पावसा तू येणार आहेस का ... | मराठी कविता | संजय धनगव्हाळ Prayena.blogspot.com
' पावसा तू येणार आहेस का' (संजय धनगव्हाळ) ***************** पावसा तू येणार आहेस का येशील तर भरपूर ये सरींना हळूवार घेवून ये कधीतरी शेतकऱ्यांच्या आयुष्यातही आनंदाच्या लहरी बरसू दे तो रोज मरत असतो राबराब राबत असतो घाम कष्टाचा गाळूनही पिकतं नाही तो स्वतःसाठी कधी जगतं नाही त्यालाही कधीतरी जगू दे त्याच्याही आयुष्यात आनंदाच्या लहरी बरसू दे दिवाळी दसरा सणवार त्याला कधी माहीत नाही कधी तो चांगले कपडेही घालत नाही कर्जाचे ओझे कायम त्याच्या डोक्यावर असते या ओझ्याचा आभार आतातरी कमी होवू दे त्याच्याही आयुष्यात आनंदाच्या लहरी बरसू दे पावसा एकदा त्याच्या घरी येवून बघं त्याच्यासारख तू ही जगून बघं कसरती तो जगत असतो अर्धपोटी उपाशी रहातो त्याच्या सरणावर हारतुरे देणारे लाईनीत उभे असतात पेपरच्या पहिल्या पानावर बरेच दिसतात त्याची राख झाल्यावर सारेच पाठ फिरवतात तेव्हा पावसा आता तू त्यांना छळू नकोस रागाने पाहू नकोस त्यांच्याही घरी समृद्धीच्या पणत्या पेटू दे शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंदाच्या लहरी बरसु दे *संजय धनगव्हाळ* ९४२२८९२६१८ www.FMmarathi.in ...