भगवान महावीर यांचा जीवन परिचय
⚡ कर्मकांड, अवडंबर आणि भीतीने दबलेल्या भारतीय जनतेला रस्ता दाखविण्यासाठी इ.स.पूर्व 6 व्या शतकात जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांनी जन्म घेतला. या काळाला बौद्धिक उलथापालथ व अर्धवट ज्ञानावर आधारित अध्यात्मिक क्रांतीचा संक्रमण काळ मानला जातो.
💁♂️ *कुळ* : रूढी, परंपरा, परस्परांमधील वैमनस्य व सोळा महाजनपदांच्या संघ प्रमुखांद्वारे निर्मित हिंसकतेने त्रस्त भारतीय सर्वसामान्यांच्या नजरा अशा आध्यात्मिक प्रणेत्याच्या शोधात होत्या, जो त्यांना अहिंसेच्या माध्यमातून आत्मज्ञानाच्या मार्गावर घेऊन जाईल. याच दरम्यान क्षत्रिय कुळातील राजा सिद्धार्थ यांच्या घरी राजकुमार वर्धमान यांनी जन्म घेतला, आईचे नाव त्रिशला होते.
वैशाली राज्याच्या कुंडलपूर येथे त्यांचा जन्म झाला. बिहारमधील मुजफ्फरपुर जिल्ह्यात पूर्वीचे वैशाली होते. भगवान वर्धमान यांच्या भावाचे नाव नंदिवर्धन तर बहिणीचे नाव सुदर्शना होते. त्यांचे बालपण राजेशाही थाटात गेले. आठ वर्षांचे असताना त्यांना शिक्षण व शस्त्रविद्येचे ज्ञान घेण्यासाठी शाळेत पाठविण्यात आले.
👀 *महावीर* : जणसामन्यांमध्ये बसलेला अंधविश्वास, भीती आणि खोटेपणामध्ये सापडलेल्या सामान्यांना पाहून वर्धमानचे मन दु:खी झाले. संसारातील सर्व आव्हानांनी राजकुमार वर्धमानचे आयुष्य बदलून गेले. 12 वर्षांच्या तपश्चर्येनंतर वर्धमानला ज्ञानप्राप्ती होऊन 'महावीर' बनले.
कैवल्य प्राप्तीबाबत भगवान महावीरांनी सांगितले, आत्मज्ञानाचा मार्ग सर्वांसाठी शक्य आहे. मात्र त्यासाठी अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रम्हचर्य यांना आत्मसात करून चित्तप्रवृत्तीचे परिशोधन करणे गरजेचे आहे.
महावीर स्वामींनी जवळजवळ तीस वर्षापर्यंत आपल्या शिक्षणाचा प्रचार-प्रसार केला आणि तीर्थंकर पार्श्वनाथ द्वारे प्रतिपादित चार व्रत-सत्य, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह यामध्ये पाचवे व्रत ‘ब्रह्मचर्य’ याचाही समावेश केला.
भगवान महावीरांनी अनेकांतवाद म्हणजेच स्याद्-वादाचा सिद्धांत सांगितला. भगवान महावीर यांच्या अनेकांतवादाचे दर्शन गौतम बुद्धांच्या मध्यम मार्गासारखेच आहे. ज्याअंतर्गत त्यांनी अतिवादी आणि निरीश्वरवादी मत वगळता, मध्य मार्ग स्वीकारला.
👉 *तीन तत्वे* : अनेकांतवादानुसार एखाद्या वस्तूचे अनेक पैलू असतात. पूर्ण ज्ञान फक्त कैवल्य-प्राप्तीमुळेच शक्य होते. कैवल्य प्राप्तीसाठी भगवान महावीरांनी तीन तत्वे सांगितली ती म्हणजे सम्यक् दर्शन, सम्यक् ज्ञान, सम्यक् चरित्र.
🎯 महावीरांची शिकवण :
▪ भगवान महावीर यांनी नेहमी समाजाला प्रेम, अहिंसेचा मार्ग दाखवला.
▪ निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी त्यांनी समाजाला प्रोत्साहित केले.
▪ इतरांना मदत करण्याचा संदेश दिला.
▪ मदतीची गरज असणाऱ्यांना मदत न करणे ही देखील एक हिंसा असल्याची शिकवण महावीरांनी दिली.
▪ कोणाचे स्वातंत्र्य हिरावून घ्यायचे नाही, कल्याण करायचे व कोणालाही त्रास द्यायचा नाही.
▪ जाणते किंवा अजाणतेपणातून कोणाची हिंसा करणे योग्य नाही. याशिवाय दूसर्यांच्या मार्फतही कोणाची हिंसा घडवून आणू नये.
▪ कुठल्याही जीवांना मन, शरीर किवा बोलण्याने दंडीत करू नका. सर्वांच्या आत एकच आत्मा आहे.
Comments
Post a Comment
Did you like this blog