विकलेली माणुसकी मराठीचे शिलेदार समूहावर 3 ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या काही अद्वितीय कविता

__________________________________________

__________________________________________

विकलेली माणुसकी

सध्या रक्ताचे नातेही

रक्त लागले विसरू

गाय लागली हंबरु

नाही जवळ वासरू....!!


झालं चर्रर्र काळीज

वेड्या आईचे शेवटी

वाट पाहून पाहून

श्वास सोडला शेवटी...!!


मूर्ख पुत्र असा कसा

देवा तू उदरी दिला

पुत्र मुख बघण्यास

श्वास रे तळमळला...!!


तुही पुत्र विरहात

श्वास अंतिम घेशील

तेव्हा नक्की माऊलीला

मनी तू आठवशील...!!


तुझ्यासाठी माऊलीने

रक्ताचे पाणी रे केले

पत्नीच्या रे गुलामाने

माणुसकीला विकले...!!


सौ-राजश्रीताई मिसाळ ढाकणे बीड 

 © सदस्या-मराठीचे शिलेदार समूह

🔷🌺🌀⬛🔴♨️▶️➡️💠⚕️

विकलेली माणुसकी

शून्य किंमत असते

तरीसुध्दा माणसाला

कसे कळत नसते......!!


करोडपती असून

याचकाला हाकलतो

पाषाण हृदयाचा तू

माणुसकीला विकतो....!!


संपत्तीच्या लालसेने

भावभावाचा रे वैरी

रक्ताच्या नात्याचाही तू

स्वार्थासाठी अंत करी...!!


सत्ता संपत्ती पदाची

हाव आहे प्रत्येकाला

कटकारस्थान करून

विकले माणुसकीला...!!


किर्तीरूपी उरण्यास

सदाचाराने वर्तावे

नित्य सत्कार्य करून

जन्मदात्या उद्धरावे...!!


सौ-राजश्रीताई मिसाळ ढाकणे बीड

 © सदस्या-मराठीचे शिलेदार समूह

🛐⚛️🕉️✡️🔯☸️☮️☯️✝️☦️☪️🕎


विकलेली माणुसकी 

तुझ्या अंतःरंगातुनी 

मज वाटेना माणुस 

तुझ्या बाह्यअंगातुन 


  निती भ्रष्ट झाली तुझी 

  नसे तुला रे प्रमाणं

  सारे असुनी एकटा 

  मरशी तु रे भ्रमानं 


तु रे  माणुसच आहे 

नाही कुत-याची जात

तरी कुटुंबात तुझ्या 

काहे करशी तु घात 


  विकलेली माणुसकी 

  जगी माणसे दिसती 

  लुटे अब्रू तान्हुल्याची 

  ही का माणसे असती 


ज्याचे संयमांना इथे 

अशी किड रे लागली 

चढवा रे फासावर 

जे व्यभिचाराने वागली 


  सारे जग रे हे तुझे 

  सारे श्वासच रे घेती 

  दे रे आधार तु जीवा 

  लेका वाढेल महती 


श्री.अरुण चांदेवार नागपुर

©सदस्य मराठीचे शिलेदार समुह

✴️♨️✴️♨️✴️♨️✴️♨️✴️♨️✴️♨️✴️


विकलेली माणुसकी

कोणाकडे पाहता येते का

शून्य किंमत असूनही

माणूस माणसकी सोडतो


संपत्तीच्या लालसेने

आपले अन् परके कोण

हे ही त्याला  कळेना

रक्ताची नाती दूर ढकलतो


सत्ता, संपत्ती पद,ही 

समाजात प्रतिष्ठा आणते

पण माणसा तू त्याचा

गैर वापर करु नको रे


करोडपती असून ही

तूझी वागणूक रोडपती

पाषाण ह्यदयी  तू

माणूसकीला विकलास


तूझ्या साठी माऊलीने

रक्ताचे पाणी रे केले अन्

पत्नी येताच गुलामाने

माणुसकी ला विकलास


तुझ्या संयमाला कशीरे

किड लागली अन् तू

होतास कोण अन् झालास

कोण माणूसकी विकलेला


सौ कुसुम पाटील कसबा बावडा

कोल्हापूर

©सदस्य मराठीचे शिलेदार समूह

⚔️🛡️⚔️🛡️⚔️🛡️⚔️🛡️⚔️🛡️⚔️🛡️⚔️


 विसरला सारे गणगोत

 विदेशात मस्त स्थिरावला

 आई बाप भाऊबंधालाही

 हळूहळू चक्क विसरला ॥


 पैसा ऐश्वर्य संपत्तीमागे

 नातीगोती विसरून गेला

 स्वार्थापोटी रक्ताच्या नात्याला

 पुरता गालबोट लावला  ॥


 माणुसकी विकताना लाज

 नाही जराशीही बाळगली 

 माता पित्याची ममता त्याने

 अजिबात नाही ओळखली ॥


विकलेली माणुसकी आता

 कशी सांधणार नातीगोती 

वेळ नाही आता माझ्याकडे

 म्हणतो द्या तुम्ही मूठमाती ॥

 

 दत्ता काजळे (ज्ञानाग्रज)

  उस्मानाबाद

© सदस्य,मराठीचे शिलेदार समूह

💎👑💎👑💎👑💎👑💎👑💎👑💎👑💎


गर्द निळ्या आभाळी

दिसे मने झाकलेली.... 

माणसाच्या बाजारात 

माणुसकी विकलेली....

रोज इथे झुरतो माणुस

रोज इथे मरतो माणुस 

ज्ञानी असुनही माणुस

माणसांना छळतो माणुस

माणसाच्या ज्ञानफळा

दिसे किड लागलेली......

माणसाच्या बाजारात

माणुसकी विकलेली...... 

शृंगार माणुसकीचा

नटण्या माणसाला 

दाणे पहा तपातुनी 

बिलगती कणसाला 

तरी तुझी अभिमानी

का नजर ताकलेली......

माणसाच्या बाजारात 

माणुसकी विकलेली.....,.



श्री.अरुण चांदेवार नागपुर

©सदस्य मराठीचे शिलेदार समुह

🎎🎎🎎🎎🎎🎎🎎🎎🎎🎎🎎


विकलेली माणुसकी

आज दिसे ठायी ठायी,

नाही कुणावर विश्र्वास

मरणयातना हिच्या पायी!


विकलेल्या माणुसकीचे

दिसती सर्वत्र भाऊबंद,

कुणी भ्रष्टाचारात बरबटलेले

कुणाच्या पायी मोहाचे बंध!


कष्ट करणे नको वाटते,

फुकटच्या पैशाची सुटते हाव,

माणसाचा माणसापासून

असा तुटत जातो गाव!


कुणी करती दलाली

कुणी मढ्यावर भाजतो पोळी,

कितीही खाल्ले धन तरी

यांची भरत नाही झोळी!


विकलेल्या माणुसकीला विकत घेऊन

परत माणसात आणावे लागेल,

तुडवले अन्याय,अत्याचाराला पायी

तरच माणूस नितीने वागेल!


श्री.मंगेश पैंजने सर,

ता.मानवत,जिल्हा-परभणी,

© सदस्य.मराठीचे शिलेदार समूह.

🛫🛬🛫🛬🛫🛬🛫🛬🛫🛬🛫🛫🛬🛫


विकलेली  माणुसकी ही

सहवेदनेने  मिळवू  परत

चला  घडवू पुन्हा एकदा

बंधुप्रेमास आसक्त भरत

स्वार्थास  देवू तिलांजली

आठवू  क्रांतीवीर  भगत

चला  घडवू राष्ट्र भक्तीने

स्वयंसमृद्ध सशक्त भारत

सुखदुःखाच्या वळणावर

करू एकमेकांची सोबत

चला घडवू शिल्प मनाचे

जमवू संस्कारांची दौलत

एकसमान मानव जगती

स्विकारू सत्य हे शाश्वत

चला  घडवू स्वयंस्फुर्तीने

पाया बंधुत्वाचा अविरत

निर्मळ मन, विवेक बुद्धी

काळजात  जपूया सतत

चला  घडवू सामंजस्याने

मानवतेची  भव्य इमारत

राहू एकोप्याने समाजात

मिटवू  मनातील  दहशत

चला घडवू जिव्हाळ्याने

भयमुक्त,  प्रेमळ वसाहत


 मीता नानवट‌‌‌कर नागपूर

 सदस्या मराठीचे शिलेदार समूह

🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽


स्री होऊन जन्म घेणे, का हा शाप आहे /

काय हो सांगा स्त्रीने,कोणते पाप केले आहे//


स्त्रीच्या अब्रूची लक्तरे, उघड्यावर टांगली आहे /

स्त्रीच्या ह्या देहाशिवाय, मनाला कुठे किंमत आहे //


स्त्री स्वातंत्र्याच्या चळवळी, कागदोपत्रीच राबत आहे /

वास्तविकता दाहक आहे,

तिला गर्भातच मारली जात आहे //


अत्याचाराच्या बातमीने,टीव्हीवर चर्चा- तांडव होत आहे /

जग मात्र निशब्द होऊन , जिवंतपणी मरण पहात आहे //


मेणबत्यांचा मूक मोर्चा, दोन दिवसांची हळहळ आहे /

शापित जगणे जगूनही, विटाळलेल्या नजरा झेलत आहे //


पण आता नको तू , उभी राहुस न्यायालयाच्या कठड्यात /

करू नकोस विनंती न्यायदेवतेला

तिलाही तराजूचं ओझं झालं आहे//


बनून रणचण्डिका, छाटून टाक हातपाय नराधमांचे /

न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी,

विकलेली माणुसकी वाट पहात आहे //

विकलेली माणुसकी तूझी वाट पहात आहे !

तुझी वाट पहात आहे !!


सौ वंदना बिरवटकर , मुंबई

सदस्या मराठीचे शिलेदार समुह

🦚🦈🐬🕊️🦚🦈🐬🕊️🦚🦈🐬🕊️🦚🦈🐬🕊️


शोधुन हि सापडेना येथे

आता माणसातली माणुसकी

एखादयाला मदत करायची

सोडून काढत बसतात सेल्फी


गरीबाला करून थोडीशी मदत

फोटो सोशमिडीयावर टाकतात

विकलेली माणुसकी येथे सारी

मेलेलेच्या टाकूवरचे लोणी खातात


भाऊ भावाला ओळखत नाही

कामा शिवाय जवळ येत नाही

नाते फक्त नावाला निभावतात

गरजेच्या वेळी कोणी येत नाही


उघडया डोळ्याने माणूसकिची

येथे लकतरे तोडले जातात 

सुरक्षित म्हणनाच्या समाजात

आबलावर रोज बलात्कार होतात


माणुसकीला येथे काळिमा फासला

प्रत्येक कामासाठी पैसा मोठा झाला

विकलेली माणुसकी येथे साऱ्यानी

डोळे आसून समाज आंधळा झाला 


विजय शिर्के , औ. बाद .

© सदस्य मराठीचे  शिलेदार समूह .

🔭✨☄️🌠🌏🔭✨☄️🌠🌎🔭✨☄️🌠🌍


घर विकलेस, जमीन विकलीस

होते नव्हते गावातले सोडलेस

श्रीमंतीच्या डामडौल पायी

माणुसकी विकलीस


असा कसा रे तू माणूस

शंका येऊ लागली मला

 खरचं देवानं काळीज 

दिलंय की नाही तुला


पैशाच्या जोरावर तू

वाटेल ते विकत घेतो

आमच्या गावाच्या पाण्याला

कशाला बरे नाव ठेवतो


पैसा नव्हता पदरी तेव्हा 

 माझा गाव बरा वाटला

शहरात जाऊन करोडो कमवून

गाव  भिकारडा वाटू लागला


पण एक गोष्ट लक्षात ठेव

कोरोनाच्या महामारीत 

सारे शहर झाले सैरभैर

अन् पळून गेले गावात


जरी गावाकडे पाठ फिरवून 

गेलास तू खराखुरा

पण सारा गाव माणुसकीचा

सोबत घेऊन असतो निवारा


गावात वेशीवर जाताच

गाववाल्यांनी केले तुझे जंगी स्वागत

म्हणून गड्या सांगतो कधी

सोडू नको गावच्या माणसांची संगत


कुठेही गेलास तरी 

गावाला नको विसरू

कायम राहणार आहे

तू गावचा वाटसरू


म्हणूनच सांगतो शेवटचं तुला शिकलास काही  नाही तरी माणुसकी फक्त शिक

म्हणजे कधीही मागायला लागणार नाही कोणाकडेही भीक


मिलन भूपेन डोरले पुणे

सदस्या मराठीचे शिलेदार समूह

💮🌺🌸💮🌺🌸💮🌺🌸💮🌺🌸


कुठे आहेस देवा

हाकेला गरिबाच्या येना रे

पाषाण झालेत डोळे बघून वाट तुझी

निष्ठुर झालास तुहि त्या सम रे

नराधम टपलेत अब्रुचे

लचके घेण्यास रे

मायेच्या पदरात ही

हात घालतात अवधर्मी सारे 

काय गुन्हा झाला

जन्म तूच दिलास रे

धाव घे आता तूच

पाठीराखा अमुचा रे

पांढरपोष  खेळ

 खेळतात ही माणसाशी

पैश्याच्या जोरावर कवडी मोल

विकलेली असते माणुसकी

बस कर देवा निष्ठुर नको ना बनु

अंत आता गरीबाचा नको असा पाहु

कितिरे भांडू नशीबाशिच 

भेटलास ना जर प्रश्ने तुलाच विचारु

वाटते भीति रे मी

मुलगी होण्याची आता

झाकलेल्या शरीराला खात 

असतात वाईट नजरा येता जाता

देवा असशील ना तू जरी

येऊन बघ इथे माघारी

माणूस घडविला होतास तू

पण तो आता झाला देवारि



सरोज फुलझेले

नागपुर

©️सदस्या मराठीचे शिलेदार समूह

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐





Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !