◾विशेष लेख :- मराठी भाषेची थोरवी...
🌸 मराठी भाषेची थोरवी मराठी भाषा ही सर्वांग सुंदर भाषा आहे.मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षा ही जास्त आहे. मराठी भाषेतून आपण आपले विचार खूप व्यवस्थितपणे व विस्तृतपणे मांडू शकतो. मराठी भाषा समजण्यासाठी सोपी आहे. मराठी भाषेला खूप मोठा इतिहास आहे.मराठी भाषेला खूप मोठी संत परंपरा लाभलेली आहे. मराठी भाषेत एक प्रकारचे माधुर्य आहे. मराठी भाषेचे सौंदर्य अवर्णनीय असून, मराठी भाषा ही अल्लड, अवखळ, प्रवाही असून तिला अनेक रंगछटा आहेत. खूप सार्या साहित्यिकांनी मराठी भाषेत वेगवेगळ्या विषयावर खूपमोठ्या प्रमाणावर लेखन केलेले आहे. मराठीभाषा ही रसपूर्ण,अर्थपूर्ण, लाडिक, प्रेमळ शृंगारिक चंचल, शितल, ओजस्वी असून प्रसंगी ती दाहकहि बनते.आपणाला जे काही समोरच्या व्यक्तीला सांगावयाचे आहे किंवा आपले मत मांडायचे आहे ते आपण मराठी भाषेत खूप छानपणे अत्यंत मोजक्या शब्दात सांगू शकतो किंवा मांडू शकतो. मराठी भाषेतील शब्दांची ताकद प्रचंड आहे. मराठी भाषा खूपच देखणी, गोजिरी आहे. मराठी भाषेत एक प्रकारचा मायेचा ओला...