कष्टाचे मोल अनमोल - बोधकथा

*ग्रीसमध्ये हेलाक नावाचा एक धनवान आणि लोभी माणूस राहत होता. आपल्या दुकानावर येणाऱ्या प्रत्येक मा णसाला ठकवणे त्याचे नित्या चे काम झाले होते. त्यातून तो भरपूर धन जमा करायचा. मात्र ते धन त्याच्याकडे टिकत नसे. कधी आजारात खर्च होत असे तर दुकानदारीत कधी खोट येत असे. हे पाहून त्याची सून त्याला समजवायची कि बेइमानीचे पैसे कधीच टिकत नसतात. परंतु हेलाक तिचे कधीच ऐकत नसे.*

*एके दिवशी त्याच्या मनात विचार आला कि सून जे म्हणते आहे त्याची परिक्षा घेवून बघू. त्याने इमानदारीने धन जमा करून त्याचे एक सोन्याचे गंठण बनवले व ते एका कपड्यात बांधले व त्यावर स्वत:चे नाव टाकून चौकात ठेवून आला. बरेच लोक येत जाता त्या कपड्याकडे बघत पण कोणीही उचलून नेले नाही. सर्वांच्या पायात लागत होते म्हणून एका माणसाने ते तसेच उचलले आणि तळ्यात फेकून दिले. तळ्यातील एका मगरीने ते गिळले. काही दिवसांनी एका मच्छिमाराला जाळ्यात ती मगर सापडली. त्यांनी तिचे पोट फाडले तेंव्हा तिच्या पोटात कापडात बांधलेले सोन्याचे गंठण निघाले, मच्छीमारांनी हेलाकचे नाव त्यावर पाहिले व बक्षिसाच्या आशेने गंठण त्याला आणून दिले. अनेक महिन्यांनी आपले सोन्याचे गंठण मिळालेले पाहून तो खुश झाला. आता त्याचा सूनबाईच्या बोलण्यावर विश्वास बसला कि इमानदारीने मिळवलेले धन कुठेच जात नाही आणि बेइमानिचा पैसा कधीच टिकत नाही. त्याने खुश होवून त्या मच्छिमारांना चांगले बक्षीस दिले व सुनेला शाबासकी दिली.*

*तात्पर्य- कष्टाने कमावलेल्या धनाने मानसिक शांतता, सुख मिळते तर बेइमानीने मिळवलेल्या धनाने अनेक वाईट गोष्टी घडून येतात.*
*कारण जे राहते ते कष्टाच आणि जे जाते भ्रष्टाच.*
*----------------------------*

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾कविता :- नवरा माझा

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾ललित लेख :- स्ञी

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

◾विशेष लेख :- प्रतिसृष्टी निर्माण करणारे दोन देवदुत पती पत्नी !