किसान रथ अॅप विषयी माहिती - शेतकरी
शेतकऱ्यांना त्यांचा माल विकता यावा यासाठी केंद्र सरकारने किसान रथ अॅप लाँच केला आहे. या अॅपवरून शेतकरी आपला माल विकू शकतात. केंद्रीय राज्यमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शुक्रवारी या मोबाइल अॅपची लाँचिंग केली आहे.
करोना व्हायरसमुळे देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. संपूर्ण देशभरात लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांना माल विकण्यासाठी मोठी अडचण येत आहे. शेतकऱ्यांना त्यांचा माल विकता यावा यासाठी केंद्र सरकारने किसान रथ मोबाइल अॅप लाँच केला आहे. या अॅपवरून शेतकरी आपला माल विकू शकतात. केंद्रीय राज्यमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शुक्रवारी या मोबाइल अॅपची लाँचिंग केली आहे. या अॅपवरून शेतकरी मालाची खरेदी-विक्री अगदी सोप्या पद्धतीने करू शकतात.
सर्वात आधी अँड्रॉयड स्मार्टफोनवर किसान रथ अॅपला गुगल प्ले स्टोरमधून डाऊनलोड करा. डाऊनलोड केल्यानंतर स्वतःचे नाव, मोबाइल नंबर, आधार नंबर यासारखी माहिती भरण्यासोबत पीएम किसानसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. जर आपण व्यापारी असाल तर आपल्या कंपनीचे नाव, स्वतःचे नाव, मोबाइल नंबरसह नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर मोबाइल नंबर आणि एक पासवर्ड च्या माध्यमातून लॉगिन करा. किसान रथ इंग्रजी, हिंदी, गुजराती, मराठी, पंजाबी, तमिळ, कन्नड आणि तेलुगु या भाषेत उपलब्ध आहे.
श्रेणीनुसार वाहतुक शक्य
‘किसान रथ’ मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतमालाच्या श्रेणीनुसार वाहतुक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अन्नधान्य (तृणधान्य, भरडधान्य, कडधान्य आदी), फळे आणि भाजीपाला, तेलबिया, मसाले, फुले, बांबू, तंतूमय पिके, वन्य उत्पादने नारळ आदी उत्पादनांची वाहतुक सोपी होणार आहे. तसेच व्यापाऱ्यांना नाशिवंत मालाची शीतवाहनाद्वारे वाहतुक करता येईल.
किसान रथ अॅपचे फायदे
केंद्र सरकारने किसान रथ अॅपला लॉकडाऊनच्या काळात लाँच केले आहे. या काळात भाजीपाला, धान्याची खरेदी विक्री थांबली. शेतकऱ्यांच्या या मालाची खरेदी विक्री व्हावी यासाठी हे अॅप लाँच करण्यात आले. शेतकऱ्यांना सोप्या पद्धतीने आपला माल विकता यावा. तसेच व्यापाऱ्यांना तो खरेदी करता यावा. प्ले स्टोरवर दिलेल्या माहितीनुसार किसान रथ अॅप देशभरातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांना कृषि बाजारा पर्यंत जाण्यास मदत करेल. शेतकऱ्यांना-व्यापाऱ्यांना ट्रक किंवा सामान नेणाऱ्या वाहनांसंदर्भात माहिती मिळेल. या अॅपवर ट्रक येण्याची वेळ, ठिकाण याची माहिती ठरवता येवू शकते. शेतकरी आपली फळे, भाजीपाला, धान्य या अॅपवरून विकू शकतात.

Comments
Post a Comment
Did you like this blog