एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता ...
``` एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती ... तिथल्या स्थानिक राजाने एकदा चर्चा करायला त्याला बोलवले, भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा म्हणाला " महाशय तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ? काही त्याला शिकवा. त्याला सोने आणि चांदी यात जास्त मुल्यवान काय इतके सुध्दा कळत नाही " आणि मोठ्याने हसू लागला .... हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ... तो घरी गेला .... त्याने मुलाला विचारले " बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? " " सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला " हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ? म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..! माझी चार लोकात खिल्ली उडवली जाते .. तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे..!! मुलगा म्हणाला राजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो ... रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहे मी दिसताचं राजा मला बोलावून घेतो .. त्याच्या सोबत गावातील सारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात .... राजा एका ह