Posts

Showing posts from February, 2021

◾कविता :- नागडाच आहे काय तुजपाशी...

Image
नागडाच आहे काय तुजपाशी ना गडाच आहे काय तुजपाशी ग र्वानेच म्हणे बळे धनराशी डा गण्याच देती बोल या मनाशी च मत्कार श्रेष्ठ मानी तो मनाशी आ हे कठीणच माया मायाजाळ हे च भुललासे चुकलेले बाळ का ळ केंव्हा कोठे करेल घायाळ य थास्थित मनी वसेना दयाळ तु ष्ट होता जीव मस्त मस्तावला ज नी बोलतांना बोले बळावला पा श मायेचाच पाशे पाशविला शी घ्र चढे मद मदे माजविला श्वा सातच माझ्या देव वसलेला सा थ संगतीत असे रमलेला त या प्रेमवस्त्रे मी रे झाकलेला रे खी रेघोट्याच भक्ती भाळलेला मा झा भार वाही भारदस्त देव झा ला वेडा तोही घाली भक्ती खेव दे तो ध्यान असे क्षण ना विसरु व से मागे पुढे त्याचे मी लेकरु नां दतोच सुखे जरी मी नागडा द येनेच त्याच्या नसे मी उघडा तो च होता संगे आहे नी राहील य थामती भक्ती फळत राहील                                  निर्मिती:-                                  कवी - रा.र.वाघ,धुळे.             ...

◾कविता :- अंतरीची सुंदरता..

Image
अंतरीची सुंदरता.... अं तरीची सुंदरता त नावर विलसते री तसर विखरता ची रकाल खुलवते सुं दरता सुंदरच द क्ष सदा मनोहारी र मे मन हे खरच ता ळमेळ मोदकारी बा हेरील खाणाखुणा हे च मुळ अंतरीचे र हातसे उणादुणा ही च खुण खंत साचे उ णिवच येते पुढे म नी जर खोटे असे ल क्ष्य असो डोळ्यापुढे ते च सदा सत्य वसे स त्य जर अंतरात क री नाश नर्काचाच लां ब नाही ते मनात ना न्दे जीव स्वर्गातच आ नंदच द्यावा घ्यावा नं दलाल सांगे गीता दा वी बोध तोच घ्यावा ने ई पैलतिरा पिता आ नंदच मुळ असे पो हूनच पैलतिरा आ हे साधनच खासे प दोपदी ऐलतिरा खु णावते नाम मात्र ल गोलग घेई भार व से तन मनी पात्र ते च जीवनाचे सार                         निर्मिती:-                       कवी -  रा.र.वाघ,धुळे.                 (मो.नं. ७५०७४७०२६१)