🔴⬛🔴⬛🔴⬛🔴

Comments

  1. मनस्वी धन्यवाद सर!आपण माझ्या रचनांना बेस्ट फाईव्हमध्ये निवडलात!आपले पुनश्च धन्यवाद!प्रेरणा ब्लाॅगचे हे कार्य अतिशय वाखाणण्याजोगे आहे!आपल्या भावी कार्यास अभिनंदनीय शुभेच्छा!
    मा.आदरणीय राहूलदादांचे संधी उपलब्धतेस्तव मनस्वी आभार! श्री अर्जून सर आपलेही आभार!
    !धन्यवाद!

    ReplyDelete

Post a Comment

Did you like this blog

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !