समज नात्यांची - मराठीचे शिलेदार समूहावर ०५/१०/२०२० ला प्रकाशित झालेल्या काही सर्वोत्कृष्ट कविता





अशी कशी हरवली..

जगी समज नात्यांची

कुस्करली जाते अब्रू

इथे कोवळ्या पात्यांची

एक काळ तो होता...

रक्ताच्या नात्यांपरिस

शेजारधर्म श्रेष्ठ होता

आज घरातलेच किडे

वळवळतात वासनेने

सांगा नात्यांना जगात

काय अर्थ उरला आता

काका...मामा...आजोबा

बापापेक्षाही नाती ही...

कधीकाळी श्रेष्ठ होती

बाप नसतानाही कधी

माणुसकी जागवत होती

आज हीन ठरतेयं नाती

विश्वास कुणावर ठेवावा..?

समज नात्यांची जाणावी

असा आदर्श कुठे पाहावा..?


सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर  , चंद्रपूर

 सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक

 ©मराठीचे शिलेदार समूह

 

✍️समज नात्यांची✍️

समज नात्यांची कशी

राहिली समज अन् गैरसमज

यांच्या पलिकडे गेली

सुख दुःखाच्या सिमा रेषा

पूर्ण ओलांडून ती ह्दद् पार

झाली अशी ही नाती गोती

पूर्वी तूटता तूटत नव्हती

आज जुळता जुळत नाही

मी अन् माझ या नित्ती मत्तेच्या

भोवऱ्यात समाज वावरतो

मज कुणाची न लगे गरज 

मी म्हणें सर्व श्रेष्ठ......

माझ् शिवाय कोणा न कार्य

सफल ही फक्त विचार सरणी

पण कृती मात्र शून्य........

संस्कांराच्या नावाखाली

पिढी पूर्ण दबली जात आहे

मी त्वाचे अस्तित्व रसा 

तळाला जाते आहे कोण

त्याला वालीच नसे

अन् त्यात भर म्हणजे विषाणूचा

मास्क बांधून तोंडा शब्द  वाक्य

गीळे मन उघडे कराया नाही

त्यांच्या जवळ सांधा हीच

जीवनाची रीत झाली आहे

काय करावे सांगा


सौ कुसुम पाटील कसबा बावडा

कोल्हापूर

©सदस्य मराठी चे शिलेदार सदस्य


 समज नात्यांची 

समज नात्यांची कस सांगू पोरी

आत्ता असती तुझी आई 

तर असत किती बरी .....

झाली  तु ऋतुवरी 

वाहवेल मनी भावनांचा उम्हाळा 

गुंतू नको क्षणीक सुखात 

पाठलाग कर स्वप्नांचा..... 

ध्येयांचा उच्चांक गाठ

झेप घे नभांगणात 

सगळं सुख येईल 

आपोआप तुझ्या पदरात...... 

जग झाल आहे खुप वाईट 

विश्वास ठेवू नको कुणावर 

स्पर्श आणि नजरेने

घे ओळखुन अन् हो सावध

सलगी करू नको अश्यांची 

होऊ नकोस सावज........... 

प्रेम वात्सल्याची मुर्ती 

समजतात स्त्री ला सारी

पण कठीण समयी हो तु

दुर्गे दुर्घट भारी.............. 

हेच खर वय आहे 

स्वतःला सावरण्याचा 

आकर्षणाच्या मृगजळाला टाळून 

स्वतः ला सिद्ध करण्याचा 

स्वतः ला सिद्ध करण्याचा ......


सौ रुपाली म्हस्के गडचिरोली 

सदस्या मराठीचे शिलेदार समूह


 समज नात्यांची

समज नात्यांची समाजात

आता कशीच राहिली नाही ...

गुंतलेत सर्व आपल्याच विश्वात

कोणाला कोणाची गरज राहिली नाही...


जूने संस्कार विसरलेत आता

मोठयाचा मान घरात ठेवत नाही...

भाऊ भावाचाच येथे वैरी झाला

आई वडिलाना कोणी विचारत नाही....


पैश्यासाठी हाफापली दुनियासारी

माणूस माणसाला विचारत नाही...

गरजेसाठी जगतात येथे सगळे

समज नात्यांची आता राहिली नाही....


जूना काळ खरचं बरा होता

एकत्र एकजुटिने सर्व राहत होते....

आपुलकी आदराणे विचारत होते

मनामनाने एकमेका जवळ होते...


कलियुगात माणूस माणसापासून

मनाने दुरावत चालला आहे....

समज नात्यांची येण्या आगोदर

एकलकोंडया होत चालला आहे ...


विजय शिर्के , औ. बाद .

© सदस्य मराठीचे  शिलेदार समूह .


समज नात्यांची

 जन्माला आले तेव्हा

 सगळ्यांनी माझं कौतुक केलं

 

 नात्यांची समज येई पावेतो

 तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं


 मुलीचा जन्म म्हणजे काचेचं भांडं

 म्हणून मला नजरेच्या धाकात ठेवलं

 धनाची पेटी म्हणून वावरले मी घरात 

सासरची तू लक्ष्मी म्हणत 

 काढली माझी वरात


 लेख या घरची म्हणत 

घराचा उंबरा नाही ओलांडू दिला

 सून बनवत सासरच्यांनी 

 लावल उंबऱ्यात  माप ओलांडायला 


 आईच्या जागी सासू अन  बापाच्या जागी सासरा आला  आयुष्यात

 सासर माहेरच्या नात्यातलं 

अंतर पक्क झालं मनात


 नात्यांची समज येण्याआधी एवढं मात्र कळलं

 नाती बदलले की माणसं बदलतात हे समजल..


 सौ अनिता व्यवहारे 

ता श्रीरामपूर जि अहमदनगर

 सदस्य मराठीचे शिलेदार समूह


नात्यांची समज

 काल दादा चा मोठा वाढदिवस साजरा झाला

 माझ्या वाढदिवसाला साधा केकही नाही केला. 

 आई आम्ही दोघ तुझीच लेकरं ना गं

 मग आमच्यात असा दुजाभाव का ग

 तुला मला आत्या नि  मावशीला नेहमीच का गं 

रोखलं जातं

 बाबा, दादा नि काका,  मामाला

 कायमच हुशार का ग मानलं जातं

 शाळेत शिकवलं जातं मुल नि  मुली दोन्ही असतात ग सारखे

 मग आपल्याच घरात आपण का ग पोरके 

 दिवा नि पणती सारखाच प्रकाश 

देतात  ना ग

 मग पणतीला सारून दिव्यालाच पाजळतात का ग

 समज नात्यांची मला अजून कळत का ग नाही

 नात्यांच्या पलीकडचं जग मला दाखव ना ग आई


 सौ अनिता व्यवहारे 

ता श्रीरामपूर जि अहमदनगर

 सदस्य मराठीचे शिलेदार समूह


आपली माणसं जपण्यासाठी

गरज आहे समज नात्यांची यायला

नाहीतर उद्या कोणी उभे करणार नाही

तहानलेल्या ला घोटभर पाणी द्यायला


आत्ताचे पिढीला शिकवले पाहिजे

नैतिकता अन् त्याची मूल्ये जपायला

नाहीतर कळणार कसे त्यांना 

जीवनात चांगलं वाईट ओळखायला


समजलेच नाही जर भाऊ बहिणीचे नाते

समाजात वावरताना दिसतील लचके तोडणारे चित्ते

नाही कळेना कसे समजवावे

या लहानग्या जीवांना

या विचाराने सगळ्यांच्या जीवाची होऊ लागली दैना


लहान मोठ्याच्या मानाचा जमाना लागला संपू

एकमेकाच्या भेदापायी परिवाराला लागला कंपू

आपापसातल प्रेम नको होऊ दे तिळमात्र कमी

हे देवा मला हवी तुझ्याकडून याची हमी


बाकी काही झाले नाही तरी

समज नात्यांची प्रत्येकाला येऊ दे

तिरस्काराची भावना माणसाच्या

मनातून पूर्णपणे जाऊ दे


समज नात्यांची चिमुकल्यांना 

योग्य वेळी येऊ दे

अन् हृदयात त्यांच्या सतत

प्रेमाची फुले फुलू दे


मिलन भूपेन डोरले पुणे

सदस्या मराठीचे शिलेदार समू ह


नात्याची नात्याला समज यायला हवी

नसते येथे काही खाण्यासाठीच्या चवी.....१


नाते असते जवळचे अन् बरेच लांबचे

बांधून ठेवा नात्याला ऋणानुबंधात कायमचे....२


आईवडील बहिणभाऊ आत्या मावशी

काका काकी मामामामीप्रेम करती जानशी....३


होता लग्न आपले शेजारी बसते सजून धजून बाहुली

दिनरात आपल्या सोबत सुख दुःखाबनते सावली....४


सासूसासरे मेव्हुणामेव्हुणी अधिक येती जवळ

किर किर ना होवो घरात कधी बनावे देवळ...५


देवळात अशा फुलती फुलपाखरे छान

माया ममतेने फुलून येते घरातील रान...६


नाते असे सांभाळून जपावे जीवाजतन सारे

तू तू मी मी करणारे ना समज असती म्हणू रे....७


लाडप्यार जिथल्या तिथे ठेवावे झाकून

संस्काराचा वरदस्त असावा हाती राखून...८


खुप ताणले अथवा सोडले ढिले तुटतेच तुटते सुटते

वेदनाविना मनाला असेच नाते खुपच खुपते....९


पोटापाण्या प्रश्नापेक्षा असावे अजून नात्याला काही

खत पाणी मुबलक असले तरी समजून घ्यावे जराही...१०


गरज असते प्रत्येकाला नात्याची समजून घ्यावे

तेंव्हाच नाते गोते आपण आपले समजावे....११


©️✍️....

*मा.kvकल्याण राऊतसर* 

मराठवाडाप्रदेश लातूर 

©️मराठीचे शिलेदार 

9421372689


समज नात्यांची


समज नात्यांची लयाला गेली

आपलेच अपत्य फेकून दिली

मायबापाची बुध्दी भ्रमनिरास

मुलालाच 'नकोशी' समजली  ॥


समज नात्यांची भरकटली गेली

पित्याच्या दौलतीवर नजर फिरली

पेट्रोल ओतुन स्वत:च्या मातेला

भरदिवसा चौकात जाळायला निघाली


समज नात्यांची प्रेमातुर निघाली

वासनेच्या चक्रात पुरता अडकली

बोहल्यावर चढून चारच दिवसात

प्रियकर मदतीने पतीहत्या करविली॥


समज नात्यांची पाषाणह्रदयी निघाली

बायकोपुढे मायबापाची दैना केली

जन्मदात्या मायबापांची अंत्ययात्रा

अंतिमसंस्कार कर्तव्य टाळू लागली


समज नात्यांची परिपक्व होण्यास

असावा अंतरीचा जिव्हाळा भारी

रक्ताच्या नात्याबरोबर मानलेलीही

नाती येतील सुखदु:खात सर्वतोपरी ॥


दत्ता काजळे (ज्ञानाग्रज)

उस्मानाबाद

©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह



Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !