माहिती :- आर्मी मध्ये सैनिक केस बारीक का कापतात ?

प्रत्येक देशाचा सैनिक हा आपला देश कसा सुरक्षित राहील, याचाच सतत विचार करत असतो. 
पण या सर्व सैनिकांमध्ये एक गोष्ट सारखी असते, ती म्हणजे त्यांच्या केसांचा कट. या सर्व सैनिकांचा कट हा एकसारखाच असतो.  

केस बारीक का असतात ? 
निशाणा लावताना लक्ष बनून राहणे. 

शत्रूवर निशाणा लावण्यासाठी बारीक लक्ष असणे खूप गरजेचे आहे. अशावेळी निशाणा साधताना केस हे अडथळा निर्मण करू शकतात. जर केस मोठे असतील आणि निशाणा लावताना डोळ्यांवर आले, तर समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे केस लहान ठेवले जातात. 

सर्दीच्या आजारापासून वाचणे सैनिकांना आपली ड्युटी करण्यासाठी खूप वेळा भर पावसामध्ये उभे राहावे लागते. अशावेळी त्यांचे लांब केस त्यांच्यासाठी समस्येचे कारण बनू शकतात आणि त्यामुळे सर्दीच्या आजारांची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे सैनिकांचे केस हे बारीक ठेवले जातात. 

समानतेचा भाव विकसित करणे 

सैनिकांचे छोटे केस ठेवण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे सर्वांमध्ये समानतेची भावना निर्माण करणे हे आहे. अधिकाऱ्यांपासून सैनिकांपर्यंत सर्वांमध्ये समानतेची भावना निर्माण होऊन त्यांनी एक टीम बनून काम करावे, यासाठी असे केले जाते. 

कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये यासाठी 

रणांगणामध्ये किंवा निर्जन ठिकाणी पोस्टिंग झाल्यावर सैनिकांना कितीतरी वेळा दररोज अंघोळ करायला मिळत नाही. अशावेळी त्यांचे जर केस लांब असतील तर त्यांना इन्फेक्शन होण्याची भीती निर्माण होते . त्यामुळे सैनिकांचे केस हे लहान ठेवले जातात. 

हेल्मेट आणि इतर काही गॅजेट घालण्यासाठी 

सैनिकांना आपला जास्त वेळ हा रणांगणावर घालवावा लागतो. जिथे त्यांनी कितीतरी प्रकारचे हेल्मेट आणि इतर गॅजेटस वापरावे लागतात. अशावेळी लांब केस हे समस्यांचे कारण बानू शकतात. त्यामुळे सैनिकांचे केस हे लहान ठेवले जातात. 
सैनिकांचे केस लांब असल्यास आणि ते बंदुकीमध्ये गेल्यास त्यामुळे बंदूक खराब होण्याचा धोका असतो. तसेच, केस लहान असल्यास गर्मी जास्त जाणवत नाही त्यामुळे सैनिकांचे केस लहान ठेवले जातात. 

कधी कधी सैनिकांचा सामना थेट शत्रूशी होतो अशावेळी त्यांचे केस लांब असल्यास त्यांना समस्यांना सामोरे जावे लागते आणि शत्रू हातघाईच्या लढाईत आपली पक्कड बनवू शकतो. 

पण जर केस लहान असतील तर तर पकडून सैनिकांवर सहसा मजबूत पकड करता येत नाही, त्यामुळे सैनिकांचे केस हे लहान ठेवले जातात. 



​ 

या सर्व कारणांमुळे आपण सर्व सैनिकांच्या केसांचा कट एकच असल्याचे पाहतो आणि या कटमध्ये केस खूप बारीक कापण्यात येतात. जेणेकरून सैनिकांना वरील कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागू नये. 

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !