◼️ कविता :- पणती होऊ या

मराठीचे शिलेदार समूहावर प्रकाशित झालेल्या इतर कविता

  1. विकलेली माणुसकी
  2. आत्मपरीक्षण
  3. माझ्या मामाचे गाव
  4. विजयानंद
  5. पणती होऊ या

____________________________________


पणती होऊ या

पणती होऊ या

प्रकाश देऊ या

ज्ञानाचा दिवा हा

घरोघरी लाऊ या !!


प्रेमाचे हे बंध 

घट्ट बांधू या

नाते प्रेमाचे हे

जपूनची ठेऊ या !!


आनंद देऊ या

आनंद घेऊ या

आनंदाचे क्षण 

वारंवार पाहू या !!


पणती होऊ या

जपून ठेऊ या

अंधार असता

प्रकाशीत होऊ या !!


पणती होऊ या 

अंगणी तेवत

उजळत राहू

अंगण उजळू या !!


✍️सौ.सत्यभामा आदिनाथ वाघमारे (झेंडे)

 म्हसवड नं 2

कुकुडवाड ता माण जि सातारा

©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.

🔥☄️🔥☄️🔥☄️🔥☄️🔥☄️🔥☄️

आधाराची घट्ट जोड अन्

ममतेचा ओलावा जपू या

आशेची नवंकिरण देणारी

इवलीशी  पणती होवू या//धृ//

दाटलाय चोहीकडे आज

एकाकीपणाचा अंधकार

पातक कर्मांनी जगती या

माजलाय खूप हाहाकार

घाबऱ्या जीवास विसावा

अन्  प्रेमाचा हात देवू या

विश्वासाने  व्यक्त होणारी

इवलीशी  पणती होवू या //१//

समतोल ढासळलाय इथे

कोवळ्या भाव भावनांचा

मुक्त,निर्भय संवादावाचून

घसारा  होतोय  नात्यांचा

दुभंगलेल्या  काळजाच्या

मानवाला एकत्र आणू या

मुखी  हास्य  फुलविणारी

इवलीशी  पणती होवू या//२//

माझं  माझं करता करता

थोडं समाजाचं देणं फेडू

स्वार्थात गुरफटलेल्या या

निद्रीस्त मनाची तार छेडू

माणुसकीचे  कमळ पुष्प

हृदयजलाशयी रूजवू या

प्रीत  सुगंध  दरवळणारी

इवलीशी  पणती होवू या//३//

जात,पात,धर्म,पंथ,भाषा

खूप ओढल्या लक्ष्मणरेषा

'माणसातला माणूस' हीच

ओळख नवीन पटवू देशा

झुळूक बनून स्वयंप्रेरणेची

लुप्त  संवेदना  जागवू या

अंतरी हळूवार स्पर्शणारी

इवलीशी  पणती होवू या//४//

झाले गेले विसरून सारेच

एकमेकांस देवू आलिंगन

क्लेश  अवघे सारूनी दूर

सजवू सप्तरंगी हृदयांगण

जीवन आनंदीत करणारे

सुगंधीत अत्तर शिंपडू या

मना  प्रफुल्लित करणारी

इवलीशी  पणती होवू या//५//

 मीता नानवटकर नागपूर

 ©सदस्या मराठीचे शिलेदार समूह

🔥☄️🔥☄️🔥☄️🔥☄️🔥☄️🔥☄️


पसरेल जरी निशा काळोखी

तम दुःखाचा पसरेल जीवनी

मिणमिणत्या ज्योतीसम तव

आपणही कधी उजळू या....

अंधःकारावर मात करेल अशी

इवलीशी पणती होऊ या.....


सुखदुःखाचे जाळे विणे भाग्य

त्या जाळ्यावर कर्मकर्तव्याची

मनासारखी नक्षी गुंफत जाऊ

नक्षीदार ते आयुष्य उजळण्या

अंधःकारावर मात करेल अशी

इवलीशी पणती होऊ या........


उजळून जाऊ आपले आपण

पण हुरळून न जाणार कधी...

डोह परदुःखाचा शोधून जगी

त्या डोही आनंददीप सोडू या

अंधःकारावर मात करेल अशी

इवलीशी पणती होऊ या........


सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर ,चंद्रपूर

कवयित्री/लेखिका

 सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक

 ©मराठीचे शिलेदार समूह

🔥☄️🔥☄️🔥☄️🔥☄️🔥☄️🔥☄️


तिमीरातून तेजाकडे,

अज्ञानातून ज्ञानाकडे।

तेज शिंपण्या चोहीकडे,

पणती होऊ सवंगडे।।१…


मनामनातले वैरत्व,

प्रेमभावे भस्म करु या।

स्नेहाची ज्योत पेटवूनी,

काळजात प्रेम भरु या।।२…


पणती होऊ या ज्ञानाची,

पणती होऊ समृद्धीची।

पणती होऊ संस्काराची,

पणती होऊ ममताची।।३…


दुःखाचा लवलेश नसो,

सुखात दुःख शेष नसो।

हरेल ऐसी रेस नसो,

घातकी असा क्लेष नसो।।४…


आनंद सुख नि प्रेमाची,

गुणून गीनती होऊ या।

दुःखाला सारून सुखाचे,

मन मनातले गोवू या।।५…


नातीगोती सगे सोबती,

जगण्याचे मार्ग दावती।

सुधाकरा उन्नतीसाठी,

पणती असू द्या भोवती।।६…


सुधाकर भगवानजी भुरके गुमथळा नागपूर

©सदस्य मराठीचे शिलेदार समूह

🔥☄️🔥☄️🔥☄️🔥☄️🔥☄️🔥☄️


तिमिरा मध्ये वाट ज्यांची 

त्यांना प्रकाश देऊया 

अंधःकार करण्या धूर 

एक पणती होऊ या 


तिमिरातुनी तेजाकडे 

जाण्यासाठी तिची धाव 

उजेड तिचा मंद जरी 

अंधाराचा घेई ठाव


एक पणती होऊया 

अज्ञानरूपी राक्षस हरण्या 

ज्ञानाचा उजेड पसरवू 

सर्वांचे कल्याण करण्या 


निराशेच्या खोल गर्तेत 

जेव्हा होतो आत्मघात 

मनःशांती मिळते खरी 

पणतीच्या मंद प्रकाशात


 सौ.राजश्री पोतदार, वाई सातारा

 ©सदस्या मराठीचे शिलेदार समुह

🔥☄️🔥☄️🔥☄️🔥☄️🔥☄️🔥☄️



         संकलन / समूह प्रशासक

                  ✒राहुल पाटील.          

                      ७३८५३६३०८८.             

© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह

_____________________________________

मराठीचे शिलेदार समूहावर प्रकाशित झालेल्या इतर कविता

  1. विकलेली माणुसकी
  2. आत्मपरीक्षण
  3. माझ्या मामाचे गाव
  4. विजयानंद
  5. पणती होऊ या

____________________________________










Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...