Posts

मन मनाच्या शोधात !

Image
                   मन मनाच्या शोधात...!     मन मोकळं करायचं असेल तर स्वतःशीच एकांतात संवाद करावा ...उत्तर सापडत असतं...! कारण शंभर टक्के आपलं ऐकून समजून घेणारं मन ...एखाद्या मनासाठी जणू अस्तित्वातच नसतं... ! क्वचितच एखाद्या मनाला असं मन गवसतं ...जे प्रत्येक्ष आपल्याच मनाची प्रतिमा असतं...!    अशीच आज भरल्या घरात सारं भौतिक  सुखवैभव असूनही अशांत शारदा एकटीच देव्हाऱ्यापुढे बसून देवाशी भांडत होती, रडत होती ,बोलत होती....!     "देवा, का मला जन्माला घातलय रे...काय साध्य करायचं होतं तुला माझ्या या आयुष्यातून"...प्रत्येकाचे जन्माचे विधिलिखित मांडलेले असते...पण मला कळतच नाही मी काय कसं वागू ..सर्वांच्या मनासारखं, हवं नको पुरवण्यातच दैनंदिन आयुष्य चाललय...पण मलाही मनातनं काही जाणीवा आहे ,जरा काही निवांतपण, काही हवंय का, हा विचारच नाही करत कोणी घरात...! आणि जसं मला आयुष्य जगायचं होतं तसं मला  वास्तव जगणं  नाही दिलस रे ,मग विचार करायची बुद्धी तरी का दिलीस रे?...मंदच ठेवायचस न...

ठेच :- एक आयुष्यातील उत्तम शिक्षक

Image
मित्रांनो !  आयुष्यात ठेचा लागल्याच पाहिजेत, अक्षरशः रक्तबंबाळ व्हावं इतक्या !! कुणीतरी प्रचंड विश्वासघात केला पाहिजे, कुठेतरी फसवणूक झाली पाहिजे, जवळची माणसे तिऱ्हाईतासारखी वागली पाहिजेत, गरज असताना सोडून गेली पाहिजेत, कुठल्यातरी क्षणी भीतीने गाळण व्हावी, सगळ्यांच्यात असून एकटेपणाची भावना यावी, एकाचवेळी सगळी संकटे यावीत आणि इतकी फाटावी की त्या क्षणी असं वाटावं की आता सगळंच संपलं!  परिस्थितीसमोर गुडघे टेकायची वेळ यावी, कधीतरी घोर अपमान व्हावा, कुठेतरी स्वाभिमान दुखावला जावा काही ठिकाणी तर त्याला घाण टाकण्याची वेळ यावी, कधी तरी कुणाच्या पाया पडायला लागावं, गरज नसताना सुद्धा कुणाची तरी हजारवेळा माफी मागायला लागावी, कित्येक रात्री ह्या त्रासांनी निद्रेचा नाश व्हावा, रडून रडून डोळे सुजावेत इतका अफाट त्रास व्हावा ! अक्षरशः सगळं सोडून जावं की काय असं वाटावं.!! अन् मग बघावं ह्या वेदनांतून तावून सुलाखून निघाल्यावर उभं राहतं ते एक वेगळंच अजब रसायन.!! "ज्याला कुणाच्या असण्या-नसण्याचा काही फरकच पडत नाही. तो जगतो फक्त "आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्याशिवाय...

मधमाशांचे परोपकार :- बोधकथा

Image
  ⚜️🔸☀️🔹🌞🔹☀️🔸⚜️     शहरापासून दूर एका घनदाट जंगलात एक आंब्याचे आणि लिंबाचे झाड होते. दोन्‍ही झाडे शेजारशेजारी होती. पण... शेजारी असूनही लिंबाचे झाड कधीही आंब्याच्‍या झाडाशी बोलत नसे. कारण आंब्याच्‍या झाडापेक्षा आपण उंच असल्‍याचा त्‍याला गर्व होता. *एकदा* काय झाले की, एक मधमाशांची राणी लिंबाच्‍या झाडापाशी गेली व ती लिंबाला म्‍हणाली, ''वृक्षदेवा, मी तुमच्‍या इथे मधाचे पोळे बनवू इच्छिते, तुम्‍ही मला याची परवानगी द्या.''  लिंबाचे झाड तिला म्‍हणाले, ''नाही मी अशी मधाची पोळी वगैरे काही बनवू देणार नाही'' हे सर्व ऐकून आंब्याचे झाड लिंबाला म्‍हणाले, ''अरे मित्रा, तू तुझ्यावर पोळे का बरे बनवू देत नाहीस कारण तुझ्यावर ते अतिशय सुरक्षित असेल.'' पण लिंबाचे झाड हटून बसले होते की ते मधाचे पोळे बनवू देणार नाही म्‍हणून. राणी मधमाशीने वारंवार विनंती करूनही लिंबाचे मन काही वळेना तेव्‍हा राणीने आंब्याच्‍या झाडाला फक्त एकदाच विनंती केली त्‍याबरोबर आंब्याच्‍या झाडाने परवानगी दिली. राणी मधमाशीने व तिच्‍या सहका-यांनी तिथे एक पोळे तयार...

दैव आणि कर्म :- बोधकथा

Image
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶        आमच्या गल्लीत एक ,दुकानदार आहे.          मी त्याच्या दुकानावर गेलो व त्याला विचारले कि बाबा रे! मला एक प्रश्न विचारायचा आहे, त्याचे उत्तर देवू शकतोस का?  तो म्हणाला तुम्ही खुशाल विचारा, मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.          मी विचारले कि माणुुस मेहनत करतो, मग त्याला यश मिळाले,.कि तो म्हणतो हे देवाने यश पदरात टाकले.  मला सांग दैव श्रेष्ठ कि मेहनत?          मला वाटले कि याची पुरती बोलती बंद होणार, पण त्याने जे उत्तर दिले ते एकुन मी अवाक झालो.     .   बोलती बंद त्याची नाही तर माझीच बोलती बंद झाली.            त्याने उत्तर दिले, तो म्हणाला, मला सांगा तुमचे बँकेत सेफ डिपॉजीट चे लॉकर आहे? त्या लॉकरला दोन चाव्या असतात. एक तुमच्याकडे आणि एक बँक मँनेजर कडे. लॉकर उघडतानां त्या दोन्ही चाव्या लॉकर ला लावाव्या लागतात. तरच तो लॉकर उघडते अन्यथा नाही.बरोबर ना? मी म्हणालो बरोबर, ...

जीवन विचार - 152

Image
जेव्हा तुम्ही आनंदात असता तेव्हा आयुष्य सुंदर असते पण जेव्हा तुमच्यामुळे इतरांना आनंद होतो तेव्हा आयुष्य सार्थकी लागते . आपल्यामुळे कधीही कोणाच्याही डोळ्यात पाणी येऊ देऊ नका . हसावता नाही आलं तरी अश्रूंचे कारण बनू नका . दुसऱ्यांच्या दुवा घ्या तळतळाट नको .            फक्त गरज पडल्यावर आठवण काढणाऱ्या माणसांवर कधीच रागवू नका .. कारण काही माणसं देवाचीही आठवण तेव्हाच काढतात जेव्हा त्यांना कोणताच पर्याय दिसत नसतो .          संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव होय . दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडं दुःख सहन करायला काय हरकत आहे . जेव्हा आपण दुसऱ्यासाठी दिवा लावतो तेव्हा आपलीही वाट उजळून निघते . फक्त माणूसकी जपायला शिका सर्व नाती आपोआप निभावली जातील .  🔴🟢🔴🟢🔴🟢🔴🟢🔴🟢🔴🟢🔴🟢🔴

◼️ ललित लेख :- काम कोणतेही करा , पण मनातून करा ! वाचा एक असाच taxi वाल्याचा लेख ...

Image
  पॉवर ऑफ चॉइस सुप्रसिद्ध साहित्यिक चेतन भगत याने सांगितलेला हा किस्सा आहे. ----------------------- मी एअरपोर्टच्या बाहेर टॅक्सीसाठी रांगेत उभा होतो. तेवढ्यात माझ्यासमोर एक टॅक्सी येऊन उभी राहीली. पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की ती टॅक्सी बाहेरून नुसतीच स्वच्छ नव्हती तर चकचकीत पॉलीश केलेली होती. टॅक्सीचा ड्रायव्हर खाली उतरून व टॅक्सीला वळसा घालुन माझ्याकडे येत होता. त्यावेळी माझ्या लक्षात आले की त्याचा ड्रेस एकदम स्मार्ट आहे. त्याने स्वच्छ धुतलेला व इस्री केलेला पांढरा शर्ट घातला होता. तशीच इस्त्री केलेली काळी पँट होती. टाय लावलेला होता व पायात चकचकीत पॉलीश केलेले बुट होते. त्याने आदराने माझ्यासाठी टॅक्सीचे मागील दार उघडले व माझ्या हातात एक लॅमीनेट केलेले कार्ड देत म्हणाला, ‘ सर! माझे नाव वासु! मी तुमचा टॅक्सी ड्रायव्हर. मी तुमचे सामान मागे डिकीमध्ये ठेवेपर्यंत आपण हे माझे मिशन स्टेटमेन्ट कृपया वाचावे.’ ‘मिशन स्टेटमेन्ट?’ मला गंमत वाटली व मी त्या कार्डावर नजर टाकली. त्यावर सुरेख व ठळक अक्षरात छापले होते. ‘ वासुचे मिशन स्टेटमेन्ट! माझ्या टॅक्सीमधील प्रवाशांना कमीत कमी खर्चात, कमीत ...

◼️ राजमाता :- ⚜️पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती...

Image
अहिल्याबाई खंडेराव होळकर.        पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर  मराठा साम्राज्याचा ध्वज.             अधिकारकाळ - डिसेंबर ११, इ.स. १७६७ - ऑगस्ट १३, इ.स. १७९५ राज्याभिषेक - डिसेंबर ११, इ.स. १७६७ राज्यव्याप्ती - माळवा राजधानी - रायगड पूर्ण नाव - पुण्यश्लोक अहिल्याबाई खंडेराव होळकर पदव्या - राजमाता जन्म - मे ३१ , इ.स. १७२५ चौंडीगाव , जामखेडतालुका , अहमदनगर , महाराष्ट्र , भारत मृत्यू - ऑगस्ट १३, इ.स. १७९५ महेश्वर पूर्वाधिकारी - खंडेराव होळकर दत्तकपुत्र - तुकोजीराव होळकर उत्तराधिकारी - तुकोजीराव होळकर वडील - माणकोजी शिंदे राजघराणे - होळकर अहिल्याबाई होळकर किंवा अहिल्यादेवी होळकर (इ.स. १७२५ ते इ.स. १७९५) या मराठा साम्राज्यातील महत्त्वाच्या व्यक्ती होत. त्यांना पुण्यश्लोक या उपाधीने संबोधले जाते. बालपण : अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते व धनगर होते. अहिल्यादेवी यांचे ...

◼️ माहिती :- पानाडे पाणी कसे ओळखतात.. सर्वांच्या उपयोगाचे

Image
🧐 मनातील प्रश्न.... पानाडे पाणी कसे ओळखतात.. कृषी दर्पण..... ☑विहीर – कूपनलिके करिता महत्वाची जागा कशी शोधाल..!!! भौ गोलिक रचनेप्रमाणे जमिनीच्या आतील पाण्याचे ओहोळ कसे वाहतात, कुठे एकत्र मिळतात, पाणी कुठे – कसे साठविले जाते, हे विहीर – कूपनलिका खोदताना शोधणे महत्त्वाचे आहे. या साठवणुकीतच विहीर – कूपनलिका खोदली, तर हमखास पाणी लागते. या साठवणुकीतच विहीर खोदली तर हमखास वर्षभर पिण्याचे पाणी मिळेल. नेमके हे ठिकाण शोधणाऱ्यास वॉटर विचर्स किंवा पाणाडे म्हणतात. पाणाडे अशा पाण्याचा शोध पारंपरिक पद्धती वापरून घेत असतात. जमिनीवर पडलेले पाणी प्रथम जमिनीत जिरते. मातीच्या मगदूर व जमिनीच्या उताराप्रमाणे अतिरिक्त पाण्याला गती मिळते. जमिनीची धूप; ओहोळ, नाले, नदी यांच्या निर्मितीचे मूळ कारण पाण्याला मिळालेली गती हेच आहे. पाणी जमिनीवर वाहताना पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण त्याला आकर्षित करते व त्यामुळेच झरे, कूपनलिका, विहिरी यांना पाणी मिळते. पाणाडे जमिनीतील पाण्याचा शोध कसा घेतात, ते आपण पाहू. ▪1) भूगर्भ व नैसर्गिक वनस्पतींचा अभ्यास - डोंगराळ, उंच – सखल भाग, पाण्याने...