काय केले त्या बापाने / बाप कविता
जन्म दिला जाणे तूच त्यालाच कसा बेईमान झालास । काय केले त्या बापाने तू त्यालाच विसरुनी गेलास ।। नको वागुस आता बनवून त्याच्याशी वैरी । थुंकेल जग सारे तुझ्यावर थुंकतील सोयरी ।। जीवन आहे कठीण अडचणी त्यात कितीतरी । परंतु आई वडिलांना विसरू नको जीव तुझा गेला तरी ।। अरे वेड्या ! तुझ्यासाठी बापाने सारं आयुष्य झिजवले । घामाच्या प्रत्येक थेंबाने तुझं भविष्य सजवले ।। या कष्टातून त्यांना तूच आता तारशील का? तुझ्या यशाचे फळ त्यांना शेवटी सुखाने चारशील का ? Written by - Arjun apparao jadhav . कविता कशी वाटली कमेंट मधे नक्की लिहा...