मी पणाचा पराभाव :- एक किस्सा स्वामी समर्थांचा

                       स्वामी समर्थ


 बाबा सबनीस एक प्रकांड विद्वान कीर्तनकार होते. राम मंदिरात त्यांचे कीर्तन होते. सर्व लोकं मंत्र-मुग्ध होऊन कीर्तन ऐकतात.

 तिथे हरीबाई नावाची एक बाई येते आणी मंदिराच्या पायरीवर किर्तना कडे पाठ करुन रामाचे नामस्मरण करत बसते. 

 कीर्तन संपल्यावर हरी बाईला बाबा सबनीस विचारतात-" तुम्हाला काय आम्ह्चे कीर्तन ऐकावे असे नाही वाटत का?"

 हरी बाई थोड्या फटकल पणे बोलते-"या मोठ्या-मोठ्या गोष्टी मला समझत नाही.कानातून मनात पोहचत नाही. "

 "आम्हाला आमचे स्वामींच्या साध्या-सरळ गोष्टी आवडतात." 

 तितक्यात नारायण शास्त्री येउन बाबा सबनीसला म्हणतात: " तुम्ही या मुर्ख बाईशी काय वाद घालत आहा?'

 " या सर्वाना त्या भोंदू स्वामीनी वेड लावले आहे."

 मग शास्त्री बाबा सबनीसला म्हणातात की हनुमान जयंतीला स्वामी राम मंदिरात येणार आहे, तिथे तुम्ही आपल्या विद्वत्तेनी शास्त्रात 

त्यांचा पराभव करा.

हनुमान जयंतीच्या दिवशी स्वामी मंदिरात येतात.बाबा सबनीस त्यांना तत्व-ज्ञानाचे प्रश्न विचारतात.

स्वामी म्हणातात: "अरे ह्या गोष्टी आम्हाला काय माहित! आम्ही काय पुराण वाचतो का?"

मग स्वामी वामकुक्षी साठी निघून जाता.

नारायण शास्त्री आणी बाबा सबनीस तिथेच स्वामींची टवाळी करत राहतात.

तितक्यात एक साप येउन बाबा सबनीसला डसतो.

योगा-योगानी गावात राहणारे मांत्रिक आणी वैद्य सुद्धा गावात नसतात.

गावकरी म्हणातात की आता फक्त स्वामीच वाचवू शकतात.

माणूस कितीही ज्ञानी असला तरी संकटात फक्त देहबुद्धी पर्यंतच त्याचे ज्ञान मर्यादित राहते.

बाबा सबनीस आपला ताठा सोडुन स्वामी शरणी यायला निघतात्त.

स्वामी पहिले बाबा सबनीस ची फिरकी घेतात:- "अरे आम्ही काय करणार? आम्ही वेद-पुराण थोडेच वाचले आहे!

आम्हाला काय कळतं तत्व ज्ञाना बद्दल ?"

आता तर विषा मुळे बाबा सबनीसना  प्रचंड वेदना व्हायला लागल्या होत्या.

बाबा सबनीस एकदम शरणागती पत्करतात आणी केविलवाण्या स्वरात म्हणातात:- "स्वामी काही पण करा हो .... पण मला वाचवा . "

"विष आता तर झोंबून राहिले आहे."

स्वामींना दया येते. जशी दिव्यात काजळी असते तसच मान-लोकिक मिळवलेल्या विद्वानाच्या ठायी अभिमान तर असणारच.

स्वामी एक ताठ मागवून सबनीस यांना सर्पदंश झालेला पाय ताठात ठेवायला सांगतात.

स्वामींच्या कृपा-दृष्टीनी आपो-आप विष बाहेर ताठात पडायला लागतं.

सर्व विष गेल्यावर बाबा सबनीस च्या प्राणात-प्राण येतो.

ते स्वामींच्या चरणी पडतात.

स्वामी बोध करतात: "ज्ञान श्रेष्ठ असतं पण थोडे ज्ञान झाल्याने भक्ती असलेल्या लोकांना नडू नये."

"ज्यांनी-त्यांनी आपल्या पद्धतीनी ईश्वराची उपासना करावी."

"ज्ञान-कर्म-आणी भक्ती तिन्ही जीवाला ईश्वरा कडे नेतात."

"ज्याला जी वाट सोयीस्कर वाटेल त्यांनी ती वाट पत्करावी."

सबनीस आपली चुक मान्य करतात.


Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...