पावसा तू येणार आहेस का ... | मराठी कविता | संजय धनगव्हाळ Prayena.blogspot.com

 'पावसा तू येणार आहेस का'

(संजय धनगव्हाळ)

*****************

पावसा तू येणार आहेस का

येशील तर भरपूर ये

सरींना हळूवार घेवून ये

कधीतरी शेतकऱ्यांच्या

आयुष्यातही आनंदाच्या

लहरी बरसू दे


तो रोज मरत असतो

राबराब राबत असतो

घाम कष्टाचा गाळूनही

पिकतं नाही 

तो स्वतःसाठी कधी 

जगतं नाही

त्यालाही कधीतरी जगू दे

त्याच्याही आयुष्यात

आनंदाच्या लहरी बरसू दे


दिवाळी दसरा सणवार

त्याला कधी माहीत नाही

कधी तो चांगले कपडेही 

घालत नाही

कर्जाचे ओझे कायम त्याच्या डोक्यावर असते

या ओझ्याचा आभार

आतातरी कमी होवू दे

त्याच्याही आयुष्यात

आनंदाच्या लहरी बरसू दे


पावसा एकदा त्याच्या 

घरी येवून बघं

त्याच्यासारख तू ही 

जगून बघं

कसरती तो जगत असतो

अर्धपोटी उपाशी रहातो

त्याच्या सरणावर हारतुरे

देणारे लाईनीत उभे असतात

पेपरच्या पहिल्या पानावर

बरेच दिसतात

त्याची राख झाल्यावर

सारेच पाठ फिरवतात


तेव्हा पावसा आता तू त्यांना

छळू नकोस

रागाने पाहू नकोस

त्यांच्याही घरी

समृद्धीच्या पणत्या पेटू दे

शेतकऱ्यांच्या आयुष्यात

आनंदाच्या लहरी बरसु दे


*संजय धनगव्हाळ*

९४२२८९२६१८


www.FMmarathi.in

Comments

Post a Comment

Did you like this blog

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !