पक्ष्यांची सभा - कविता

🌳 *पक्ष्यांची सभा** 🦚

झाडावर भरली पक्षांची सभा
मोर  नाचरा ,मधोमध उभा---

म्हणाला, माणसास काय झाले?
खूपच दिसतात दिनवाने---

पोपट म्हणाला मी गल्लीत पाहिले
सुनसान दिसले, नवलच वाटले---

चिऊताई म्हणाली, घाई घाई
दूध भाताचा घास मिळतच नाही-

कावळा म्हणालाआज दशक्रियेला
काव काव ऐकू नाही येत मला---

घार म्हणे ,उंच आभाळी मी गेले
एकही विमान नाही घरघरले---

वाहने,कंपनी मॉलही बंद
प्रदूषण थांबले न जाणे काय झाले

माणसावर असे कसे संकट आले
जीव घेण्या कोरोनाने,तया,ग्रासले

सर्व पक्षांनी युक्ती केली
देवाची एकत्र प्रार्थना म्हटली--

म्हणून पाखरांची काळजी घ्या
ठेऊ नका उपाशी अन्न पाणी दया

श्रीम शिला पाटील चांदवड नाशिक

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...