◼️ प्रेरणा :- पाटोदा गावच्या सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची स्वनिवृती ....


कृपया खालील लेख सर्व वाचा

सलग ३० वर्षे एकाच ग्रामपंचायतीचे सरपंच असणारे भास्करराव पेरे पाटील यांनी गावच्या सरपंच पदाची स्व-निवृत्ती घेतली ...

धन्य ते गाव पाटोदा धन्य ते सरपंच

आपण निवृत्ती का घेत आहात असे पत्रकारांनी विचारल्यावर भास्करराव पेरे पाटील यांनी पत्रकारांना दिलेले उत्तर :- 

मी माझ्या हाताने सलग तीस वर्षे माझ्या गावाची सेवा केली आहे .. माझ्या गावचे सेवा करण्यापासून मी कंटाळलो नसून, मी फक्त माझ्या गावातील तरुणांना माझ्या व्यतिरिक्त गावची सेवा करण्याची संधी देत आहे. आणि याची मला पूर्ण जाण आहे. माझ्या गावचे तरुण माझ्यापेक्षा जास्त चांगली गावची सेवा करतील. मी ह्यावर्षी सरपंच चा फॉर्म भरला नाही म्हणजे, मी गावची सेवा करणार नाही असे मुळीच नाही. 

मला आशा आहे.माझ्या गावचे तरुण माझ्यापेक्षा चांगले काम करून दाखवतील. आणि पाच वर्षानंतर तुम्हीच येऊन बघा .

🔷वाचकीय मनोगत🔷

महाराष्ट्रासाठी आदर्श असलेले, पाटोदाचे आदर.मा. सरपंच भास्करराव पेरे पाटील हे शिवउपरोक्त व्यक्तिमत्व आहे. मागील तीस वर्षात त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी आपले गाव खरंच शिवकालीन स्वराज्य निर्माण केले आहे. आदरणीय सरपंचांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आपले गुरू मानीत ‌... त्यांच्या राज्यपद्धतीचा आपल्या गावात वापर केला. त्यांनी स्वतः गड-किल्ले भ्रमन करून शिवकालीन गाव व्यवस्थापन चे निरक्षन केलं . माझ्या मते तुम्ही तो त्यांचा व्हिडिओ पाहिलाच असेल .

त्यांनी त्यांच्या कर्तव्यास एक सेवा मानली .

आणि ते फक्त कार्य करत राहिले. आणि हाच त्यांचा यशाचा मंत्र आहे . आज त्यांना महाराष्ट्रात ओळखत नसनारा एकही व्यक्ती नसेल . 

🔷सरपंच पदासाठी फॉर्म भरलेल्या व्यक्ती साठी🔷


• तुम्हीही भास्करराव पेरे होऊ शकता.

• थोडा वेळ लागेल पण नक्की होचाल.

• गावातील जनतेनं केलेला भरोसा इमानदारीने निभवा .

• निवडणूक लढवण्यापुर्वी गावचा सरपंच जसा तुम्हाला हवा होता तसं काम करा ,  पुढील निवडणुकीत तुमचं काम नक्की जिंकेल .

•  गावातील जनतेला पैसा देण्यापेक्षा , त्यांचा विचार जाणून घ्या . त्यांच्या पुढे विचार व्यक्त करा . गावच्या समस्या जाणून घ्या ...

•  आशा आहे तुम्ही पण एक आदर्श सरपंच होणार 


🔷 मतदाराला समर्पीत 🔷

१.कृपया स्वतःची किंमत विकू नका.

२. होणाऱ्या सरपंचाकडून काम करून घ्या पैसे घेऊ नका.

३. तुमचे गाव तुमच्यासाठी स्वर्ग आहे. त्याचा राजा योग्यच निवडा.

४. तुम्ही केलेली एक चूक अख्खा गाव पाच वर्ष भोगेल.

५. सरपंच जातीचा,घरातला,भावकीतला आहे या पेक्षा तो गावाला काय देऊ शकतो हे पहा .

६. पैसे घेतले तर काय होईल, माझ्या १०००-५०० ने काय फरक पडेल हा विचार कधीच करू नका . आज तुम्ही ईमानदार असला तरच तुम्ही तुमचा हक्क मागू शकाल .

७. पाच वर्ष हा काळ खूप मोठा आहे, तो शिकलेल्या हातात द्या त्याला वाया घालवू नका .

८. सरपंच बोलका हक्क मागून/भांडून/लढून आणणारा असावा .

९. आणि एक महत्त्वाचा , जो आत्ता स्वताचा प्रचार करण्यासाठी वायफळ खर्च करतो .त्याला मत तर कधीच देऊ नका . कारण तो तर कधीच गावची सेवा करू शकणार नाही .

१०. गावचे हित तुमच्या एका मतात आहे. 


--{ बाकी तुम्ही सुजान नागरिक आहात }--

व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

✍️ अर्जुन अप्पाराव जाधव

मु.पो.नंदनशिवणी ता.कंधार  जि.नांदेड

 ____________________________________


---{ सदर लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा , आणि एक शेअर करा .... }---






➖➖➖➖➖➖🔴➖➖➖➖➖➖

दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp समुहा मध्ये सहभागी व्हा

-{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-

📱आवडल्यास नक्की शेअर करा📱


({});

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !