सामान्यांचे असामान्यत्व - बोधकथा

सामान्यांचे ‘असामान्यत्व’


एका अत्यंत हुषार व टॅलेन्टेड ऍटोमोबाईल इंजिनीयरने त्याच्या बॉससाठी, म्हणजे त्याच्या कंपनीच्या सीईओ साठी एक खास मोटार तयार केली. ही गाडी भव्य होती. यामध्ये अनेक आधुनीक सुवीधा पुरवण्यात आल्या होत्या. गाडीच्या शेपमूळे व रंगसंगतीमूळे ही गाडी अत्यंत देखणी व रुबाबदार दिसत होती. कारखान्यातल्या सर्व प्रकारच्या टेस्टना ही गाडी उत्तम रितीने पास झाली होती. ही गाडी बघून सीईओ साहेब तर खुषच झाले होते. आता ही गाडी कारखान्याच्या बाहेर काढायची होती.

गाडी कारखान्याच्या बाहेर काढताना मात्र एक अडचण आली. त्या गाडीची उंची त्या कारखान्याच्या ‘गेट’ पेक्षा दोन एक इंचांनी जास्त होती. त्यामूळे ती गाडी बाहेर काढता येत नव्हती. गाडी डिझाईन करताना त्या इंजिनीयरने गेटची उंची विचारात घेतलेली नव्हती. त्यामूळे हा सगळा घोटाळा झाला होता. आपल्याकडून एवढी साधी गोष्ट कशी राहून गेली याबद्दल त्या ऍटोमोबाईल इंजिनीयरला वाईट वाटत होते व खंत पण वाटत होती.

गाडी बाहेर कशी काढायची हे ठरवण्यासाठी सीईओंनी सगळ्या टॅलेन्टेड मॅनेजर्सना व डिपार्टमेन्ट हेडसना गेटपाशी बोलावले.

‘गाडीची उंची गेटच्या उंचीपेक्षा थोडीशीच जास्त आहे. त्यामूळे गाडी तशीच बाहेर काढावी. त्यामूळे फार फार तर काय होईल तर गाडीचा टॉप घासला जाईल व त्यावर चरे पडतील. गाडी बाहेर काढल्यावर रिपेन्ट करून हे चरे बुजवणे शक्य होईल!’ पेन्टशॉपच्या मॅनेजरने सुझाव दिला. पण एकदा का गाडीचा पेन्ट खराब झाला तर कितीही ‘रिटचींग’ केले तरी गाडीचा पेन्ट चांगला दिसणार नाही म्हणून सीईओ साहेबांनी ही सूचना नामंजूर केली.

‘गेट तोडावे व गेटची उंची थोडिशी वाढवावी व गाडी बाहेर काढावी. गाडी बाहेर काढल्यावर गेटचे रिपेरींग करून गेट पूर्वीसारखे कारावे’ एका सिनीयर मॅनेजरने सल्ला दिला. पण गेट तोडणे फारच खर्चीक होणार होते. त्याला वेळ पण लागणार होता. तसेच फॅक्टरीच्या सिक्युरिटीचा पण प्रश्न होता. त्यामूळे ही सूचना पण सीईओ साहेबांना पसंत पडली नाही.

त्या गेटवर असलेला गेटमन हा सर्व तमाशा बघत होता. त्याला नक्की काय चालले आहे याची आयडिया आली होती.

‘साहेब मी एक सांगु का?’ तो म्हणाला तेव्हा त्याचा साहेब त्याच्याकडे रागाने बघत ‘बोलू नकोस’ असे डोळ्याने खुणावत असल्याचे त्याने बघीतले.

‘बोल तुझे काय म्हणणे आहे?’ सीईओ साहेबांनी विचारले

‘सर माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे, पण तुम्ही हसणार नसाल तर सांगतो.’ तो गेटमन त्याच्या साहेबाकडे वरमून बघत म्हणाला.

‘तुझ्या डोक्यात काय कल्पना आहे?’ सीईओ साहेबांनी विचारले.

‘सर! गाडीच्या टायरमध्ये पुर्ण हवा भरलेली आहे त्या मूळे त्या गाडीची उंची वाढली आहे. तर टायरमधली हवा निम्मी करावी. त्यामूळे टायर दाबले जाऊन गाडीची उंची कमी होईल. मग सावकाश गाडी बाहेर काढावी व गाडी बाहेर आल्यावर टायरमध्ये हवा भरावी!’ त्या गेटमनने सांगीतले.

गेटमनच्या सूचनेप्रमाणेच कारवाई करण्यात आली व गाडी आरामात बाहेर आली. चांगली आणि उपयुक्त सूचना दिल्याबद्दल सीईओंनी त्या गेटमनचे कौतूक तर केलेच पण इतकी साधी कल्पना आपल्याला का सुचली नाही असे पण सगळ्या मॅनेजर्सना विचारले.

एका सामान्य गेटमनची सूचनाच शेवटी व्यवहार्य निघाली. हे त्याचे ‘असामान्यत्व’ होते.

अनेक सामान्य माणसांमध्ये अनेक असामान्य गुण असतात. त्यांच्याकडे असामान्य कल्पनाशकती असते. प्रभावी नेत्रुत्वगुण असतात. असामान्य संघटना कौशल्य असते. जबरदस्त धाडस असते. असामान्य कौशल्य असते. एरवी हे सर्व गुण सुप्त अवस्थेत असतात. पण काही ठरावीक प्रसंगी हे गुण उफाळून बाहेर येतात. पण अनेक जण हे गूण मारण्याचा प्रयत्न करत असतात. वरील उदाहरणांत जेव्हा गेटमन बोलायला लागला तेव्हा त्याचा साहेब त्याला ‘बोलू नकोस’ असे खुणावत त्याचे तोंड बंद करायचा प्रयत्न करत होता. त्याला त्याच्या ‘साहेबांच्या साहेबांनी’ म्हणजेच सीईओनी बोलायची परवानगी दिली तेव्हा कुठे त्याला त्याची कल्पना सांगण्याची संधी मिळाली.

प्रत्येकाने सामान्यांचे ‘असामान्यत्व’ ओळखायला व ते ऍप्रिसिएट’ करायला शिकले पाहीजे.

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...