◼️ कविता :- भक्ती रंग


 भक्ती रंग


भक्ती रंगी रंगली राधा

 प्रेमे भजी ती बाल मुकुंदा


मीरा मधुराभक्तीची उद्गाती

मुरलीधरावर तिची प्रिती


महाविष्णूच्या भक्तीत रंगला

बाळ प्रल्हाद अढळपदी बैसला


पुंडलीकाची मायपित्यावर भक्ती

थांबविले विठूराया फेकूनी वीट ती


ज्ञानदेव  किती भक्ती रंगी रंगले

मोठया भावा गुरुस्थानी मानीले


नवविधा प्रकार भक्तीचे तरी

ईष्ट देव खोल असावा अंतरी


श्रवण भक्ती मज बहू प्यारी

आळवाया देवा ऊत्तम परी


किर्तन प्रवचन सदा ऐकावे

' केशीराज ' तू भक्तिरंगी नाचावे

________________________________

🙋🏼‍♂️🙏🏼✍🏽👍🏼

केशीराज

शरदकुमार सुमन - ज्ञानेश्वर वेदपाठकI

मंद्रुपकर, सोलापूर

___________________________________



Comments

Post a Comment

Did you like this blog

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...