ट्रक ड्रायव्हर आणि मुर्ख - बोधकथा

🚍 एक ट्रक ड्रायव्हर आपल्या सामानाची डिलेव्हरी करायला एका वेड्याच्या इस्पितळात जातो.

काम करून परत निघणार, तेवढ्यात
त्याच्या लक्षात येते की,🚍 ट्रकचं एक चाक पंक्चर झालंय. तो ते चाक काढतो.
आणि स्टेपनी लावणार इतक्यात,
त्याच्या हातून त्या चाकाचे चारही नट गटारीत पडतात, अन् ते काढणं पण शक्य नसतं.

 🚍 ड्रायव्हर हताश होऊन बसतो. त्याला
काय करावं ते सुचत नाही. एवढ्यात,
एक मनोरुग्ण तिथे येतो आणि विचारतो काय
झालं ?

पहिले तर 🚍 ड्रायव्हर काहीच
बोलत नाही.
तो मनोरुग्ण परत पुन्हा
विचारतो, काय झालं ?

शेवटी  🚍 ड्रायव्हर
त्याला संपूर्ण कहाणी सांगतो आणि शांत
बसतो.

हे पाहून तो मनोरुग्ण त्याला
काय मूर्ख माणूस आहे ?
असं म्हणून
त्याच्या वर हासतो.

आता 🚍 ड्रायव्हरला राग येतो. तो त्या मनोरुग्णाला
उपाय सांगण्याचं आव्हान देतो .

मनोरुग्ण उत्तर देतो -

त्यात काय एवढं ?


इतर ३ चाकांचे एक एक नट काढून
त्या चाकाला लाव,
आणि ट्रक घेऊन
जवळच्या गॅरेजवर जा .🚍
ड्रायवर चाट
पडतो आणि म्हणतो - तुम्ही तर चांगले
शहाणे दिसता, मग इथे काय
करतायत ?

तो उत्तरतो -
मी वेडा
असेन रे पण

मूर्ख बिल्कुल नाही ...

मित्रांनो त्या🚍 ड्रायव्हर प्रमाणे आपली
गत असते. आपण स्वत:ला फार शहाणे
समजतो आणि इतरांना मूर्ख ...
खरं तर दुसऱ्याच्या बाह्य आवरणावर
जाण्याअगोदर कधी पण त्याचा एकदा
सल्ला घेऊन पाहावा, काय सांगता, जे
आपल्याला सुचलं नाही ते तो सहज करू
शकेल...
कोणालाही कमी लेखू नये...
🙏🏻

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...