आठवण | मराठी कविता | मंगेश शिवलाल बरई

 'आठवण'

येता  मला कधीतरी,

तुझी सखे आठवण,

जीव माझा तळमळे,

जातो कोरडा श्रावण,


येता मला कधीतरी,

तुझी सखे आठवण,

स्वप्न ते पुन्हा आठवे,

 निशा हसे सुगरण,


येता मला कधीतरी,

तुझी सखे  आठवण,

माझे मलाच कळेना,

करी जीव वणवण,


येता मला कधीतरी,

तुझी सखे आठवण,

क्षण काही जीवनात,

राही थोडे दडपण,


येता मला कधीतरी,

तुझी सखे आठवण,

जातो विसरून मीच

माझे तन, मन, धन.



मंगेश शिवलाल बरई.

हिरावाडी, पंचवटी, नाशिक -४२२००३.

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◾कविता :- नवरा माझा

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

कविता :- सावर रे मना