कविता : वटपौर्णिमा ....| Vatpornima | संतराम पाटील
कविता : वटपौर्णिमा
😏😏😏😏🌽😏😏😏🎎
कशाला हवा जन्मोजन्मी एक पती
या जन्मी एक वडाच झाड लाव
त्याच्या सावलीला बसाल सगळे
तु आणि तुझे सगळेच गाव.....
वाडाच्या फांद्या फुलं फळे पारंब्या
देतील सर्वांना आरोग्यदायी दवा
प्रदुषण मुक्ती करण्या देतील
शुध्द निर्भेळ ऑक्सीजन युक्त हवा ...
तोडु नका फांद्या गुंडाळु नका दोरा
मारूनका फेरी करू नका उपास
अंधश्रद्धा कवटाळुनी न बसता
करा थोडा पर्यावरणाचा अभ्यास....
सावित्री ज्योतीच्या लेकी तुम्ही
अंधभक्ती आज्ञान सगळं विसरा
वडा पिंपळाच्या फांद्या पुजण्या पेक्षा
वृक्ष जगवण्यासाठी वृक्षा रोपण करा ....
एक वृक्ष देईल शुध्द निर्भेळ हवा
जगण्यासाठी तुम्हा ऑक्शीजन हवा
वटपौर्णिमा आली संकल्प करा नवा
एक वटवृक्ष लावा पतीसह मिळेल.....शुध्द हवा....
कवी: संतराम पाटील
9096769554
.jpeg)
Comments
Post a Comment
Did you like this blog