बेलफळाचे आरोग्यीक फायदे - आरोग्य

वैदिक आर्यांनी देखील बेलवृक्षातील औषधी गुण हेरले होते. बेलफळाचे वर्णन आपल्याला जागोजागी मिळते. बिल्वालाही उपकारी मानले जाते. ' महान्वै भद्रो बिल्वो महान् भद्र उदुंबर अथर्ववेद'. महान पुरूष बेलफळासमान उपकारी असतो. बिल्वाला महान आणि भद्र अर्थात सज्जन-दुसर्‍यांची मदत करणारा, कोणाच्याही प्रती वाईट भावना न ठेवणारा मानले जाते. कमी पाणी असणार्‍या क्षेत्रातही कोणाच्याही संरक्षण आणि परिश्रमाशिवाय स्वत: उगणारा हा वृक्ष खर्‍या अर्थाने सेवक आहे. मनुष्य आणि पशू-पक्षी दोघांना भोजन प्रदान करतो. भोजनही असे की जे मधुर आहे, कल्याणकारी आहे, औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. या वृक्षाच्या स्तुतीत जे लिहिले गेले किंवा लिहिले जाईल ते कमीच ठरेल अशी या वृक्षाची किमया आहे. 

या वृक्षाचे फळ गोल असते. या फळाची बाहेरची त्वचा लाकडासमान मजबूत असते. डिसेंबर-जानेवारीत पाने गळल्यानंतर फ्रेब्रुवारीत नवीन पानांसोबत लहान लहान श्वेत पुष्प फुलतात. हीच फुले नंतर लहान-लहान टणक गोल फळांमध्ये परिवर्तित होतात. मे महिन्यात फळे पिकण्यास सुरुवात होते आणि ही प्रक्रिया काही महिन्यांपर्यंत चालते. बर्‍याचदा तोडली न गेलेली फळे तीन पाव ते एक- दोन किलो वजनापर्यंत जड होतात. 

वृक्षाच्या पातळ फांद्यांनाही ही फळे फारच दृढतेने लटकत असतात. कच्चे फळ आपोआप पडत नाही. लाकडाच्या टणक आवरणाच्या आत पिवळ्या रंगाचा बलक असतो. मध्ये गोल मटारच्या दाण्यांप्रमाणे बीज असून ते मधाच्या रंगासारखे तरल चिकट पदार्थाचे आवरण असते. हा पदार्थ डिंकासारखा असतो. जर बेलफळाची त्वचा इतकी मजबूत नसती तर या सुगंधित गोड बलकाचे रक्षण कसे झाले असते? हा एक निसर्गाचाच चमत्कार मानला पाहिजे. पिकलेल्या फळाच्या सुगंधाची तुलना संस्कृतामध्ये चंदनाशी केली गेली आहे. हा आतील बलक खायला गोड आणि स्वादिष्ट असतो. पोटाच्या आणि इतर व्याधी किंवा इतर अनेक रोगांसाठी या बलकाचा प्रयोग केला जातो. आयुर्वेदात बिल्व एक अत्यंत महत्त्वपूर्ण औषधाच्या रूपात वर्णिले गेले आहे. बेलफळाचे विविध आजारांवर अनेक उपाय सांगितलेले आहेत. 

गावात कच्च्या घरांच्या बाहेरील भागात लिंपताना यातील बलक मिळविण्याचीही प्रथा आहे. त्यामुळे लिंपताना चिकणपणा आणि मजबूती येते. उंट या फळाला अत्यंत चवीने खातो. हे फळ तोडल्यानंतरही बरेच दिवस चांगले राहते. 

याच औषधी गुणांमुळे हे फळ आणि याची पाने पवित्र मानली जातात. आणि श्रीफळ म्हणून श्रींची अधिष्ठात्री देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. मात्र सध्या बिल्व केवळ ' पूजेची वस्तू मानले जाते ही फार दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे. मोठ्या शहरांमध्ये राहणारे असंख्य लोकांनी हे फळ खाणे तर दूरच या फळाला पाहिलेही नसेल. मोठ-मोठ्या बागेत आंबे, लीची, यासारखी फळांचे वृक्ष शोभा आणतात तिथे बेलाचे वृक्ष फारच कमी लोक लावतात. हे एक सुंदर, डेरेदार फळदार वृक्ष असल्याने ते लावण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. हा वृक्ष घरचा वैद्यही आहे. बेलफळ प्रोटिन्सचा अत्यंत उपयोगी स्रोत आणि टॉनिकही आहे. थंडावा प्रदान करणारा आहे. बेलफळात एंटीबायोटिक गुण असतात. डायरिया, हगवण, बद्धकोष्ट, अपचन या व्यतिरिक्त बेल अमिबिक डिसेंट्री आणि पोटदुखीतही उपयोगात येतो. 

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...