◼️ कविता :- महाभारत अजून चालू आहे...
🔸आपुलकी🔸
➖➖➖➖➖➖➖➖➖
महाभारत अजून चालू आहे
फक्त पात्र बदलले आहेत
जीवन संघर्षाच्या नाटकातले
फक्त मुखवटे बदलले आहेत
दिसतील घायाळ अश्वत्थामा
दुःख उरात घेऊन फिरताना
किती तरी मिळतील भीष्म
केवळ वाचनासाठी जागताना
आजही सर्वत्र दिसतात कर्ण
नियतीने क्रुर सूड उगवलेले
आपल्याच मनातून खचलेले
वाईट संगतीने वाट चुकलेले
स्वार्थी दुर्योधन ही आहेतच
आपल्यात भांडण लावणारे
दोन चार इंच जमिनीसाठी
नातेसंबंधांचा ही जीव घेणारे
जीवन मोठं संघर्षमय आहे
इथे प्रत्येकालाच लढायचयं
चक्रव्यहातल्या अभिमन्यूला
मायेने धीरानेच सोडवायचंय
इथे एकाकी पडलेत सर्वच
एक दुसऱ्याची गरज आहे
राज्य महाराज्य नको आता
जराशी आपुलकी हवी आहे
काळ बदलला वेळ बदलली
आता तुम्ही ही थोडे बदला हो
महाभारताचा बोध घेऊनी त्या
आपल्यात आपुलकी वाढवा हो
Comments
Post a Comment
Did you like this blog