मन मनाच्या शोधात !

                   मन मनाच्या शोधात...!


    मन मोकळं करायचं असेल तर स्वतःशीच एकांतात संवाद करावा ...उत्तर सापडत असतं...!

कारण शंभर टक्के आपलं ऐकून समजून घेणारं मन ...एखाद्या मनासाठी जणू अस्तित्वातच नसतं... !

क्वचितच एखाद्या मनाला असं मन गवसतं ...जे प्रत्येक्ष आपल्याच मनाची प्रतिमा असतं...!

   अशीच आज भरल्या घरात सारं भौतिक  सुखवैभव असूनही अशांत शारदा एकटीच देव्हाऱ्यापुढे बसून देवाशी भांडत होती, रडत होती ,बोलत होती....! 

   "देवा, का मला जन्माला घातलय रे...काय साध्य करायचं होतं तुला माझ्या या आयुष्यातून"...प्रत्येकाचे जन्माचे विधिलिखित मांडलेले असते...पण मला कळतच नाही मी काय कसं वागू ..सर्वांच्या मनासारखं, हवं नको पुरवण्यातच दैनंदिन आयुष्य चाललय...पण मलाही मनातनं काही जाणीवा आहे ,जरा काही निवांतपण, काही हवंय का, हा विचारच नाही करत कोणी घरात...! आणि जसं मला आयुष्य जगायचं होतं तसं मला  वास्तव जगणं  नाही दिलस रे ,मग विचार करायची बुद्धी तरी का दिलीस रे?...मंदच ठेवायचस ना..घुम्याबैलासारखं कामच करत रहायला...! 

   नियतीने बांधून टाकलय कि मीच स्वतःला गुंतून घेतलय या चौकटविचारात हेच कळेना झालय बघ..!...पुर्ण हरल्यासारखं भासतय...कितीही पुढेपुढे करा सर्वाच्या जो तो आपलंच वर्चस्व गाजवतो...मग मी नेमकी कुठल्या कर्तव्यात कमी पडतेय सर्वाचा ओरडा खायला... जरा काही बिनसलं कि सोपीच शारदा....!

   बर ते जावुदे...मला सांग देवा ...का असमाधानी,एकाकी दिसतोय प्रत्येक व्यक्ती  घरातही, बाहेरही....समाजातही..ही शोकांतिकाच आहे रे...तुझ्या बनवलेल्या दुनियेतली...!

   का कशासाठी ..मनशांतीच्या सुखासाठी कि हळव्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी ... प्रत्येक मन अशा मनाच्या शोधात असते, जे दोन कान आणि एक मन पुर्णपणे आपल्या मनाला समजु शकेन ..सगळं मनातलं सुखदुःख वेदना ऐकून जाणून घेवू शकेन..! पण सहजासहजी नाही भेटत असं दुर्मिळ निर्मळ मन ..ही व्यवस्थाही तु करून ठेवलीय ना...!

   म्हणून असं मन तुजपाशीच आहे रे म्हणून तर बोलावसं वाटतं तुझ्याकडेच...

   मला सांग देवा,

 असे निर्मळ ,वैचारीक मन बनविण्याचे काम तु संद्या बंद केलेस का रे ....? सगळीकडे लाचारी , सुशिक्षित बेकारी,गुन्हेगारी वाढतेय...सत्य  रडतय ,खोटं जिंकतय....प्रत्येक मन हळवं होत जातय...प्रेमाचा ,विश्वासाचा आधार शोधतय...पण धोका पावलोपावली वाट बघत बसलेला दिसतो...ही स्थिती भय निर्माण करतेय रे आता मनात....

 अगं बाई बेल वाजली कोण आलय...देवा रजा घेते..तु बरोबर हुसकवतोस बघ, नेहमीच तुझ्याजवळ तक्रार करायला बसलं कि...

 "अगं आई गं आले आले थांबा जरा"..

 या या रेवतीताई ...बसा 

 नाही हो शारदावहिणी ..मी जरा घाईत आहे  प्रसाद द्यायला आले होते ....कामात होत्या का?

 "नाही नाही जरा देवाशी भांडण चाललं होतं ..तक्रारी नेहमीच्याच बोलणार कुणाजवळ"...

 "शारदावहिणी ,काय तुम्ही...! बिचाऱ्या देवावर चिडून काय उपयोग"..अहो इथं माणूसच स्पर्धेच्या युगात जगणं विसरून चाललाय....

  यामुळे घरात कुणासाठीच कुणाला वेळ नाही बघा...सगळे आपआपल्या कामात व्यस्त..पोरंही बाहेर खेळायचं सोडून फोनमधे गुंतलेले दिसतात..

गंप्पागोष्टी,खेळ ,मस्करी, सगळं हरवतय . गृहीणीही मनात एकाकी बनत जातेय...काहींना तर जराही मोकळीक नसते..!

  "जगायला हवं तरी काय ...दोन शब्द प्रेमाचे,दोन घास मेहनतीच्या फळाचे ,अन् दैनंदिन गरजा पुरतील ,शिक्षण,वैचारीक विकास होईन एवढी कमाईची अर्थव्यवस्था हवी ..कि सुखी झालाच हो माणूस...पण हा गोडवा समजणार कुणाला...असो चला येते मी"...

   हो या या रेवतीताई, पण.... तुम्ही खरं बोलल्या हो  .. तरीही मला वाटतं  प्रत्येकात असं मन हवच जे एखाद्या मनाचा शोध संपवून विचारांची देवाणघेवाण करुन मनशांती देईन...विश्वासाचा आधार होईन...मग कुणाचंही मन एकाकी होत दुसऱ्या मनाच्या शोधात भटकणार नाही ...!

  

 लेखिका - सौ.सविता दरेकर नाशिक

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !