नजर
*नजर* नजर, दिठी, दृष्टी ! मानवास परमेश्वराने दिलेली बहुमोल बाब! साऱ्या चराचर सृष्टीचं ज्ञान मानवास ज्ञानेंद्रियांद्वारे होत असतं. त्यात सर्वाधिक वाटा डोळे या ज्ञानेद्रियांचा आहे. डोळयांना दिसणं म्हणजे दृष्टीस पडणं. त्याच अर्थानं नजरेस पडणं असं ही म्हटलं जातं. पण तरी बहुतेक नजर ही थोडी व्यापक संज्ञा असावी. नजरेत दिसण्यासोबत भाव भावनाचं लेपणही जोडलं जातं. माणसाच्या नजरेत किती भाव- भावना दडलेल्या असतात. मानवी मेंदूत उठणारे तरंग, उमलणारे सारे भाव, मानव प्राणी नजरेनंच अधिक व्यक्त करतो. कदाचित मेंदूपासून डोळे जवळ असल्यानं ही असावं? मेंदूतील ,काळजातील भाव चेहऱ्यावरील इतर अवयवाच्या हालचालीनं व वाचीकतेनं व्यक्त होतात! पण आतल्या मनोव्यापाराचा पसारा, आवाका मांडला जातो तो खरा नजरेनंच! तोंडाद्वारे, बोलत असुनही आपण बोलकी नजर, बोलके डोळे असंच म्हणतो! नजरेनंच आनंद, दु:खं, श्रृंगार, वेदना, कारुण्य, सल, ममत्व, लडिवाळपणा व्यक्त होतो. मनातले, काळजातले भाव आधी डोळ्यातच झरतात मग इतर अवयवातून! दु:ख, वेदना, यातना यात आधी डोळेच झरतात, आसवांनी डबडबतात! आईचं ममत्व लहान लेकरास आईच्या डोळ्यात व