कविता : अहो गणराया...

 अहो गणराया...


आगमना तुमच्या गणराया

केली बघा आम्ही आरास,

पाहुणचारा तुमच्या

मोदकांचा नैवेद्य खास,

येणार तुम्ही म्हणून

पसरले सगळीकडे 

कसे मांगल्याचे वातावरण,

अहो गणराया तुम्हीही व्हाल खुश

पाहून भक्तांचे आचरण,

लाभेल भक्तांना आता

तुमचा सहवास,

आगमना तुमच्या गणराया

केली बघा आम्ही आरास,

कटी झळके पितांबर,

रूप तुमचे दिसे सुंदर,

दिसे नजरेत तुमच्या

भक्तांचा भक्तीचा हर्ष-उल्हास,

आगमना तुमच्या गणराया

केली बघा आम्ही आरास,

अहो रिध्दी-सिध्दी नायका,

विघ्नहर्ता, विनायका,

राहिली संसारी आता

तुमच्याच भेटीची आस,

आगमना तुमच्या गणराया

केली बघा आम्ही आरास.


                          मंगेश शिवलाल बरई.

                       हिरावाडी, पंचवटी, नाशिक ४२२००३.


गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.👏👏👏

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾कविता :- नवरा माझा

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

नवरीसाठी भरपूर नवीन उखाणे | Marathi Ukhane For Bride