Posts

Showing posts from January, 2021

◾कविता :- नवरा माझा

Image
  नवरा माझा      पहिले होता कुंकवाचा धनी, आता मात्र, तो आहे फक्त...... माझ्यासाठी ब्लॅक अँण्ड व्हाइट मनी, पहिले होता तो, माझ्या घराचा पहारेकरी, आता मात्र, आहे नुसताच तो... माझ्या प्रेमाचा वाटेकरी, त्याच्यामुळे बसली आमच्या विस्कटलेल्या संसाराची घडी, आता मात्र, नुसताच आहे तो... माझ्यासाठी एक 'घरगडी', पहिले होता तो माझ्यासाठी, संकटी धावुन येणारा 'देव', आता मात्र, वाटतो मला तो... नको-नकोशी वाटणारी 'ठेव', म्हणायचे पहिले मी, त्याला आदराने 'पंत', आता मात्र, तो झाला... माझ्या सहनशिलतेचा अंत, पहिले होता, नवरा माझा भोळा, आता मात्र, वाटतो तो मला... संसारी माझ्या, आकार-उकार नसलेला फक्त एक... मातीचा 'गोळा',               मंगेश शिवलाल बरंई.        पंचवटी, नाशिक ४२२००३.

◾ललित लेख :- स्ञी

Image
   आज स्त्रियांचा जन्मच मुळात नाकारतला जातो. पण स्त्रीयांमुळेच कुटुंबाचा वंशाचा वारसा पुढे-पुढे चालत राहतो हे समाज सोयिस्करपणे आज विसरला आहे. एक स्त्रीच पुर्ण कुटुंबाला शिक्षित करु शकते. आई बनुन, एका वटवुक्षाच्या सावलीप्रमाणे कुटुंबाचा मानसिक आधार बनुन.      ऐतिहासिक काळापासून आईचं महत्त्व सर्वपरिचित आहे. महाराष्ट्राचे लढवय्या राज्यकते शुरवीर शिवाजी महाराजांची आई जिजाऊबाई ह्या शिस्तप्रिय आई म्हणून ओळखल्या जात. त्यांच्या ह्या शिस्तप्रियतेचा फार मोठा वाटा शिवाजी महाराजांच्या यशात आहे. तसेच साने गुरजींच्या कथेतील शामची आई तिच्याविषयी कितीही लिहिले तरी शब्द अपुरेच पडतील. ती तर साक्षात वात्सल्याची मुर्तीच होती. असे इतिहासातील कितीतरी दाखले आपल्याला देता येतील.      स्त्री ही विविध भावनांनी नटलेली आहे. दैवानं मातुत्वाचं दान तिच्या पदरात टाकून तिचं श्रेष्ठत्व सिद्ध केल़ं आहे. तिच्या मनात वात्सल्याची भावना  निर्माण केली.स्त्रीच्या या विविध भावनांच्या शुंगारानं स्त्रीचं सौदर्य आधिकच खुलून दिसतं.      आई या शब्दात मुळातच आप आणि ईश्वर...

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

Image
नमस्कार  मी आहे नंदुरबार जिल्ह्याचा कलेक्टर               ( डॉ, राजेंद्र भारुड )_       ___ माझा जन्म कोणाच्या घरात आणि कोणत्या समाजात व्हावा हे माझ्या हातात नव्हतं. मी साक्री तालुक्यातील सामोडे गावात  भिल्ल जमातीत जन्म घेतला आणि माझं जगणं सुरू झालं.  जगताना पावलो पावली संघर्ष होता, अडचणी होत्या. परिस्थिती  प्रतिकूल होती; पण त्याचा बाऊच करत राहिलो असतो तर आज ही आयएएस ऑफिसर पर्यंतची मजल गाठता आलीच नसती. अभिनेता अमीर खान आणि मी  मला माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळाली नाही, किंबहुना मिळालीच नाही. अभावाच्या या जगण्याला निसर्गाची भक्कम सोबत होती. निसर्गाचा सहवास होता म्हणून लढायला ताकद मिळाली. उसाच्या पालाची झोपडी म्हणजे माझं घर. मी मायच्या पोटात होतो तेव्हाच वडील वारले. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. माझे वडील कसे होते हे मला कधीच कळलं नाही. आमच्याकडे ना जमीन होती ना शेती. पण आमचं शिकणं इतर कोणाला महत्त्वाचं वाटण्याचं कारणंच नव्हतं. आमचा जन्म म्हणजे सांगितलेली का...

◾कविता :- जय जिजाऊ

Image
‼ ' मराठीचे शिलेदार कविता ' समूहात काल देण्यात आलेल्या विषयावर निवडक सदस्यांनी केलेले 'कविता लेखन '.‼ ➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖ मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम ➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖        🙏विषय :- जय जिजाऊ🙏        🎋दिनांक:- १२ जानेवारी २०२१ 🎋 💫💠💫💠💫💠💫 एक उरली ठिणगी    लाख पेटल्या मशाली स्वराज्याच्या संकल्पनाची नवीन पहाट आज हि झाली नवचैतन्याची नवकल्पनांची आरोळी सुरू झाली स्वराज्याचा ध्यास घेऊनी स्त्रियांत तो उतरविला शान मान महाराष्ट्र उतरूनी जिजाऊंनी लाख लाख पूत्र मावळे उभे करूनी आशीर्वादाचे पारडे जड केले तर या माऊलीने अशी असावी माता जिचा वाटावा अभिमान पूत्र घडवीला ऐसा जो राष्ट्राची शान मान दान चंदन प्रेमाने झिजूनी वंदनात शिथिलता आणली योगी न होता उपयोग  आल्यात्या जिजाऊ... प्रभावा पेक्षा स्वभावाने  जिंकून दिले महाराष्ट्रला मर्दमराठ्याना अखंड  स्वराज्याची सावली धन्य ती जिजाऊ..... तुझ्या भेटीची ओढ लागली अंतरी मस्तक टेकविले मी तुझ्या चरणावर ती धन्य धन्य झाला सह्याद्री कनकन  जय जिजाऊ कोटी कोटी प्रणाम   सौ कुसुम पाट...