Posts

Showing posts from March, 2020

101+ जबरदस्त प्रेरणादायक सुविचार

Image
1. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. 2. स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात. 3. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. 4. चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे. 5. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. 6. शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत. 7. आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन. 8. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही. 9. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. 10. स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत. 11. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश मिळाले 12. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चां...

जीवनावर सर्वश्रेष्ठ विचार मराठी मधे | Life quotes in Marathi

Image
जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात..सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न “सोडून” दिले की अपोआप सुटतात. जीवन म्हणजे काय? कधी स्वत: लाच फोन लाऊन बघा लागणार नाही तो व्यक्ती दाखवेल जगात आपल्याकडे सगळ्यांनी वेळ आहे पण स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत. जीवनात एकदा तरी “वाईट” दिवसांना सामोरे गेल्याशिवाय “चांगल्या” दिवसांची गरज काळात नाही. जीवनात प्रश्नाची चांदी अशी कि, उत्तरानाच प्रश्न पडावे…. मनालाही समाजात नाही मग, रडत बसावे, कि हसत रडावे.जीवन”…. चांदन तेच असल तरी रात्र अगदी नवीन आहे…आयुष्य मात्र एकदाच का? हा प्रश्न जरा कठीण आहे… ठरवल ते प्रत्यक्षत होतेच अंस नाही आणि जे होते ते कधी ठरवलेलं असतेच असंही नाही यालाच कदाचित आयुष्य म्हणतात.समस्या हि कापसाने भरलेल्या बागासारखी असते जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते पण जे तिला फाटाळतात त्यांनाच वास्तव काळात. जीवनात दोनच मित्र कमवा…. एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल. आणि दुसरा “कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेलदेवाने तळहातावर नशिबाच्...

LetsUp motivation 2

Image

Hello motivation

Image

खुप सुंदर ओळी

*तेरी बुराइयों* को हर *अख़बार* कहता है, और तू मेरे *गांव* को *गँवार* कहता है । *ऐ शहर* मुझे तेरी *औक़ात* पता है, तू *चुल्लू भर पानी* को भी *वाटर पार्क* कहता है। *थक*  गया है हर *शख़्स* काम करते करते,  तू इसे *अमीरी* का *बाज़ार* कहता है। *गांव*  चलो *वक्त ही वक्त*  है सबके पास , तेरी सारी *फ़ुर्सत* तेरा *इतवार* कहता है । *मौन*  होकर *फोन* पर *रिश्ते* निभाए जा रहे हैं, तू इस *मशीनी दौर*  को *परिवार* कहता है । जिनकी *सेवा* में *खपा*  देते थे जीवन सारा, तू उन *माँ बाप*  को अब *भार* कहता है । *वो* मिलने आते थे तो *कलेजा* साथ लाते थे, तू *दस्तूर*  निभाने को *रिश्तेदार* कहता है । बड़े-बड़े *मसले* हल करती थी *पंचायतें*, तु  अंधी *भ्रष्ट दलीलों* को *दरबार*  कहता है । बैठ जाते थे *अपने पराये* सब *बैलगाडी* में , पूरा *परिवार*  भी न बैठ पाये उसे तू *कार* कहता है  । अब *बच्चे* भी *बड़ों* का *अदब* भूल बैठे हैं , तू इस *नये दौर*  को *संस्कार* कहता है  *। 🍁🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍁

रस्त्यावर पेन विकणारा झाला कॉमेडीचा बादशाह – जॉनी लिव्हर

Image
जॉन प्रकाश राव ज्यांना आज आपण जॉनी लिव्हर नावाने ओळखतो. आपल्या अनोख्या अभिनयामुळे आणि विनोदी कलेने त्यांनी खूप लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे. त्यांच्या याच प्रकारच्या अभिनयामुळे त्यांनी ऐकून ३५०+ चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि १३ फिल्म फेअर अवॉर्ड जिंकले आहेत. खरतर त्यांना छोट्या मुलांपासून ते मोठ्यांपर्यन्त सगळेच ओळखतात, पण खूपच कमी लोक असतील कि, जे त्यांच्या या यशाच्या मागचा संघर्ष जाणत असतील. चला तर मग जॉनी लिव्हर चा प्रवास आपण सुरुवाती पासून पाहण्याचा प्रयत्न करूयात. जॉनी लिव्हर यांचा जन्म १४ ऑगस्ट १९५६ मध्ये आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यामध्ये खूप गरीब कुटुंबात झाला. पण ते मुंबईच्या किंग सर्कल, धारावी मधे मोठे झाले. जिथे त्यांचे वडील हिंदुस्तान लिव्हर कंपनी मध्ये एक कामगार म्हणून काम करत होते. शिक्षणाबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी, ७ वि. पर्यंत आंध्र शिक्षा संस्थ्येमध्ये शिक्षण घेतले. त्यावेळी त्यांच्या घरची परिस्तिथी एवढी बिकट होती कि, त्यांना शिक्षण मधेच सोडावे लागले. मग आपले पोट भरण्यासाठी त्यांनी मुंबईच्या रस्त्यावर पेन विकायचे काम सुरु केले. त्याचंबरोबर त्यांनी...

युद्धातला हत्ती.🐘

Image
✍🏻एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हा राजा त्यात विजयी झाला. काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होत चालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. एकेदिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे हत्ती पुढेपुढे गेला आणि दलदलीत फसला. वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्य नव्हते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावत आले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली. कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही.भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. राजापर्यंत हि वार्ता गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला, राजा शेजारीच उभ...

अब्दुल कलाम यांचा वडिलांची शिकवण

Image
👉🏻स्वातंत्र्यानंतर अब्दुल कलाम यांच्या वडिलांना ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. त्यांनतर एके दिवशी एक व्यक्ती त्यांना भेटायला आले. त्यावेळी कलामांचे वडील घरी नव्हते आणि कलाम अभ्यास करत होते. कलामांचे वडील घरी नसल्याचे पाहून तो इसम म्हणाला, 'मी तुझ्या बाबांसाठी भेटवस्तू आणली आहे. ते जेव्हा येतील तेव्हा ही भेटवस्तू त्यांना दे.' काही वेळाने कलामांचे वडील घरी आल्यावर त्यांना ती भेटवस्तू दिसली. चांदीच्या ताटात ठेवलेल्या त्या भेटवस्तू पाहून त्यांनी कलामांना विचारले, 'बेटा या भेट वस्तू कुठून आल्या.' तेव्हा कलाम म्हणाले, 'तुम्ही घरी नसताना एक व्यक्ती घरी आला होता, त्यानेच हे दिले.' त्यांच्या वडिलांनी त्या भेटवस्तू उघडून पाहिल्या तर त्यात, महागडे कपडे, चांदीचे पेले आणि मिठाई होती. हे पाहिल्यावर ते रागवले. कलाम घरी असूनही त्या व्यक्तीने या भेटवस्तू घरी ठेवल्या आणि कलामांनी त्याला नाकारले नाही, या गोष्टींचा त्यांना राग आला. रागावर अनावर झाल्याने त्यांनी कलामानां जोरात चापट दिली आणि घरात येर-झऱ्या घालू लागले. थोड्यावेळाने कलामांच्या वडिलांना लक्षात आले...

रतन टाटा यांचा हा संदेश जरूर वाचा

Image
*🍲🍨प्लेट मध्ये जेवण शिल्लक ठवण्या अगोदर, रतन टाटा यांचा हा संदेश जरूर वाचा.*  👉🏻जगातील सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी आपल्या एका tweet च्या मध्यमातून, त्यांना आलेला एक खूप सुंदर अनुभव शेर केला. जो एक खूपच प्रेरणादायी आणि विचार करायला लावणार अनुभव आहे. आज आपण त्याच tweet चे मराठी अनुवाद वाचणार आहोत. पैसा तुमचा आहे पण संसाधने हे समाजाचे आहेत. जर्मनी हे एक खूपच प्रगत आणि highly industrialized देश आहे. अश्या देशात खूप लोकांना वाटेल की तिकडले लोक खूप शाही जीवन जगत असतील. जेंव्हा आम्ही हॅम्बर्ग येथे पोहचलो, माझे कालीग एका रेस्टोरन्ट मध्ये आम्हला घेऊन गेले. त्या रेस्टोरन्ट मध्ये खूप टेबल्स रिकाम्या होत्या. तिकडे एका टेबलावर एक जोडपे जेवण करत बसले होते. त्यांचा टेबलावर फक्त 2 च पदार्थ (dishes) आणि बिअर च्या दोन बाटल्या ठेवलेल्या होत्या. मी ते दृश्य पाहून विचार केरत होतो, कि एवढं सिम्पल जेवण रोमँटिक असू शकते का?, आणि ती मुलगी त्या कंजूस मुलाला आता सोडेल का?.. तिकडे काही दुसऱ्या टेबलावर, काही वृद्ध महिला बसल्या होत्या. जेंव्हा कोणती डिश सर्व्ह केली जायची तेंव्हा...

वास्तव

Image
*पैसे असुन साधं राहीलं तर भिकारडा म्हणतात..पैसा ब-यापैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात..सगळ्यांशी मनमोकळेपणानं बोललं तर बकबक करतो म्हणतात ..कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात ....दानधर्म नाही केला तर कंजुष मारवाडी..भरपुर दानधर्म केला तर दोन नंबर पैसे असणार असं म्हणतात ...बायकोचं ऐकलं तर बैल...नाही ऐकलं तर काहीतरी भानगड असणार असं म्हणतात..तब्बेत चांगली तर फुकटंच खाऊन सुटलाय म्हणतात ...तब्बेत कमी केली तर काहीतरी आजार झाला असणार म्हणून मरायला लागलाय असं म्हणतात .....सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर ह्याला काही धंदा नाही...नाही गेलं तर माणुसकी नाही म्हणतात .....हे सगळे लोक असतात...लोक नेहमी त्यांचं काम करतच असतात.. आपण आपलं काम करायचं....याचाच अर्थ "ऐकावे जनाचे , करावे मनाचे..लोक पायी चालु देत नाहीत...अन गाढवावर बसु देत नाहीत...शेवटी आपण ठरवायचं ...जीवन कसं जगायचं.,,हसत हसत की रडत रडत........"*

शाळेतील सरांनी बोर्ड वर लिहले

Image
9×1 =9 9×2 =18 9×3 =27 9×4 =36 9×5 =45 9×6 =54 9×7 =63 9×8 =72 9×9 =81 9×10=89 *लिहल्यानंतर सरांनी मुलांकड़े पाहिलं, तर मूलं त्यांच्यावर हसत होती कारण शेवटची एक लाइन चुकली होती.* *स्मितहास्य करत सरांनी मुलांकडे पाहिले आणि म्हणाले की, मी शेवटची लाईन मुद्दाम चूकीची लिहली आहे कारण तुम्हा सर्वांना खुप महत्वपूर्ण अशी शिकवण देऊ शकेन.* *समाज तुमच्याशी असाच व्यवहार करेल.* *तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्ष्यात येईल कि, बोर्ड वर मी नऊ वेळा बरोबर लिहलं आहे तरीसुद्धा माझ कोणीच कौतुक केले नाही.* *माझ्या फक्त एका चुकीवर आपण सर्वजन हसलात आणि मला समजून घेतले नाही.* *तात्पर्य* *तुम्ही लाख चांगली कार्य केली तरी समाज कधी ही तुमच्या चांगल्या कार्याच कौतुक करणार नाही. पण तुमची एक जरी चुक झाली तर ते तुमच्यावर असच हसतील आणि ते तुम्हाला कधीच समजून घेणार नाही.* *👉कटू आहे पण सत्य आहे* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏