जिवन जगत असताना जीवनात कसा बदल करावा -आयुष्य /जिवन विचार

विचार माणसाच्या जीवनात फार महत्त्वाचे असतात. निसर्गाने माणसाला विचारशक्ती अगदी मुक्त हस्ताने बहाल केली आहे. इतर कोणत्याही प्राण्याकडे विचार करण्याची अथवा विचारांची देवाण-घेवाण करण्याची शक्ती नाही. विचारांचा माणसाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो.
कारण विचार हे सतत मनात स्फुरत असतात. मानसशास्त्रानुसार माणूस दिवसभरात अंदाजे साठ हजार विचार करतो. या विचारांपैकी काही विचार तुम्ही जाणिवपूर्वक करता तर काही विचार तुमच्या विचारसरणीनुसार, संस्कारानुसार तुमच्या मनात स्फुरत असतात. काही विचार हे लहानपणापासून तुमच्यावर झालेले संस्कार, संगत आणि शिक्षण यानुसार तुमच्या मनात निर्माण होत असतात. मात्र तुम्ही चांगले अथवा वाईट कोणतेही विचार केले तरी त्या विचारांचा तुमच्या जीवनावर परिणाम हा होतच असतो. जर तुम्ही चांगले विचार केले तर जीवनात चांगले घडते आणि चुकीचे विचार केले तर त्याप्रमाणेच जीवन घडत जाते. थोडक्यात माणूस जरी काही काम न करता अगदी रिकामा जरी बसला असेल तरी त्यावेळी त्याच्या मनात विचार सुरूच असतात. अगदी सकाळी जाग आल्यापासून रात्री गाढ झोपेपर्यंत माणूस विचारच करत असतो. एखादे काम करत असतानादेखील बॅक ऑफ दी माईंड खोलवर कुठेतरी सतत विचार सुरू असतात. जर माणूस सतत विचारच करत असेल तर तो नेहमी आपल्या विचारांच्या संगतीमध्ये जगत असतो असे म्हणावे लागेल. शिवाय विचारांप्रमाणे माणसाचे जीवन घडत असेल तर माणसाने विचार करताना सतत सावध राहणे देखील फार गरजेचे आहे. वाईट, नकारात्मक विचार जीवनाला चुकीची कलाटणी देतात तर सकारात्मक विचार माणसाला जीवनात यशाच्या शिखरावर नेतात. मात्र विचारांबाबत सावध नसल्यामुळे आजकाल सगळीकडेच नकारात्मक विचारसरणी दिसून येते.
मन आणि विचारांचे सामर्थ्य माहीत नसल्यामुळे अनेक माणसे कळत अथवा नकळत सतत नकारात्मक विचार करत असतात. काही जणांना नकारात्मक विचार करण्याची ऐवढी सवय असते की प्रत्येक गोष्टीबाबत त्यांच्या मनात आधी नकारात्मक विचारच पहिला येतो. शिवाय आपण कळत आणि नकळत सतत नकारात्मक विचार करत आहोत याची पुसटची जाणिवदेखील या लोकांना नसते. मात्र निसर्ग आपले काम अगदी प्रामाणिकपणे करीत असतो. चुकीच्या विचारांचे परिणाम माणसाला निसर्गनियमानुसार भोगावेच लागतात. यासाठी प्रत्येक माणसाला सकारात्मक विचार आणि मनाचे सामर्थ्य माहीत असायलाच हवे. सतत प्रयत्नपूर्वक पॉझिटिव विचार करून तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच यश मिळवू शकता. मात्र त्यासाठी नेहमी पॉझिटिव्ह थिंकीक अथवा सकारात्मक विचार कसे करायचे हे तुम्हाला माहीत असायला हवे. 


आज अनेक जण आपले जीवन यशस्वी करण्यासाठी किंवा यश प्राप्त करण्यासाठी झगडत आहेत. लोक आपले ध्येय तर ठरवतात, पण ते अनेकदा पूर्ण करू शकत नाहीत. याची करणे अनेक असली तरीही सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे प्रयत्न न करणे हेच आहे. आपल्या जीवनात आलेले अपयश हेच सिद्ध करते की, यशस्वी होण्यासाठी योग्य प्रयत्न आपण केले नाहीत. कोणताही व्यवसाय करायची इच्छा असेल आणि अनेकदा अपयश आले असेल तरी हेच कारण त्यालाही लागू होते. म्हणूनच यशस्वी होण्यासाठी तुमचे प्रयत्न तितकेच महत्त्वाचे आहे. 

1. विचार करा: 

सर्वात पहिले तुम्ही लिहून काढा की तुम्हाला तुमच्या जीवनात बदल का हवा आहे. अक्षरशः कागद आणि पेन घेऊन लिहून काढा की ज्या प्रमाणे तुमच्या आयुष्यात गोष्टी घडत आहेत, त्यामुळे तुम्ही का खुश नाही आहात. त्याचप्रमाणे तुमच्या प्रयत्नांत काय कमी राहतेय याचाही उल्लेख करा. तुम्ही जे प्रयत्न करत आहात, त्यात अजून काय बदल केल्याने तुम्ही यशाच्या जवळ जाऊ शकता. तुमच्या कल्पना, तुमचे विचार, तुमच्या अपेक्षा या वास्तविक जीवनाशी जुळत आहेत का या बद्दलही उल्लेख करा. लिहिल्यानंतर हे सर्व वाचून काढा. त्यावर तुम्ही काय उपाययोजना करू शकता यावर विचार करा. 

2. तुमची क्षमता जाणून घ्या: 

लक्षात घ्या तुम्हाला जे करायचे आहे, जो बिझनेस करायचा आहे तो यशस्वी करण्याची क्षमता फक्त तुमच्याकडे आहे. आयुष्यात जर तुम्हाला चांगला बदल हवा असेल तर प्रयत्न सुद्धा तेवढाच करावा लागेल. अगदी छोट्या गोष्टींपासून सुरुवात करून नंतर मोठ्या गोष्टींकडे वळावे लागेल. 



3. स्वतःकडे लक्ष द्या: 

तुम्ही निरोगी असाल तर पुढची सर्व प्रक्रिया योग्य आणि उत्तम चालू राहील. जीवन यशस्वी करण्याच्या मागे लागताना स्वतःकडे, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होता नये याची नेहमी काळजी घ्यावी. चांगला आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावे आणि सोबतच योग्य व्यायाम किंवा योगासने करावीत. जेवढे तुमचे शरीर निरोगी तेवढी तुमची विचार करण्याची क्षमता चांगली. 


4: चौकटीबाहेर पडा: 

जर तुम्ही स्वतःभोवती एखाद्या विशिष्ट विचारांची किंवा क्षमतेची चौकात आखली असेल तर त्यातून बाहेर पडा. या चौकटी तुम्हाला कधी कधी बांधून ठेवतील. चौकटीतून बाहेर पडून काम करा. दुसऱ्यांपेक्षा वेगळा आणि यशाच्या दृष्टीने विचार करा. चौकटीतून बाहेर पडल्याने बाहेरच्या जगातील संपर्क वाढवून जास्तीत जास्त माहिती संपादन करा. यामुळे तुम्ही यशाच्या जवळ जाउ शकाल. तुमचा बिझनेस यशाच्या शिखरावर पोहोचेल. 

5. आव्हानात्मक गोष्टी करा: 

ज्या गोष्टींमधून काहीतरी आव्हान मिळत असेल अशा गोष्टी करा. तुम्हाला जर अपयशाची भीती वाटत असेल तर अजून जास्त प्रयत्न करा आणि अपयशाला मात द्या. तुम्ही ज्या व्यवसायासाठी दिवसरात्र एक करून मेहनत करत आहात, त्या व्यवसायातील ज्या आव्हानात्मक गोष्टी असतील त्या जरूर करा. कठीण कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ती आव्हाने तुम्हाला उतेजन देऊ शकेल इतकी मोठी असली पाहिजे. तुमच्या स्वत:च्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करा. 

भितीला पळवून लावा 

प्रत्येक माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर तो म्हणजे त्याच्यात असलेली भिती. या भितीमुळेच माणूस निर्णय घ्यायला वेळ लावतो. जो चुकला तो संपला, हे तुम्हाला माहित आहे. निर्णय घेण्यात उशिर लावलात,याचाच अर्थ वेळेचे नुकसान आणि डोक्यातल्या काळज्यांना प्रोत्साहन. चिंताग्रस्त असलेले मन, डोके कधीही पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही. क्षमतेचा भरपूर उपयोग करू शकत नाही. आजच्या तरुण पिढीला प्रत्येक वेळेला स्वत: स्वत:ला कोणता ना कोणता निर्णय घ्यावा लागतो. काही लोक खूप दिवस विचार करतात आणि मग निर्णय घेतात. तरीही त्यांचा निर्णय चुकलेला असतो. याचे कारण म्हणजे मनातील भिती. विज्ञानशास्त्र आणि विश्‍लेषणयुक्त दृष्टिकोनयुक्त विचाराचा अभाव 

जीवन म्हणजेच चढौतार. सुख-दु:ख जीवनात दिवस-रात्र, ऊन-सावलीप्रमाणे येत राहतात. जीवनात यशापयश येत राहतं. संधी येतात, मनाची चलबिचल होते. पण तेच लोक यशस्वी होतात, जे प्रत्येक परस्थितीला धैर्याने तोंड देतात आणि योग्य संधीचा योग्य फायदा उठवतात. मग ते जीवन असेल,शिक्षण असेल. योग्य वेळेला योग्य प्रश्‍न विचारणाराच पुढे जातो. याचाच अर्थ यशासाठी आपल्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं असतं. जर याचा अभाव असेल तर खूप मेहनत करूनही काही उपयोग होत नाही. 

यशस्वी तेच होतात 
ज्यांना 
जगाने टोमणे मारलेले असतात... 

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...